Afraid of MPSC Prelims Exam 2010?

मित्रांनो, आता मागे फिरू नका
होय मी बरोबर बोलतोय. MPSC  परीक्षेचा इतिहास बघता असं लक्षांत येते की लाखो मुलं-मुली ह्या परीक्षेचा फॉर्म भरतात आणि जवळपास ४० ते ५० टक्के मुलं-मुली वेळेवरच परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतात. का बरं तुम्ही असे करता?

परवा तुमची परीक्षा आहे आणि आता तुम्ही तुमचा परीक्षेत बसण्याचा निर्णय फिरवू नका. ठाम निश्चय करा की तुम्ही परीक्षेत बसणारच!
का मी असं सांगतो  आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, होय की नाही? बघा, ज्याने परीक्षेत न बसण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला असेल त्याच्या मते त्याचा निर्णय बरोबर असेल, पण माझ्या मते तो चुकीचा आहे बरं का! त्याची कारणं खालीलप्रमाणे आहेत किंवा असू शकतील:

– एक तर मुळातच हा निर्णय चुकीचा आहे
– तुम्ही तुमचा कॉन्फिडेंस लेवल कमी करता
– तुमच्या वयाचं एक वर्ष वाया घालवता
– तुमचे पैसे वाया घालवता
– माझ्या मेहनतीच चीज करत नाही, माझे सर्व प्रयत्नांच महत्व कमी करता. मी तुमच्या साठी रात्र भर जागून काढली आहे तुम्हाला मार्गदर्शन  पर लेख लिहितांना.
– मी किती स्टडी प्लान बनवून दिले तुम्हाला, त्याच महत्व कमी करता, कमीत कमी त्या प्लान्स चा फायदा होवू द्या.
– एकदा बघा तरी ही परीक्षा कशी असते, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची तयारी पूर्णपणे झाली नसेल, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्या MPSC वाल्यांना  ते बघू द्या की.
– जर परीक्षा दिलीच नाही तर तुम्हाला कसं कळेल की तुम्ही किती पाण्यात आहात? जंगलात न घुसताच कसं ठरवू शकता की आत वाघ आहे की नाही? एकदा घुसून तरी बघा ना!

एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही पूर्व परीक्षा दिली आणि वेळेवर तुमचे सर्व किंवा जास्तीत जास्त उत्तरं बरोबर असतील तर तुम्हाला मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळेल आणि ही संधी सर्वांनाच मिळत नाही हे लक्षात ठेवा हं! आणि मग मी तर तुमच्या पाठीशी आहेच ना मुख्य परिक्षेच गायडंस द्यायला.

तुम्हाला माहित आहे का एका मुंगीची गोष्ट?

दर रोज हे घडते पण आपलं लक्ष कुठे असते अशा गोष्टींकडे?
एक मुंगी झाडावर चढते पण ती लगेच खाली पडते. परत ती चढायचा प्रयत्न करते आणि धाडकन पडते. बिचारी परत चढते आणि मध्य-मार्गातच परत खाली पडते. असं तिचं चालूच राहते पण ती प्रयत्न सोडत नाही, शेवटी तीला जिथं जायचं असते ती तिथे जावूनच दम घेते. आता त्या मुन्गीपेक्षा बलदंड तुम्ही नक्कीच आहात, होय की नाही? आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. मी जातो माझ्या गावा माझा नमस्कार घ्यावा, थोड्या क्षणापुरता बरं का! मी लगेच तुमच्या मदतीला धावून येणार आहे बघा! तुम्ही जरी तुमचा मार्ग सोडला पण मी माझा हट्ट सोडणार नाही मित्रांनो!

तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC State Services Prelims Exam. Bookmark the permalink.

11 Responses to Afraid of MPSC Prelims Exam 2010?

  1. jana म्हणतो आहे:

    sir, happy teachers day.
    ur book are very nice. but due to my economical condition ican’t
    purchase.plz help me

  2. Swa म्हणतो आहे:

    Can u plz send me price for MPSC Mantra book. so I can book this on time.

  3. prajakta म्हणतो आहे:

    sir
    i cleared my bsc(it) course with first class aggregate…
    i want to opt for both upsc and mpsc
    is the syllabus same for both
    also i m a SC student
    sir i want to know how to go about this exam
    how to make the time table , what classes to join and what books to refer
    because i m totally dedicating my time towards this competitive exam
    plz help me with this

  4. RANGNATH AVHAD म्हणतो आहे:

    this is good efforts to spraid awarenness

  5. RANGNATH AVHAD म्हणतो आहे:

    which subject is best for mpsc mains between hostoy and geography. my other optional is pub adm.

  6. Rakesh Ravate म्हणतो आहे:

    Hello Sir,
    I’m an Automobile Engineer & I want to prepare for the MPSC (RTO).
    Please tell me that is there a prelim test for the same exam?
    Also please guide me what should be done for the same.

  7. Rakesh Ravate म्हणतो आहे:

    Hello Sir,
    I’m an Automobile Engineer & I want to prepare for the MPSC (RTO).
    Please tell me that is there also a prelim test for the same exam.
    Also please guide me what should be done for the for the same.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.