Biggest Course in the history of MPSC/UPSC

मित्रा,

मी नेहमीच आठवण करून देत आलोय कि “तुझ्या भविष्याचा निर्माणकर्ता तू स्वत:च आहेस”. ही गोष्ट कृपया गाठ बांधून ठेव मित्रा.

आजरोजी तू एमपीएससीच्या (सर्वच परीक्षा – राज्यसेवा, पी.एस.आय., इत्यादी) प्रश्नपत्रिका बघशील तर एक गोष्ट लक्षात येईल कि दिवसेंदिवस प्रश्नाचं स्वरूप बदललय आणि त्यांची काठीण्यपातळी सुद्धा वाढत चाललीये. मग ह्या परीक्षेत सफल होण्यासाठी एका उमेदवाराने करावे तरी काय? असे काय आहे कि त्यातूनच सर्व तयारी होईल?

मित्रा, तू कदाचित एक पूर्णवेळ अभ्यास करणारा किंवा नौकरी करून अभ्यास करणारा व्यक्ती असू शकतो आणि काही कारणांमुळे तुला एमपीएससी किंवा युपीएससी क्लियर होणे गरजेचे आहे. हे मी समजू शकतो पण तुला हे समजून घेणे फार जरुरी आहे कि अशा परीक्षेत सर्वचजण सफल होवू शकत नाहीत.

मग?

हिम्मत कशाला सोडतोस मित्रा? ह्या परीक्षेत कोणीही सफल होवू शकतो! हे का विसरलास? आणि त्यापैकी तू सुद्धा होवू शकतोस ना!

जर तू स्वत: ह्या परीक्षेची अगदी व्यवस्थितपणे तयारी केलीस तर तू ह्या परीक्षेत सफल होवू शकतोस. माणसाने नेहमी सकारात्मक विचार ठेवून आपला रोजचा ठरवलेला अभ्यास अगदी वेळेवर पूर्ण करावा आणि हेच गुपित आहे !!!

ठरवलेला !!! हा शब्द फार म्हणजे फार महत्वाचा आहे.

प्रत्येकजण आजचे काम उद्यावर टाकण्यासाठी प्रयत्नशील असतो. असे केल्याने त्याला क्षणिक शांती मिळते परंतु आजचा अभ्यास उद्यावर टाकल्यास काय होणार? अभ्यासाचा ढीग लागतो. आणि मग हा अभ्यास उद्याची वेळ खावून टाकतो आणि उद्याचा अभ्यास परवाची वेळ खावून टाकतो !!!

त्यामुळे आजचा ठरवलेला अभ्यास आजच पूर्ण करावा आणि शक्य झाल्यास उद्याचा ठरवलेल्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा आजच करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुझा अभ्यास कधीच मागे राहणार नाही. तुझ्यामागे कसली न कसली जबाबदारी आहे हे लक्षात असू दे….नेहमीच.

एमपीएससीचे पेपर्स कशावर आधारित असतात? हा प्रश्न तुझ्या मनात नेहमीच घोंगाळत असणार…होय ना?

एक गोष्ट मला क्लियर करू दे कि प्रत्येकाला एमपीएससी/युपीएससी परीक्षेत सफल होण्यासाठी सोपा व झटपट मार्ग (short cut) हवा असतो…होय ना? परंतु मित्रा, तुला नाही वाटत कि हा सोपा व झटपट मार्ग फारच कठीण मार्ग असतो आणि ह्या परीक्शेत कधीच सफलता मिळत नाही?

माझ्या मते ज्याला कुणाला एमपीएससी/युपीएससी परीक्षेत सफल व्हायचे आहे त्याने नियोजन केले पाहिजे. जो हे करत नाही तो सफल होतच नाही. जो नियोजन करतो त्याचा मार्ग सुकर होत जातो, सरळ व सोपा होत जातो कारण त्याला माहित असते कि मला काय करायचे आहे आणि हे कसे घडवून आणायचे आहे. त्याला माहित असते कि मला ह्यात सफल होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे; कोणत्या पुस्तकांची गरज आहे; आणि त्यांचा अभ्यास सुव्यवस्थितपणे कसा केल्या जावू शकतो हे त्याच्या नियोजनामध्ये असते.

मित्रा, जर तू नियोजनाद्वारे अभ्यास केला तर तू स्वत:ला २०१४-२०१५ च्या परीक्षेसाठी तयार करू शकतोस. तुझी पुरेशी तयारी झाली नाही तर तू ह्या परीक्षेत सफलता मिळवू शकशील का? तुझी तयारी नसेल तर तू स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसशील आणि त्यातूनच पुढील परीक्षेत अपयश येईल हे निश्चितच!!! ज्यांना मागील काही वर्षात एमपीएससी/युपीएससी परीक्षेत सफलता मिळाली नाही त्यांना हे नक्कीच समजल असेल.

मित्रा, तू प्रत्येक दिवसाचे नियोजन करायला पाहिजे. आज काय करायचे, उद्या काय करायचे, किती अभ्यास करायचा, किती नोट्स काढायचेत, किती प्रश्न सोडवून पाहायचेत; असे केल्याने तूला अभ्यासाचे टप्पे गाठता येतील. असा दररोजचा स्टडी प्लान काटेकोरपणे, शिस्तीने पूर्ण करावा म्हणजे मागे काहीच राहणार नाही.

आजरोजी २०१३ च्या प्रश्नपत्रिका बघितल्यात तर असे दिसून येते कि पाचवी-सहावी ते दहावी-बारावीच्या पुस्तकातून प्रश्न घेण्यात आले आहेत.

काही प्रश्न तर अभ्यासक्रमाबाहेरचे आहेत असे वाटते.

काही प्रश्न तर कुठल्याही पुस्तकात सापडत नाहीत असे दिसते.

मग…हे प्रश्न आलेत तरी कुठून?

मित्रा, घाबरू नकोस.

हे प्रश्न कोठून आलेत हे तुला केव्हा समजेल? जेव्हा तू स्वत:च्या तयारीची सीमा वाढवशील तेव्हा!!!

अशा प्रकारची तयारी फक्त जास्तीत जास्त पुस्तकांचे, मासिकांचे, वर्तमानपत्रांचे वाचन केल्यावरच होवू शकते.

त्यासाठी पुढीलप्रमाणे पुस्तके घ्यावीत व त्यांचा सखोल अभ्यास करावा:

 Marathi Medium

Name of Exam

Basic Books

Advanced Books  Total No. of Books
Common Books for all subjects of Pre + Mains

0

4

4

RS Prelims GS I – History

4

3

7

RS Prelims GS I – Geography

3

0

3

RS Prelims GS I – Polity

0

0

0

RS Prelims GS I – Economy

0

0

0

RS Prelims GS I – Bio-Div,ClimateChng,Env

0

3

3

RS Prelims GS I – General Science

0

3

3

RS Prelims GS I – Current Affairs

0

1

1

RS Prelims – Manual & Ques Set

0

2

2

RS Prelims GS II – CSAT

0

4

4

Total Books for RS Prelims –>

7

20

27

Rajyaseva Mains

 

 

 

RS Mains English

0

2

2

RS Mains Marathi

0

2

2

RS Mains GS I – History

4

8

12

RS Mains GS I – Geography

5

4

9

RS Mains GS II – Constitution, Politics

5

6

11

RS Mains GS II – Laws

0

6

6

RS Mains GS III – HRD

0

2

2

RS Mains GS III – HR

0

3

3

RS Mains GS IV – Economy

5

5

10

RS Mains GS IV – S & T

5

3

8

Total Books for RS Mains

24

41

65

Grand Total Books for Rajyaseva

31

61

92

English Medium

 

 

Name of Exam

Basic Books

Advanced Books  Total No. of Books
Common Books for all subjects of Pre + Mains

0

4

4

RS Prelims GS I – History

4

3

7

RS Prelims GS I – Geography

3

0

3

RS Prelims GS I – Polity

0

0

0

RS Prelims GS I – Economy

0

0

0

RS Prelims GS I – Bio-Div,ClimateChng,Env

0

4

4

RS Prelims GS I – General Science

0

4

4

RS Prelims GS I – Current Affairs

0

1

1

RS Prelims – Manual & Ques Set

0

2

2

RS Prelims GS II – CSAT

0

2

2

Total Books for RS Prelims

7

20

27

Rajyaseva Mains

 

 

 

RS Mains English

0

2

2

RS Mains Marathi

0

2

2

RS Mains GS I – History

4

7

11

RS Mains GS I – Geography

5

4

9

RS Mains GS II – Constitution, Politics

5

5

10

RS Mains GS II – Laws

0

8

8

RS Mains GS III – HRD

0

3

3

RS Mains GS III – HR

0

3

3

RS Mains GS IV – Economy

5

6

11

RS Mains GS IV – S & T

5

3

8

Total Books for RS Mains

24

43

67

Grand Total Books for Rajyaseva

31

63

94

 

आमच्या पिजीपिमधून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ मध्ये सफल होणारा रोहित ढवळे ह्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

जे उमेदवार योग्य मार्गर्शनापासून दूर आहेत त्यांच्यासाठी मी ‘एमपीएससी/युपीएससीच्या इतिहासातील सर्वात मोठा कोर्स” तयार केला आहे. त्याचेच नाव आहे “नेक्स्ट-जेन-पी.जी.पी. (NextGenPGP)”.

घरीबसून पूर्ण केल्या जाणाऱ्या ह्या पर्सनल गायडंस प्रोग्रामद्वारे जास्तीत जास्त पुस्तके, मासिके घरापर्यंत कुरियर किंवा स्पीड पोस्टने पोचवल्या जातात आणि मग दररोज काय अभ्यास करावा, कसा करावा ह्याचे योग्य मार्गदर्शन इमेलद्वारे केले जाते. दररोजचा स्टडी प्लान इमेलद्वारे ताबडतोब पाठविल्या जातो. अभ्यास केल्यावर टेस्ट असतात त्या आमच्या वेबसाईट वरच दिवसा किंवा रात्री दिल्या जावू शकतात व त्यांचा निकालही लगेचच पाहू शकता. प्रत्येक आठवड्यात नॉलेज टेस्ट व निबंध असाईनमेंट असतात, त्या इमेल्द्वारेच पूर्ण कराव्या लागतात.

ह्याबद्दल सर्व माहिती येथे आहे: https://anilmd.wordpress.com/courses/nextgenpgp/

 

 

 

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, UPSC Civil Services and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

4 Responses to Biggest Course in the history of MPSC/UPSC

  1. janhavi chavan म्हणतो आहे:

    sir
    thnks for guidance pan khar sangu tar sir mala mpsc 1 varshatch pass karaychi ahe pan tyasathi lagnari pustake majyakade nahit economical problems mule mi 70-75 pustake gheu shakat nahi .. regular news paper magzins gheu shakat nahi mag mi kasa abhyas karu plz replay me… thank you

  2. amrapali baba ramteke म्हणतो आहे:

    sir how can i manage time , i am lecturer in polytechnic college and graduate in BE.
    can u give some extension in ur fees.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.