मित्रांनो,
एमपीएससी किंवा युपीएससी २०१४ द्यायची असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे ह्या बद्दल थोडा विचार केलात का? कदाचित जास्तीत जास्त जणांनी नक्कीच विचार केला असेल असे मला वाटते. तर चला मग बघूया कि माझा अनुभव आणि माझे सजेशन्स तुम्हाला कितपत फायद्याचे ठरतात!!!
२०१३ च्या पूर्व परीक्षेत सफलता मिळवू न शकणारे उमेदवार नव्याने २०१४ ची तयारी करत असतील तर त्यांनीसुद्धा हा लेख काळजीपूर्वक वाचायला हवा. तुम्ही केलेल्या काही चुका सुधारणात थोडीफार मदत नक्कीच होईल.
सर्व प्रथम काय करायला हवे?
मुख्य परीक्षेची कि पूर्व परीक्षेची तयारी करू?
जसे मी नेहमीच सांगत आलोय कि पूर्व परीक्षेच्या आधी मुख्य परीक्षेची तयारी करावी. ही तयारी कशी करावी ह्याबद्दलच आहे हा “चवथा सक्सेस मंत्र”!!!
Success Mantra #4: मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी
मित्रा, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अगदी योग्य पद्धतीने तयारी करावी लागते.
- सर्वात आधी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ च्या दोन्ही प्रश्नपत्रिका घ्या. त्या मार्केटमध्ये व एमपीएससीच्या वेब साईट वर उपलब्ध आहेत.
- अभ्यासक्रमात असलेले सर्व विषयातील सर्व topics च्या लिस्ट तयार करा.
- त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ च्या प्रश्नपत्रिके मधील विचारण्यात आलेले प्रश्न सर्व topics नुसार त्यांच्या पुढे लिहून घ्या. असे केल्याने तुम्हाला अंदाज येईल कि कशा प्रकारचे प्रश्न त्या त्या topic वर विचारल्या जाऊ शकतात.
- अशा प्रकारचा analysis केल्यावर तुम्हाला कळेल कि ६ वी ते १२ वी च्या पुस्तकांचा तसेच advance पुस्तकांचा गहन अभ्यास करावा लागेल.
- कोणती पुस्तके घ्यावीत हे सुद्धा अति महत्वाचे आहे आणि त्यांचा अभ्यास करून स्वत:चेच नोट्स काढावेत हे विसरून चालणार नाही.
- मुख्य परीक्षेसाठी तयारी करत असतांना पूर्व परीक्षेला विसरू नका. मुद्दे जे महत्वाचे वाटतात ते लिहून काढा. पूर्व आणि मुख्य परीक्षेत साम्य असलेले topics व्यवस्थित तयार करा.
- सर्वात आधी इंग्रजी व मराठी विषयांचा अभ्यास करा आणि मग सामान्य अध्ययन पेपर १ ते ४ चा करा.
- अभ्यास करतांना वेळोवेळी रिविजन करत चला. नाहीतर विसरून जाल जो अभ्यास झाला तोच!त्यासाठी लिखित स्वरुपात स्टडी प्लान तयार करा. त्याशिवाय तुम्ही स्वत:ची अभ्यासाची प्रगती पुढे चालू ठेवू शकणार नाही.
- मुख्य मुद्दे, मग ते पुस्तकात असो किंवा मासिकात व वर्तमानपत्रात असो, अंडरलाईन करा व मग नोट्स च्या स्वरुपात लिहून काढा.
- एका विषयासाठी कमीतकमी २ ते ३ पुस्तके वाचा. जास्त सुद्धा वाचण्याची गरज पडू शकते. उदाहरणार्थ, इतिहास साठी तर ६ ते ८ पुस्तके वाचावे लागतील. कारण एका पुस्तकात जे आहे ते परिपूर्ण असेल हे सांगता येत नाही.
- एक विषय अभ्यासाला घेतला तर तो संपेपर्यंत दुसरा विषय हातात घेवू नका. त्यावर नोट्स सुद्धा तयार करा. स्टडी प्लान नुसारच तयारी करा.
- आपल्या हातात किती दिवस आहेत ते बघा. प्रत्येक विषयाला किती दिवस देता येतील ते ठरवा. त्यासाठी त्या विषयासाठी किती पुस्तके वाचावे लागतील हे अगोदर बघा आणि मग लागणारे दिवस किती हे बघा.
- २०१४ साठी तयारी करत आहात तर सर्व ६ पेपर्सची तयारी पूर्व परीक्षेच्या ३ महिन्याआधी पूर्ण व्हायला पाहिजे. कमीतकमी २ महिने आधी तर नक्कीच.
- एका विषयाचा अभ्यास संपला कि त्याची रिविजन करून घ्या व त्यावर सराव परीक्षा द्या, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून बघा. लक्षात ठेवा कि ह्याशिवाय दुसरा मार्ग नाही तुमची तयारी कितपत झाली हे तपासून बघायला!!!
- राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कमीतकमी ४० ते ५० पुस्तकांचा अभ्यास करावाच लागेल तर हे लक्षात ठेवूनच स्टडी प्लान बनवा व त्या प्रमाणे तयारी करा.
- ह्या व्यतिरिक्त पुढीलपैकी जी मासिके जमेल ते वाचून काढत चला व त्यामधील अति-महत्वाच्या topics वर नोट्स तयार करा: लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, सायन्स रिपोर्टर, सिविल सर्विसेस क्रोनिकल, इंडिया टुडे, फ्रंट लाईन, मेन स्त्रीम, न्यूजवीक, इत्यादी.
- दररोज वर्तमानपत्रे वाचायला विसरू नका: द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाईम्स ह्यांपैकी जे जमेल ते वाचा व त्यामधील अति-महत्वाच्या topics वर नोट्स तयार करा.
- वरील मासिके व वर्तमानपत्रे ह्यातून कात्रणे कापून ठेवू नका. त्यांचे वाचन करून स्वत:चे नोट्स लिहून ठेवा.
मित्रांनो, मला वाटते ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. चला तर मग पुन्हा भेटूया सक्सेस मंत्र #5 च्या वेळी!!!
Read – Success Mantra #3 Read – Success Mantra #5
THANKS SIR….
thank u so much sir ,i think your success mantra will be very helpful for mpsc preparation.thanks for giving such a wonderful guidance to all of us.
Thank you Sir..Great Mantra
thanks sir….
sir, i like your success mantra &i flow your rulls
Thankyou
thanks for sucess mantra………really motivating…
exclent