Success Mantra#6 – Shortcut is injurious

मित्रांनो,

परीक्षा ऐन  तोंडावर आली असतांना बरेचजण मला विचारतात कि आता “माझी तयारी होईल का?”, “मला सफलता मिळेल का?”, “मला तुमच्या पिजीपी चा फायदा होईल का?”

मित्रांनो, ह्या बाबतीत खूप खोलवर विचार करून निर्णय घ्यावा असे माझे सांगणे आहे. प्रत्येकाने आपले भविष्य लवकरात लवकर घडविणे अपेक्षित असते परंतु त्यासाठी कोणत्याही परीक्षेची जाहिरात आली कि लगेचच त्याचा अर्ज भरणे आणि माझ्यासारख्यावर “प्लानिंग करून देण्याचा भार टाकणे” योग्य नव्हे. अशा वेळेस शोर्टकट घेणे तुमच्याच भविष्यासाठी हानिकारक आहे.

परीक्षा केव्हा द्यायची हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल कारण योग्य ती तयारी करूनच सफलता मिळवू शकता.  तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे कदाचित नुकसान तुमचेच होवू शकते. अशा वेळेस पुढील बाबतीत विचार करावा हा माझा आग्रह नेहमीच राहील:

 • ही खरी परिस्थिती आहे कि एमपीएससी परीक्षेत (प्रत्येक  परीक्षेत) कमी गुण मिळाल्यामुळे बरेच उमेदवार नाउमेद होतात. ते असे का घडते ह्याचा विचार केला तरी का?
 • परीक्षा तोंडावर आली असता, कमी वेळ उपलब्ध असतांना, घाईघाईने अभ्यास केल्यास प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मुद्द्यावरील सखोल अभ्यास होत नाही. बरीच माहिती न वाचता राहून जाते आणि मग त्यामुळे कमी मार्क्स मिळतात.
 • कमी वेळ मिळाल्यामुळे परीक्षेच्या तयारीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.
 • व्यवस्थितपणे नोट्स काढायला वेळ मिळत नाही आणि हीच घोडचूक तुमच्या हातून घडते. सर्वात जास्त हानिकारक गोष्ट हीच आहे हे लक्षात ठेवा. ज्या नोट्स ची मदत तुम्हाला व्हायला पाहिजे ती होत नाही.
 • बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवण्याच्या प्रयत्नात डोक्यात खिचडी निर्माण होते.
 • अभ्यासात मन लागत नाही. एकाग्रता येत नाही. घाईघाईने खूप काही कम्प्लीट करण्याच्या प्रयत्नात बरेच काही राहून जाते. ह्यामुळे आत्मविश्वास कमी होत जातो आणि परीक्षेपुर्वीच्या काही दिवसातच तो पूर्णपणे संपून जातो. ह्याचा असर परीक्षेत तुमच्या पर्फोर्मंस वर नक्कीच होतो आणि मग तुम्ही दोष दुसऱ्याना देता.
 • अशा कमी वेळेत अभ्यासासाठी ज्या पूरक गोष्टी असतात त्यासाठी वेळच देता येत नाही आणि मग तयारी पूर्ण होत नाही. पूरक गोष्टी म्हणजे  चालू घडामोडीवर नोट्स काढणे, निबंध लिहून पाहणे, रिविजन, सराव परीक्षा, इत्यादी. आम्ही ह्यासाठी विकली नॉलेज टेस्ट, विकली निबंध असाइनमेंट ठेवल्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत. लक्षात ठेवा कि हे सर्व व्यवस्थित केल्यानेच तुमचा अभ्यास पूर्ण होवू शकतो आणि परीक्षेत सफलता मिळवायला मदत होते.
 • सराव परीक्षा, नॉलेज टेस्ट आणि निबंध असाइनमेंट  हे सर्व कशासाठी आहेत? तुम्ही जे शिकलात, जे शिकत आहात ते सर्वतुम्हीच व्यक्त करून, तुमची तयारी किती झाली हे तुमच्या लक्षात येण्यासाठी असतात. तुम्ही जे काही अभ्यासले आहे ते reproduce करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.
 • एमपीएससी च्या परीक्षा म्हणजे काही खेळ नव्हे. अशा परीक्शेंची तयारी करायची म्हणजे एक दोन दिवस नाही, एक महिना नाही तर अनेक महिने किंवा कमीत कमी एक वर्ष तरी लागते. ह्याची प्रचीती वारंवार असफल होणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक परीक्षेनंतर येतच असते, होय ना?
 • अभ्यासाचा अर्थ म्हणजे फक्त वाचन नव्हे. वाचून घेवून ते आत्मसात झाले पाहिजे (पाठांतर नाही). आजकालचे प्रश्न ज्या स्वरूपात एमपीएससी विचारते त्या अनुषंगाने वाचन करावे. योग्य ते नोट्स तयार करावेत म्हणजे भविष्यात ते फक्त वाचले कि सर्व मुद्दा समजायला हवा.
 • कमी वेळ आहे म्हणून तुम्ही हवा तसा अभ्यास करू शकणार नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा हा की एमपीएससी चा अभ्यास करावा तो योग्य प्रकारे प्लानिंग करूनच. वाचन, मनन, व नोट्स साठी त्यात वेळ दिलेला असावा. त्यांनतर रिविजन साठी सुद्धा वेळ दिलेला असावा.  रिविजन कधीही उशिरा करू नये. सुरुवातीपासूनच रिविजन ची सवय ठेवावी. ह्यामुळे काय होईल माहितीये? तुमचे सखोल वाचन होईल, माहिती आत्मसात होईल आणि सराव परीक्षेत त्याचा फायदा होईल. तुम्ही विसरणार नाही.
 • कमी वेळ आहे म्हणून तुम्ही वेळा-पत्रक (टाईम टेबल) बनवणार नाही आणि त्यामुळेच गोंधळ उडेल. हे पुस्तक करू कि ते पुस्तक करू असे होईल आणि सरतेशेवटी बरीच पुस्तके बाकी उरतील व त्यांचा अभ्यासच होणार नाही. म्हणून  वेळा-पत्रक (टाईम टेबल) बनवाच बनवा आणि त्याला चिकटून अभ्यास करा तरच पूर्ण अभ्यास होईल आणि ह्यासाठी वेळ तर लागणारच. फक्त तुमच्या आवडीच्या विषयांचा करू नका, सर्वच विषयांचा व topics चा करा.
 • एमपीएससी ची परीक्षा जवळ आली व कमी वेळ आहे म्हणून स्ट्रेस येणारच. त्यातच तुम्ही जास्तीत जास्त वेळ देवून अभ्यास करणार आणि मग ताण ओढवून घेणार. तुम्हाला झोप सुद्धा लागणार नाही आणि अशा परिस्थितीत तुम्हाला वाटते का तुमचा योग्य तो अभ्यास होईल? अभ्यास व रिविजन करतांना स्ट्रेस नकोय. तुम्ही घाईगडबडीत अभ्यास न करता योग्य त्या प्लानिंगनुसार अभ्यास केला तर तो होईल आणि स्ट्रेस सुद्धा नसल्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढत राहील.
 • कमी वेळ आहे म्हणून तुम्ही रात्र-रात्र जागरण कराल. ते तुमच्यासाठी घातक  आहे. लक्षात ठेवा- रात्री कमीत कमी ६ तास झोप व्हायलाच पाहिजे. सहा ते आठ तासाची झोप चांगली असते. एक वर्षभर अभ्यास करणार असाल तर मग रात्र -रात्र जागून काढायची गरजच भासणार नाही.
 • कमी वेळ आहे म्हणून तुम्ही सराव प्रश्नसंच आणून तेच सोडवत बसाल. हे चुकीच आहे. त्यापेक्षा मागील एक किंवा दोन वर्षांचे एमपीएससीच्या प्रश्न पत्रिका बघा, काय व कसे प्रश्न विचारल्या जातात ते बघा आणि मग त्यानुसार सखोल अभ्यास करा, नोट्स बनवा, रिविजन करा आणि मगच सराव प्रश्नसंच सोडवत बसा. ह्यासाठी वेळ तर लागणारच.
 • वेळ कमी आहे म्हणून तुम्ही लागोपाठ तासंतास अभ्यासच करत बसणार. हे अगदी चुकीचे आहे. कधीही ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करू नये. ३० मिनटे झालीत कि ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. परत ३० मिनटे अभ्यास आणि मग परत ५ मिनिटे ब्रेक. असे करूनच अभ्यास करावा.
 • माझ्या मते योग्य काय आहे माहित आहे? ज्यांनी माझा ब्लोग वाचला आहे व वाचत आलेत व ज्यांनी सक्सेस मंत्र म्यनुअल वाचल आहे त्यांना माहित आहे कि योग्य ते जेवण करून, शांत झोप घेवून मग अभ्यास केल्यास त्याचा फायदा तुम्हाला होतोच.  प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढावाच लागतो, वेळ द्यावाच लागतो. तुम्ही जर एक वर्ष भर प्लानिंग नुसार सखोल तयारी केली तर त्याचा फायदा तुम्हालाच होईल, मला नाही, समजल?
 • ज्यांना वेळ मिळत नाही किंवा जे वेळ काढू शकत नाहीत सखोल अभ्यास करायला त्यांनी मात्र एमपीएससी चे स्वप्न पाहणे सोडून द्यावे.

मित्रा, वरील सर्व परत एकदा वचून घे आणि मग ठरव कि शोर्ट कट मारायचा कि सखोल अभ्यास करायचा. निर्णय तो शेवटी तुमचाच राहील कारण करीयर तुम्हालाच घडवायचे आहे. तुमच्या भविष्याचा निर्माणकर्ता कोण आहे? ….. तुम्ही स्वत:च!!! You are the creator of your own destiny!!!

गुड लक ह!!!

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services and tagged , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

41 Responses to Success Mantra#6 – Shortcut is injurious

 1. Madhuri chorghe म्हणतो आहे:

  सर मी YCM मधून BA करत आहे aani job pn karate…मला sti chya exam chi tayari karaychi aahe…..study kasa karata me

 2. nita sopan sontakke म्हणतो आहे:

  sir Aso post badl mahiti ani book list badl saga

 3. satyapal rathod म्हणतो आहे:

  Sir me B.A-1 year la ahe tar sir mala psi banayeche ahe tar sir me study kashi kaili pahije ani starting kothun karu…

 4. Somshruti म्हणतो आहे:

  Can I get this book at Latur?

 5. Mangesh Pole म्हणतो आहे:

  hii sir.. mi engg.chya final year la computer science la aaahe..mazhi MPSC denyachi khup iccha aahe ani mla ti crack pn kraychiy..but sir mi confusion mdhye aahe ki adhi prelims chi tyari kru ka mains chi kru bcoz CSAT mla khup changlya prakare jmte so ..ani mla study aajpasun start kraychi tr mi start kshapasun kru..guidence pahijet hot??? rpl fast sir…

 6. Mahesh K. म्हणतो आहे:

  Sir I got 132. I am in general category. Don’t know about second answer key, that how many marks will increase or decrease? May I focus on mains? Or STI prelim? Which will better to me?

 7. Prabhakar Vantale म्हणतो आहे:

  Sir, Yashvantrao chavhan mukt vidyapithachi padavi asel tar UPSC deta yete ka???

 8. sagar bhosale म्हणतो आहे:

  Sir, Yashvantrao chavhan mukt vidyapithachi padavi asel tar mpsc deta yete ka???

 9. jaydeep म्हणतो आहे:

  Dear Sir,

  I have sent an email, regarding e-prospectus for State Services (Preliminary and Mains) . Could you please let me send list of Reference books for Pre and Mains for State Service.
  Email ID: jay*****

  Waiting for positive response.

  Thanks for your support and understanding as always!!

  I really appreciate your great time.

  Regards,
  Jaydeep

 10. Priti sharma म्हणतो आहे:

  Sir Psi,sti chi exam denyasathi kiti Chanses ahe….

 11. akash sagar म्हणतो आहे:

  sir ,Thanku for tip,sir mala ata pasun tayari karyachi ahe.me S.Y.B.A. la ahe pan , mala time khup kami melto ahe.2years ahe mala paper la magi tayari purna hoyale ka.

 12. mahesh ramesh mistri म्हणतो आहे:

  sir mi mba complete ahe ata mala mpsc karayachi ahe tar starting kashi karavi sir plase khuo confuse zalo ahe sir nakki kay wachave tech kalat nahi please ………………. sir

  • AnilMD म्हणतो आहे:

   @महेश, एमपीएससी च्या अभ्यासक्रमानुसार तयारी करावी लागेल आणि त्यासाठी जास्तीत जास्त पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचून स्वत:चे नोट्स तयार करावे लागतील. संपूर्ण पुस्तकांची लिस्ट ई-प्रोस्पेक्ट्स मध्ये उपलब्ध आहे.

 13. varsha sonone म्हणतो आहे:

  hello sir,i am varsha. i am completed my BA in english litreature. i am too much interested in IAS exam.so plz tell me about competetive exams about mpsc/upsc.reply

 14. Prerana bhajanawale म्हणतो आहे:

  Hello sir,mi biomedical engg.ahe.mazhi swapn ahe mpsc chi exam pass karnyach,sir basic informationsati kont book refer karaych,

 15. ravi taral म्हणतो आहे:

  Sir ha blog khupch mast aahe sir mala mpsc badlch mahiti ani abhyas kasa karava

  • AnilMD म्हणतो आहे:

   @रवी, जी परीक्षा द्यायची आहे त्याचा मेनू (जसे “MPSC Rajyaseva”, “MPSC PSI”, “MPSC STI”, etc) बघून सर्व माहिती वाचून व समजून घ्यावी आणि तयारीला लागावे.

 16. bapu phadtare म्हणतो आहे:

  Hello sir
  I will try to follow your advice. But sir I am not able to give sufficient time for study b’coz of my job.my time goes almost 10 hours everyday in my office instead of saturday & sunday. I really want to get success in mpsc exam.plz advice how can I plan for mpsc study?

 17. अतुल धांडे म्हणतो आहे:

  धन्यवाद सर,,तुमच्या ह्या पोस्टमुळं माझे डोळे उघडले.

 18. samp patil म्हणतो आहे:

  thanks sir, sti pre sathi ani rajsava pre sathi ekatrit study sathi kai karta yeil ? tayvar kahi sanga……..

  • AnilMD म्हणतो आहे:

   @संदीप, हो करता येईल. सारखे विषय/मुद्दे आहेत त्यांची तयारी करावी आणि बाकीचा अभ्यास वेगळा करावा. स्टडी प्लान लिखित स्वरूपात तयार करूनच अभ्यास करावा.

 19. chandrakant patil म्हणतो आहे:

  excellent….thanks a lot.

 20. Kiran S Vyas (Pardeshi) म्हणतो आहे:

  Thank you for this Success Mantra.
  Sir I am studying for RS (Dy. Collector) since July 2013 and had done planning keeping “RS in May 2014” in mind but last month MPSC had announced that Exam for DC & Tahashildar will be conducted in Jan 2014. I Know i wont be able to complete thorough required study by Jan. Please GUIDE me. I am 27 Yrs old working person (BE-Mech & MBA-Marketing).

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.