2014 – Success Mantra #3 – मासिके का व कशी वाचावीत?
मित्रांनो,
तुम्ही २०१४ च्या राज्यसेवा व इतर परीक्शेंसाठी तयारी करत असतांना तुमच्या मनात चालू घडामोडींबद्दल कशी तयारी करावी? व काय काय वाचावे? असे प्रश्न आलेच असतील, होय ना?
सर्वात मोठा प्रश्न तर हा असतो कि घडामोडीं केव्हापासून वाचायला पाहिजेत?
एक लक्षात ठेवा कि प्रश्न कशावरही येवू शकतात तर त्यासाठी तुम्ही दररोज कमीत कमी २ वर्तमानपत्रे वाचावीत, ४ ते ५ मासिके वाचावीत आणि टी.व्ही. व रेडियो वरील बातम्या, इन्टरनेट वरील माहिती वाचावी आणि त्याचे संकलन म्हणजे स्वत:चे नोट्स तयार करून ठेवायला पाहिजे म्हणजे ऐन परीक्षा तोंडावर आल्यावर हे नोट्स वाचून काढायला जास्त वेळ लागणार नाही.
आज आपण बघणार आहोत कि मासिके कशी व का वाचायला पाहिजेत?
मित्रांनो, मासिके का वाचायचीत हा अगदी महत्वाचा विषय आहे. राज्यसेवा आणि इतर परीक्षेत असणाऱ्या सामान्य अध्ययन या पेपर मध्ये चालू घडामोडींवर अनेक प्रश्न असतात आणि हा एक महत्वाचा घटक आहे. फक्त भारतीयच नव्हे तर आंतर राष्ट्रीय घडामोडींना सुद्धा तितकच महत्व आहे. आणि ह्यासाठीच मासिके फार महत्वाची असतात.
माझ्या ऐकण्यात आहे कि काही जण एकसुद्धा मासिक वाचत नाहीत. हे अगदी योग्य नाही. कारण चालू घडामोडी साठी सर्वात उपयोगी मासिकेच असतात. जेव्हा एखाद्या मुद्द्यावर वर्तमानपत्रातून माहिती वाचली तर त्यावर आणखी व संपूर्ण माहिती मासिकात मिळू शकते. सर्वच मुद्दे एकाच ठिकाणी मिळतात.
आता बघूया कि केव्हापासून घडामोडीं बघायला पाहिजेत म्हणजे तुमचा वेळ वाचेल.
ओके. आता तुम्ही २०१४ च्या परीक्षेसाठी तयारी करत आहात तर चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी जानेवारी २०१३ पासूनच्या चालू घडामोडींपासून सुरुवात करा आणि परीक्षेच्या आधी एक महिन्या पर्यंतच्या घडामोडी कवर करा. हो, त्या आधीच्या घडामोडींवर सुद्धा प्रश्न येवू शकतात पण परीक्षेच्या एक वर्षा आधीच्या घडामोडींवर जास्त लक्ष द्या. अगोदर ह्या एक वर्षातील घडामोडीं पूर्ण करा आणि मग बाकी. कोणतीही गोष्ट करण्यासाठी मेथड लागते, एक प्लान लागतो. सर्व काही प्लान नुसारच केल पाहिजे अन्यथा सर्व वेस्ट जाईल.
त्या मासिकातून काय बरे वाचायला पाहिजे?
- सद्यस्थितीत असलेले शासकीय प्लान, प्रोग्राम, इत्यादींवर लेटेस्ट माहिती.
- नवीन सुरु झालेले प्लान्स, प्रोग्राम
- सामाजिक ईश्युज
- आर्थिक मुद्दे
- आंतर राष्ट्रीय वाटाघाटी
- विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्दे
- स्त्री संबंधित मुद्दे व
- इतर मुद्दे
मासिके वाचण्यासाठी किती वेळ द्यावा?
तुम्ही जी मासिके वाचता त्यातील सर्वच काही महत्वाचे असते असे नाही.
संपूर्ण मासिक वाचायला सुरुवात केली तर एक दिवस निघून जाईल किंवा त्यापेक्षा जास्तही!
एक मासिक जास्तीत जास्त १ ते २ तासातच वाचून काढावे आणि त्यावर नोट्स सुद्धा त्याच वेळेत लिहून झाले पाहिजे. काही मासिकांना मात्र जास्त वेळ द्यावा लागेल कारण त्यात माहिती भरपूर असते तर दररोज १ ते २ तास देवून २ ते ३ दिवसात ते मासिक संपवावे. त्यानंतर दुसरे मासिक हातात घ्यावे आणि ते संपवावे. असे करून ४ ते ५ मासिके पूर्ण करावीत परंतु एकाच वेळी किंवा एकाच दिवशी नाही. जसा वेळ तुम्हाला मिळेल तेव्हा, दररोज एक मासिक पूर्ण करावे.
प्रत्येक मासिकातून स्वत:चे नोट्स काढायला विसरू नका. नोट्स कसे काढायचेत हे मी अगोदरच्या सक्सेस मंत्रात लिहिले आहे आणि ब्लोगवर सुद्धा!
तर मित्रांनो…….परत भेटूया चवथा सक्सेस मंत्र देईल तेव्हा!!!
Read : Success Mantra #1 Read – Success Mantra #2 Read – Success Mantra #4
SIR JI MI ATA SY BA LA ADMISSTION AHE DISTANACE NE AND MI JOB KARTO TR MLA JOB AND MPSC CHI TAYARI AKATR KARAYCHI AHE TYASATHI KY KARU
@विकास, दररोज ३-४ तास (एक वर्ष भर) अभ्यास करावा. बाकी खाली दिलेल्या सक्सेस मंत्रांमध्ये दिलेलं आहे.
sir me job karte…MPSC karave he khup iccha ahe pan planch flop hote…..may b proper guidance che kami asel…manache tayari kase karave kai sangu shakal kai?
@स्वाती, आमचा पिजीपी जॉईन करा म्हणजे त्मच्या एमपीएससी तयारीच्या सर्व अडचणी दूर होतील. “Courses” मेनू बघावा.
Sir MPSC cha aabys 1 varshat hou shakto ka?
@हर्शल, हो, केला तर होईल 🙂
Kharach Sair mala Pahije Ti Mahiti Milali Ahe ,
Thank U very Much
Sir,I had bought ur book and thouroughly read it.But I am as a employer of zp,I have not get enough time for study.Still I want to be successful in mpsc.I have to prepare for the 2014 pre.Plz,advice me for it.Thank you
@Sandeep, you should manage 3 to 4 hours everyday for 1 year then only you can go for the exam with complete preparation.
Dhanyavad sir…khup changl margadarshan kelat tumhi…
Pn sangavs vatat..yach lekhat amhi kuthle kuthle Masik vachale pahijet he sangital asat tr far upyog zala asta…
@Pramod, you can refer Lokrajya, Yojana, Kurukshetra, Scicence Reporter, etc. I have already discussed this in other articles. Every candidate refers different magazines available at their places so I wrote a general article that can be useful to all.
अनमोल व अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली.