हेलो मित्रांनो,
MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले की नाही अजून? आतापर्यंत सर्वांनाच मिळायला पाहिजे. नसतील मिळाले तर ४ दिवस वाट पहा आणि तरी सुद्धा मिळाले नाही तर काय करणार?
काळजी करू नका.
परीक्षेच्या कमीत कमी ४ कार्यालयीन कामकाज दिवस (working days) आधी तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये जा, आणि जातांना सोबत ती पावती जरूर घेवून जा जी तुम्हाला फॉर्म जमा करतांना पोस्ट ऑफिस मधून मिळाली होती आणि जर त्यांनी सुद्धा हाल तिकीट दिलं नाही तर कमीत कमी १ दिवस आधी (कार्यालयीन कामकाज दिवस) खालील पत्त्यावर प्रत्यक्ष जावून प्रवेश प्रमाणपत्र (हाल तिकीट) घ्यावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विक्रीकर भवन, ९ वा माळा, रूम नंबर ९१५
सरदार बलवंतसिंग दोधी मार्ग (नेसबित रोड)
माझगाव मुंबई ४००२०३
दूरध्वनी ०२२-२३७४२१९१
fax – ०२२-२३७८१०६१
जे उमेदवार मुंबईत राहतात व त्यांच परीक्षा केंद्र मुंबई आहे त्यांनी MPSC आयोगाच्या, विक्रीकर भवन, माझगाव येथील ऑफिस मध्ये जावून घ्यावे.
पण लक्ष्यात ठेवा, प्रत्यक्ष उमेदवाराने तिथे जावे अन्यथा ते प्रवेशपत्र देणार नाहीत.
जर तुमचे नाव उमेद्वार्राच्या यादीत नसेल व तुमचा अर्ज नाकारल्याच पत्रं सुद्धा मिळालं नसेल तरी सुद्धा तुम्हाला तात्पुरता प्रवेश मिळेल परीक्षेला.
Note:
ज्यांना प्रवेशपत्र मिळाल असेल त्यांनी कृपया माझ्या ब्लॉग वर आपलं नाव, परीक्षा केंद्र व परीक्षेचं माध्यम (इंग्लिश किंवा मराठी) पोस्ट करावं खालील लोकेशन वर, जेणेकरून प्रिलिम्स परीक्षेनंतर तुम्ही मित्रांचा ग्रुप तयार करू शकता मुख्य परीक्षेसाठी आणि मी तुमच्या सर्वांच्या मदतीला असेनच.
परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले नाही
@पांडुरंग, कोणत्या परीक्षेचे?