प्रिय मित्रांनो
ही परीक्षा आता पूर्वीसारखी राहली नाही. २०१३ ची परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी पहिलीच परीक्षा असून त्यासाठी आता फार मेहनत घेण्याची गरज आहे. ही परीक्षा कठीण आहे कि सोपी आहे हे प्रत्येकाच्या तयारीवर अवलंबून आहे. ज्यांची तयारी व्यवस्थित झाली असेल त्यांच्यासाठी ही सोपी असेल. प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर परीक्षा कठीण वाटेलच.
ज्यांना असे वाटते कि ही परीक्षा सोपी असून त्यासाठी सिरिअस प्रिपरेशन ची गरज नाही. अशी विचारसरणीच मात्र घटक ठरते आणि त्यांच्या पदरात असफलता पडते.
ही परीक्षा सर्वांसाठीच कठीण आहे असे मला वाटते कारण प्रत्येकाला Facts माहित असावे लागतात आणि तेही सखोल माहितीसह. सामान्य अध्ययन पेपर १ हा फार विस्तृत असून त्यासाठी लागणारे ज्ञान सुद्धा विस्तृतच असावे लागते. ह्या पेपरसाठी तयारी करत असतांना जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा तुमच्या डोळ्यांची व तुमच्या ब्रेन ची सांगड असावी लागते. डोळ्यांनी प्रत्येक Fact व्यवस्थित वाचून घ्यावा लागतो आणि ब्रेन ने त्याचे compilation करावे लागते. संबंधित मुद्द्याचे सर्वच Facts कडे लक्ष द्यावे लागते. एकही Fact सोडू नये तेव्हाच ही पूर्व परीक्षा सोपी जाईल.
तुमची तयारी वरीलप्रमाणे झालेली असेल तर ही परीक्षा अगदी सोपी वाटेल कारण ह्या परीक्षेत उत्तर दिलेले असते, फक्त महत्वपूर्ण Factsच विचारले जातात आणि अगदी अचूक उत्तर निवडण्यासाठी तुम्हाला माहित असलेली माहिती अगदी बरोबर व स्पष्ट असायला हवी. प्रत्येकाला असे वाटते कि त्याची माहिती अचूक आहे पण कदाचित ती नसेलही. त्यासाठी शासनाद्वारे प्रकाशित झालेली माहितीच अगदी अचूक असते आणि ती माहिती शासनाद्वारे प्रकाशित वेगवेगळ्या मासिकांमध्ये, जर्नल्स मध्ये, इंडिया इअर बुकमध्ये उपलब्ध असते.
जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाचता तेव्हा तुमच्या डोक्यात तुम्ही ती माहिती साठवून ठेवता पण सारखी माहिती जेव्हा जास्त होते तेव्हा मात्र तुमच्या मनात गोंधळ निर्माण होतो. उदाहरणार्थ, क्रिकेट वर्ल्ड कप कोणी जिंकला? असा प्रश्न असेल तर मग तुम्ही त्याच्याशी निगडीत असलेली माहिती तुमच्या डोक्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा गोंधळ होवू शकतो कारण तुम्ही “एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप” व “ट्वेंटी – ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप” बद्दल माहिती वाचून साठवलेली असते आणि मग त्यापैकी कोणती माहिती “आता विचारलेल्या प्रश्नासाठी” उपयुक्त आहे ह्यात गोंधळ येवू शकतो. अशा वेळेस अगदी अचूक व स्पष्ट माहिती असणे गरजेचे असते. तुमचे उत्तर अगदी असेच असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही सफल होवू शकाल.
मुळात, पूर्व परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न हे तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठीच असतात. एकाच प्रश्नासाठी ४ उत्तरे असतात आणि त्यापैकी २ किंवा ३ बरोबर असल्यासारखेच वाटतात परंतु त्यातून अचूक उत्तर निवडणे हाच उद्देश असतो.
वरील सर्व माहिती वाचून तुम्हाला वाटत असेल कि ह्या परीक्षेसाठी निवडक अभ्यासाची गरज आहे, बरोबर?
चूक, सपशेल चूक!!!
ह्या परीक्षेसाठी प्रश्न जरी objective असले तरी ह्या परीक्षेच्या तयारीसाठी मात्र तुम्हाला descriptive वाचनाची व अभ्यासाची गरज आहे. जोवर तुम्ही विस्तृत वाचन करणार नाही तोवर तुम्हाला विस्तृत, अचूक व स्पष्ट माहिती असणार नाही आणि तुम्ही परीक्षेत अचूक उत्तर निवडू शकणार नाही.
ह्या परीक्षेत कोणता प्रश्न विचारल्या जाईल हे सांगता येत नाही.
आता ह्या वर्षी नवीन अभ्यासक्रम असून पेपर २ हा मात्र तुमच्या सफलतेच्या बाबतीत निर्णायक ठरणार आहे. ह्या पेपर साठी विस्तृत अभ्यासच लागणार आहे कारण येथे तुमची निर्णय घेण्याची कसोटी पणाला आहे.
मागील वर्षापासून प्रश्नांचे स्वरूप काय असते हे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ च्या प्रश्नपत्रिकेवरून दिसूनच आले आहे आणि आता तर त्यापेक्षाही कठीण व गोंधळात टाकणारे प्रश्न असतील CSAT पेपर मध्ये.
दोन्ही पेपर्स मध्ये अगदी सरळ प्रश्न (Direct Questions) व गोंधळात टाकणारे प्रश्न (Tricky Questions) तर असतीलच हे नक्की.
मित्रांनो, जर एखादा प्रश्न अगदी सोपा वाटत असेल तर लगेचच उडया मारायला सुरुवात करू नका. त्यात काय दडलेले आहे ते बघा आणि मगच उत्तर निवडा. कदाचित पहिला प्रश्न सोपा असेल, दुसरा पण, तिसरा सुद्धा आणि दहावा सुद्धा. तुम्ही खुश होत होत अकराव्या प्रश्नावर पोचाल आणि तिथे झटका बसेल तेव्हा तुमच्या गतीला ब्रेक लागेल.
How To Train Your Mind For Mental Stress During Exam: Read HERE
Very thanks SIr
Very Very thank you sir !!!!
Thanks sir for help..
tthank u sir for information
thanks sir..
thank u sir
thank you sir.
Thanks sir
Thanks sir….
THANKS SIR
thanks sir
thank you sir
thanks sir
thanks for information
Thank u so much,…
thank u sir
thnaks sir
thank you sir