प्रिय मित्रांनो,
आज मला अत्यानंद होतोय तुम्हाला सांगायला की मी लिहिलेलं “एम.पी.एस.सी. सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” ९ डिसेंबर रोजी एका लहानशा पण प्रभावी सोहळ्यात प्रकाशित झालं आणि ते सुद्धा मी खूप अगोदर पाहिलेल्या उंच स्वप्नासारखंच, अगदी तसंच. माझ्या अजून एका स्वप्नाची पूर्तता झाली हे मला आवर्जून सांगावसं वाटतं. आणि म्हणूनच मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की बाबांनो स्वप्न नेहमीच बघा कारण स्वप्न बघितल्याशिवाय ते पूर्ण व्हायचा प्रश्नच उठत नाही. स्वप्न बघा आणि मग ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. अगदी आकाश एवढ स्वप्न बघा आणि मग ते पूर्ण करा. हो, ते अगदी शक्य आहे. बघाना, माझं स्वप्न सुद्धा पूर्ण झालंय.
माझं हे स्वप्न पूर्ण करण्यात सर्वात मोठा हातभार आहे माननीय श्री. रमेश पहुरकर (बँक ऑफ महाराष्ट्र – ओझर शाखेचे मुख्य प्रबंधक) ह्यांचा. त्यांच्याच पुढाकाराने माझ्या पुस्तकाला एवढा मोठा प्ल्याटफॉर्म लाभला. त्या बद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.
माननीय श्री. पी.बी. अंभोरे साहेब (बँक ऑफ महाराष्ट्र – उप महाव्यवस्थापक – नाशिक क्षेत्र) ह्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करून जो सर्वोत्तम मार्ग मला दिला त्या बद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.
ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सुद्धा मी फार आभारी आहे.
मित्रांनो, माझी एक विनंती आहे की माझ्या “एम.पी.एस.सी. सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” ला एकदा तरी वाचून काढा आणि त्यात असलेल्या तृती मला कळवा. काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याचशा चुका (स्पेलिंग मिस्टेक्स) त्यात आहेत. मला जो font पाहिजे होता तो न मिळाल्यामुळे मी जो font वापरला त्यात बरेचशे अक्षर नव्हते म्हणून बरेचसे शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिल्या गेलेत तर त्यासाठी मला क्षमा करा. मी पुढील आवृत्तीत त्या चुका दुरुस्त करील.
“एम.पी.एस.सी. सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” प्रत्येक वाचकाला उपयोगी पडेल असा माझा ठाम विश्वास आहे.
Thank you sir
mala hya tumchya margadArshanach bharpur laabh bhavi jiwana hoiel . amhala asech margdarshan karit raha.
@Gajanan, yes, we will do our best to help as many people as we can through our blog.
Hello sir,
i had descided to give MPSC examination and i know i hav a spirit crack this. but i hv a Question that is i am late to start studying….?
please suggest me more about it. Right now i am appeared in BCA-Final and my age is 21. please suggest me more that how to improve command on english as i am not well in english.
Thanking you!