मित्रांनो
आता मागे राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली आणि लगेच मला ब्लॉगवर मेसेजेस यायला सुरवात झाली … कट ऑफ बद्दल!!!
मी वेळ काढून माझा ‘अपेक्षित कट ऑफ ” चा अंदाज ब्लॉगवर टाकला आणि लगेच प्रतिक्रियांना सुरवात झाली, त्यात काही पोझिटीव्ह अन काही निगेटीव होत्या.
सध्या प्रश्न हा नाही कि “कट ऑफ” काय असतील , प्रश्न हा आहे कि कोण ही परीक्षा “ऑल क्लियर ” होईल .
२०१२ ची मुख्य परीक्षा, नवीन अभ्यासक्रमानुसार, पहिलीच असल्यामुळे प्रश्नांबद्दल संभ्रम सर्वांनाच होता ह्याबद्दल कुणालाच पूर्वानुमान नसल्यामुळे ज्याला जसं जमलं तसा अभ्यास त्याने केला. परीक्षेत मात्र सर्वांचीच दांडी उडाली. ज्यांना युपीएससी परीक्षेचा अनुभव होता त्यांना हे प्रश्न फार सोपे होते. ज्यांनी सखोल अभ्यास केला होता त्यांना फारशी अडचण आली नाही.
आता ही वेळ परीक्षेतील प्रश्नांचा “पोस्टमोर्टेम ” करण्याची नसून ताबडतोब पुढील परीक्षेसाठी तयारी करण्याची आहे.
ज्यांना अस वाटत असेल कि आता भरपूर वेळ आहे २०१३ च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तर मित्रांनो, You are WRONG !!!
राज्यसेवा पूर्व परीक्षा “फेब्रुवारी २०१३” मध्ये असून मुख्य परीक्षा “मे २०१३” मध्ये आहे.
आजरोजी बघितल तर मुख्य परीक्षेच्या तयारीची वेळ जवळपास निघूनच गेली आहे. पूर्व परीक्षा अगदी तोंडावर आलेली असून ती परीक्षा आता २०१२ पेक्षा जास्त कठीण राहणार आहे आणि तसेच मुख्य परीक्षा सुद्धा!!! २०१२ च्या मुख्य परीक्षेच्या “कट ऑफ्स” बद्दल वेळ घालवत बसाल तर मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
भगवान बुद्ध अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगून गेलेत कि “No One Saves Us But Ourselves. No One Can And No One May. We Ourselves Must Walk The Path.”
मित्रांनो, २०१३ च्या परीक्षेत जर सफलता मिळवायची असेल तर तुम्हाला आतापासूनच वेळेचा सदुपयोग करून सखोल तयारी करावी लागेल. लक्षात असू द्या कि भरपूर पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. जास्तीत जास्त मासिके वाचून तयारी करावी लागणार आहे.
सर्वप्रथम, अभ्यासक्रमानुसार पुस्तके गोळा करावीत आणि मगच अभ्यासाला लागावे. वाचन केल्यानंतर नोट्स तयार करावेत, रिविजन करावी आणि मग सराव परीक्षा(Mock Tests) द्याव्यात. लक्षात ठेवा कि स्वत:ची तयारी कितपर्यंत झाली हे कळण्याचा मार्ग फक्त सराव परीक्षाच आहे. जास्तीत जास्त सराव केला तरच २०१३ च्या परीक्षेत सफलता मिळेल अन्यथा नाही!!!
मी सुरुवातीलाच सांगितल आहे कि मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फार कमी वेळ बाकी आहे आता. तर ह्या महिन्यातील बाकी उरलेले दिवस आणि पुढील महिना (ऑक्टोबर २०१२) मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी द्यावा आणि मग पूर्व परीक्षेची तयारी करावी. पूर्व परीक्षा संपल्याबरोबर मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे.
हा मार्ग फार कठीण आहे हे सांगायची गरज नाहीच कारण ज्यांनी २०१२ ची राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे त्यांना हे कळलेलंच आहे. ज्यांना सफलता मिळवायची असेल त्यांनी ह्या मार्गावर मार्गक्रमण करावयास ताबडतोब सुरुवात करावी कारण हा मार्ग त्यांनाच पार करायचा आहे.
गुड लक मित्रांनो!!!
Dear sir,
maja S Y Bsc Complete zala aahe.Me ata last year la aahe mala Mpsc (PSI) chi exam tyachi aahe tar me exam deu shakto ka?
Thanks
@शशिकांत, ह्या वर्षी २०१२-२०१३ ला फायनल इयर ला असाल तर देता येईल अन्यथा २०१४ ची तयारी करावी.
Sir, How to prepare for Staff Selection Commission Maths
@Anil, you should prepare according to the syllabus of that exam by referring 2-3 books for Maths.
sir mala sti officer vyache aahe pan ; maz math khup kach aahe tyasathi mala kay karaw lagel
@Pradip, Maths 10th/12th Std level ch asate tar schoolche books refer karawet ani practice karawi tasech Maths chi tuition lawavi.