Success Mantra #2 – सफलता मिळत नसते, मिळवावी लागते

मित्रांनो,
मला बरेच जण (नेहमीच कुणी ना कुणी) विचारतात कि “मी हे हे शिक्षण करत आहे किंवा कम्प्लीट केल आहे मग मी एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल होईल का?”.

आता मलाच हा प्रश्न पडतो कि मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही आणि मी कस काय सांगू कि ते सफल होतील कि नाही?

…पण एक मात्र मी खात्रीने सांगू शकतो कि सफलता मिळत नसते तर ती मिळवावी लागते.

प्रत्येकाला सफल व्हाव अस वाटत असते आणि त्यात चूक काहीच नाही. एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो किंवा युपीएससीची असो, त्यासाठी अभ्यास करायचा असतो हे तर सर्वांनाच माहित असते आणि प्रत्येक जन अभ्यास करतात हे तर आहेच. ज्यांना सफल व्हायचे असते ते दिवस-रात्र मेहनत करतात पण ते फक्त मोजकिच पुस्तके वाचून सफल व्हायचे स्वप्न बघत राहतात मात्र ज्यांना घवघवीत सफलता मिळवायची असते त्यांना पुस्तके वाचण्याची भूक लागते मग ते कुठूनही मिळवायचे आणि वाचून आपली अभ्यासाची भूक मिटवायची असते परंतु त्यांची ती भूक मिटतच नाही.

थोडेफार पुस्तके वाचून अभ्यास होत नाही असे नाही परंतु हवा तितका होत नाही. जितकी डेप्थ हवी तितकी मिळत नाही. जितकी जास्त पुस्तके वाचली तितके जास्त ज्ञान उपलब्ध होते आणि त्याचा वापर परीक्षेसाठी होतो. कोणत्याही मुद्द्यावर सखोल ज्ञान प्राप्त होते आणि त्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू कळतात. मग त्यावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवू शकता मग ती पूर्व परीक्षा असो व मुख्य परीक्षा असो.

थोडेफार पुस्तके वाचून तुम्हाला अस वाटत असेल कि ह्या परीक्षेसाठी जितकी तयारी करायची होती ती मी केली आहे पण कदाचित ते धोकादायक असू शकते. ह्याने तुम्हाला सफलता मिळवता येणार नाही.

मग सफलता मिळवण्यासाठी अजून काय करावे?
सर्वात आधी “मला सफलता कोणत्याही परिस्थितीत मिळवायची आहे” असा संकल्प करावा. “त्यासाठी मी काहीही इमानदारीने करीन आणि कितीही अभ्यास करीन” असा दृढ निश्चय करावा. हीच सफलतेची पहिली पायरी आहे. जिथे संकल्प व दृढ निश्चय आहे तेथे पाणी काढता येतेच.

जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा आणि आपल्या ज्ञानात नेहमी भर पाडावी आणि पडतच राहिली पाहिजे अशी काळजी घ्यावी.

जेव्हा जेव्हा असा वाटेल कि माझा अभ्यास व्हावा तितका झाला नाही तर अजून जास्त अभ्यास कसा होईल ते पाहून तो पूर्ण करावाच.

ते करण्यासाठी स्वत:ला  शिस्त लावावी म्हणजे तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही आणि मार्गात कितीही अडथळे आलेत तर तुम्ही ते पार कराल.

नेहमी सकारात्मक विचार करावा आणि मनात नकारात्मक विचारांना थारा देवू नये. कितीही प्रयत्न केलेत आणि नकारात्मक विचार जात नसतील तर थोडासा ब्रेक घ्यावा आणि एक छान हास्य चित्रपट पहावा किंवा आपल्या आवडीचे एक सुंदर गाणे  ऐकत असताना सोबत सोबत ते गाणे मोठ-मोठ्याने म्हणावे. मन एकदम प्रसन्न होईल आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल.

जेव्हा तुम्ही अगदी आनंदी असाल तेव्हा परत अभ्यासाला सुरुवात करा. तुमचे प्रयत्न तूम्ही करत रहा. सफलता सहजासहजी व आपोआप (automatic) मिळणार नाही परंतु तुम्ही केलेल्या प्रयत्नातूनच नक्कीच मिळवू शकाल.

जेव्हा तुम्हाला परीक्षेत असफलता मिळाली तेव्हा निराश होवू नका, त्या असफलतेपासून तुम्ही काही शिकलेत असा अर्थ घ्या. उगीच निराश न बसता पुढील मार्गक्रमण करा.

एकेवेळी तुम्हाला अस वाटेल कि हे सर्व निरर्थक आहे आणि त्यामुळे तुम्ही फार नाराज व्हाल तेव्हा तुमच्या अपेक्षेमागे काहीतरी कारण असेल ते शोधून काढा. जेव्हा ते कारण तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला बर वाटेल आणि त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. मार्ग आहेत पण ते शोधावे लागतात.

तुमच्या जीवनात तुम्हाला काय व्हायचे आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याकडे मार्गक्रमण करत रहावे. हे आर्टिकल तुम्ही वाचत आहात ह्याचा अर्थ हाच कि तुम्हाला  एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल व्हायच आहे, बरोबर न?

तर आता पुढे मी जे काही सांगेल ते तुम्हीं कराच तरच तुम्ही सफलता मिळवू शकाल:

  • सर्वात आधी जी परीक्षा द्यायची आहे त्याचा अभ्यासक्रम बघा.
  • त्यानुसार जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करा अथवा लायब्ररीतून मिळवा. त्या  संपूर्ण पुस्तकांसाठी तुम्ही आमचे ई-प्रोस्पेक्ट्स बघू शकता.
  • आता समजा तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत साठी ७० ते ८० पुस्तकांची गरज पडेल. सोबतच ५ मासिके लागतील, इंटरनेट वरील माहिती लागेल, दररोज २ वर्तमानपत्रे लागतील.
  • ह्या सर्वांचा अभ्यास करायला एक वर्ष लागेल तर सर्वात आधी मुख्य परीक्षेची तयारी करावी मगच पूर्व परीक्षेची तयारी करावी. पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेचा सखोल अभ्यास करायला वेळ मिळणार नाही.
  • अभ्यास करत असताना स्वताचे नोट्स काढायला विसरू नका. ह्याला शोर्ट कट नाही किंवा दुसरा पर्याय नाहीच.
  • जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे रिविजन करायला विसरू नका. माझ्या एका पी.जी.पी. student (विणा शिंदे, पुणे) च सुद्धा हेच म्हणणे आहे कि “कधी कधी असे घडते कि फार दिवसानंतर रिविजन केल्यास काही वाचत असतांना अस वाटते कि मी हे वाचलच नाही”. त्यामुळे नियमितपणे रिविजन करणे योग्य ठरते.
  • सराव परीक्षा म्हणजे प्रश्न पत्रिका सोडवून पाहणे हे सफलतेच एक मुख्य कारण आहे. तुम्ही स्वत:ला तपासून बघा, तुमचा अभ्यास कितपत झाला आहे हे नेहमी  पडताळून बघा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवून बघा आणि तुमचा झालेला अभ्यास Mock Test च्या स्वरुपात तपासून बघा. ह्यासाठी तुम्ही प्रश्न संच सोडवा परंतु तो प्रश्नसंच विकत घेण्याआधी त्याची व त्यातील प्रश्नांची क्वालिटी बघा तरच तो विकत घ्या. तुम्ही http://www.anilmd.com वर मोफत टेस्ट सोडवून बघू शकता त्याने तुम्हाला अंदाज येईल कि परीक्षेत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात.
  • जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर द्यायला तुम्ही चुकले असाल तर मात्र ही गंभीर बाब आहे कारण तुमची झालेली तयारी व्हायची तितकी झालेली नाही हे नक्की.
  • अशा वेळेस परत त्या विषयांची तयारी करावी आणि मग परत Mock Test च्या स्वरुपात स्वत:ची तयारी तपासून बघा.

अशा प्रकारे सफलता तुम्ही स्वत: मिळवू शकाल.

तर मित्रांनो…….परत भेटूया तिसरा सक्सेस मंत्र देईल तेव्हा!!!

Read : Success Mantra #1   Success Mantra #3

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services and tagged , , , , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

34 Responses to Success Mantra #2 – सफलता मिळत नसते, मिळवावी लागते

  1. vijay Bhorkhade म्हणतो आहे:

    मी पोलीस खात्यात नोकरीला आहे . पण मला एसटीआय ची पोस्ट काढायची आहे. योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

  2. sanket bhoge म्हणतो आहे:

    Sir me BE mechanical complete kel ahe ani mala government exam sathi preparation karayachay ahe so please tell me kuthlya kuthalya exam deu shakato ani exam sathi kay refer karu

  3. priyanka.band म्हणतो आहे:

    Ani sir Marathi medium chi mule hi exam deu shaktat ka…mi ycm chi student ahe pan ya exam sathi class chi garaj ahe kat.yacha kharch kiti sir.

  4. priyanka.band म्हणतो आहे:

    Thanks sir..khup chan margdarshan kelay..pan sir je 70- 80 book s konte ahet..ani masike konti sir

  5. pankaj prakash nagesh म्हणतो आहे:

    sir mala upsc pri cha syllbus marathitun hava hota aani tya vishache books have hote plz help me sir

  6. Dnyaneshwar sonawane म्हणतो आहे:

    me sakari nakari ahe mala mpsc vashi mahati sanvai

  7. nidhi म्हणतो आहे:

    nidhi
    sir is it compulsory to have a graduate degree from a government college to apply for IFS/IAS ???…..

  8. kunalshirsathe89 म्हणतो आहे:

    sir, kahi divasapurvi Dharmaday aayukt karyalayachya adhikshak, varistha lipik ashya padansathi jaga sutalya hotya…. yetya kahi mahinyat tyachi exam aahe pan tyanni syllabus kay aahe he dilele nahi. krupaya syllabus kay asu shakto ya babat guide karal kaa?

  9. VJ म्हणतो आहे:

    Sir,state service cha exam pattern kadhi change zala?juna kay hota ani navin madhe kay change zalet?

    • AnilMD म्हणतो आहे:

      @विजय, २०१२ पासून मुख्य परीक्षेचा आणि २०१३ पासून पूर्व परीक्षेचा. जुना काय होता हे महत्वाचे नाही. सध्या जो अभ्यासक्रम आहे त्यावर लक्ष दिले पाहिजे. नवीन अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहे.

  10. Akshay Dilip kachre म्हणतो आहे:

    thanks sir,khupach usefull information dili aani spetially mala abhyasabaddal prerna milali

  11. Vijay s kangulkar म्हणतो आहे:

    Sir,mala 2014 chya tayyari sathi kahi मासिके suchava…jene karun current affairs vishayi mahiti milel…

    • AnilMD म्हणतो आहे:

      @विजय, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, सायन्स रिपोर्टर, सिविल सर्विसेस क्रोनिकल, इत्यादी.

  12. nitin jape-patil म्हणतो आहे:

    आभारी आहोत सर ,,,खरेच तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली ….thankss sir

  13. amit म्हणतो आहे:

    Dear Sir
    I am reading your blog from last 1.5 years without fail also buy sucess mantra copy last year. Currently working in bank as manager. Due to work load unable to give quality time for study.
    I have done Bsc agri and then agriculture business management. Working in bank since last 5 years in agri finance division.
    Please sugget is there any another option for me rather than MPSC or UPSC.
    Regards
    Amit

  14. satish b. mandale म्हणतो आहे:

    sir, I am preparing for. upsc from last uear july .. 2013 is my first attempt. .. I am little bit tensed about. prilim as my first aytempt. sir your success mantra motivates me. to do revision again and again .. thank you sir …

  15. ajit kokane म्हणतो आहे:

    sir maje graduation complte ahe..pn mi mpsc profile var appear kele ahe..tyacha kai efect hou shakto ka

    • AnilMD म्हणतो आहे:

      @अजित, नाही पण आता जेव्हा प्रोफाईल मध्ये ह्याबद्दल माहिती दिसेल तेव्हा पास झाल्याची तारीख टाकणे.

  16. sukanya म्हणतो आहे:

    Sir, Success Mantra 2 is Very Valuable and knowledgable for study ………
    Thanks …………………..!

  17. vivek giri म्हणतो आहे:

    sir psi sti asst chi exam date kewha yeil…probable date

  18. sarang म्हणतो आहे:

    write approch to study for upsc..

  19. vicky म्हणतो आहे:

    good afternoon sir,
    tumhi sangitalele tips agadi lakshyat aale pan mala nehami kahi ashe mitra sangtana distat ki yaar jast ani continuous vachlyane majhya lakshyatach rahat nahi kinva kami vachlyane majhya lakshyat rahate.
    ani pustake nivdtana te kami pages asalele pustak nivdtat mag te konihi lihilele aso.
    mag tyala karan kay aani tyavar upay kasa?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.