फटा पोस्टर निकला हिरो

“एका जत्रेने देव म्हातारा होत नाही…एकदा अपयश मिळाल्याने आपण अपयशी होत नाही…जिद्द सोडू नये… “—पी.एस.आय. विश्वास चव्हाणके !!!

मित्रांनो,

हर्षोल्हासाने मला सांगावेसे वाटतेय कि ह्या blogच्या मुख्य पानावर May 2011 पासून दिसणाऱ्या पोस्टरला निरखून बघा:

ADIA-Join-us-to-change-your-lifeह्या मध्ये एक मुलगा दिसतोय ज्याचे स्वप्न आहे कि जीवनात काहीतरी व्हायचंय  आणि तो ते स्वप्न पूर्ण करतो. From Dreams  to Reality!!!

आणि आता हेच स्वप्न साकार केलय आमच्या अकादमीमधून 2010च्या पर्सनल गायडंस प्रोग्राम(PGP)द्वारे MPSC PSI 2011 ची तयारी करून PSI 2012 batch मध्ये PSI च ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या विश्वास चव्हाणके यांनी.

From Dreams

Vishwas-Chavanke-ppt

Our PGP Candidate

Mr. Vishwas Chavanke

To Reality

PSI-VishwasChavanke-sm

PSI Vishwas Chavanke (2012 Batch)

विश्वास चव्हाणके नासिक जिल्यातील “कीर्तांगळी” गावचे राहणारे असून त्यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले ते स्वत:च्या मेहनतीने, चिकाटीने, कसल्याही अडचणीपुढे न डगमगता!!! त्यांच्या ह्या वृत्तीचे दर्शन त्यांनी घडवून दिले पुढील उपलब्धिने:

उद्या म्हणजे 28 Sep 2013 ला “महाराष्ट्र पोलीस अकादमी चे satellite सेंटर – सांगली (Turchi)” येथे होणाऱ्या दीक्षांत समारोहाचे “परेड कमांडर” होवून व “PSI 2012 batch” मधील 312 PSI पैकी “Best Behaviour Cadet” हा सन्मान मिळवून.

PSI ट्रेनिंग च्या शेवटच्या दिवशी दीक्षांत समारोह असतो आणि तेव्हा ट्रेनिंग पूर्ण केलेल्या सर्व PSI ची शेवटची “पासिंग आउट  परेड” असते. सन्माननीय पाहुण्यांच्या  पुढे होणाऱ्या ह्या परेडचे कमांडर व्हायचा सन्मान ट्रेनिंग मधील फक्त सर्वोत्कृष्ट PSI लाच मिळतो.

त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेवूया पुढील आठवड्यात.

त्यांच्या ह्या अचीव्ह्मेंट बद्दल PSI Vishwas Chavanke ह्यांचे AD’s IAS Academy, ओझर (नासिक) तर्फे अभिनंदन व  त्यांचे Dy SP व्हायचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी  हार्दिक शुभेच्छा!!!

UPDATE – 18 Feb 2016:

आजच्या पी.एस.आय. विश्वास चव्हाणके बद्दल काही सांगावेसे वाटते.

जीवनात खूप जणांचा खडतर प्रवास असतो. विश्वास चा सुद्धा होता. विश्वास म्हणजे एक साधा सरळ मुलगा…एका सामान्य कुटुंबातील सामान्य माणूस पण स्वप्न मात्र फार उंच…

विश्वासचे स्वप्न “फक्त आर्मी” मध्ये जॉईन व्हायचे होते.

मुळचे कीर्तांगळी गावचे. सन 2003-04 मध्ये, वीस किलोमीटर वर असलेल्या सिन्नरच्या कॉलेजात असतांना बस पास साठी पैसे नव्हते. मग दुसऱ्याच्या शेतात काम करून, लोकांच्या ट्रक/Tractor मध्ये वाळू भरण्याचे काम करून पैसे कमवून त्यापैशांनी बस पास काढून आपले बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मग एम.ए. फर्स्ट इयर [English] करतांना MSCIT मिळवले. एक वर्ष शेती केली.

सन 2005 मध्ये पुणे बी.आर.ओ. मध्ये झालेल्या आर्मी च्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये Topper असूनही फायनल मेरीट लिस्ट मध्ये स्थान मिळाले नाही.

इच्छा नसूनही सन 2006 मध्ये नासिकला पोलीस भरतीत उभे राहिले व त्यांची निवड पोलीस कॉन्स्टेबल म्हणून झाली. तरीसुद्धा आपले स्वप्न सोडले नाही. ध्येय्य मात्र पी.एस.आय. व्हायचे केले. खूप मेहनतीने परीक्षेची तयारी केली पण तेव्हा सफलता मिळाली नाही. मग मालेगाव पोलीस स्टेशन ला असतांना 2010 मध्ये एडी’ज आय.ए.एस. अकॅडमी (ओझर) चा MPSC PSI 2011 पिजीपी जॉईन केला. MPSC PSI 2011 साठी खूप अभ्यास केला. पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी आठवड्यातून तीन-ते-चार वेळा ग्राउंड ची तयारी केली. पोलीस ड्युटी करूनसुद्धा पिजीपी मधील स्टडी प्लान नुसार दररोज तीन-ते-चार तास अभ्यास केला. सुट्टीच्या दिवशी दहा-ते-बारा तास अभ्यास केला. परीक्षेच्या आधीचे चाळीस दिवस तर फक्त 5 तास झोप घेतली, बाकीचे 19 तास फक्त आणि फक्त अभ्यास केला. अशा पद्धतीने ही परीक्षा खूप मेहनत करून पास केली.

PSI 2012 batch मध्ये PSI च ट्रेनिंग पूर्ण

आणि

आता नवीन ध्येय्य म्हणजे उप-जिल्हाधिकारी/डी.वाय.एस.पी. व्हायचच म्हणून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरु आहे.

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC PSI Exam and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

7 Responses to फटा पोस्टर निकला हिरो

 1. Harshad म्हणतो आहे:

  Sir Acp sathi physical test aste ka?

 2. Rajesh म्हणतो आहे:

  Sir I’m working in Revenue Dept. Govt. of Maharashtra as a Clerk. Due to doing job I don’t get time for study. How should I manage time of Rajyaseva Exam…?

 3. Arpita Shedge म्हणतो आहे:

  Dear Sir,
  sorry to disturb you. I am interested in MPSC Examination. But I have no Idea in this examination.
  So I request you sir please give me a proper information and guidence.

 4. rajat म्हणतो आहे:

  thank u sir for inspiring share.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.