मित्रांनो,
खूप दिवसांपासून मला स्वत: ह्या बाबतीत सांगायचेच होते कारण खूप उमेदवार ही चूक करू शकतात जी त्यांनी करायला नकोय.
ह्या ब्लोगवर तुम्ही बऱ्याच जणांचे प्रश्न वाचत आलात आणि त्यावर माझे उत्तर सुद्धा. प्रश्न असे असतात कि “माझा ह्या परीक्षेत इतका स्कोर आहे मी इंटरव्यू साठी तयारी करू का?” , “मी इतका स्कोर असल्यामुळे ही परीक्षा पास/क्लियर होईल का?” वगेरे वगेरे.
मित्रांनो, एक लक्षात घ्या कि असे प्रश्न विचारण्यामागे त्यांचे तात्पर्य काय असते? एक तर त्यांना झालेल्या परीक्षेत चांगले गुण मिळालेत म्हणून पुढील परीक्षेसाठी तयारी करण्याची गरज वाटत नाही नाही तर परत एकदा कठीण परिश्रम करण्याची मनाची तयारी नसते.
ह्यावरच आहे हा सक्सेस मंत्र #7 – Do Not Wait.
मित्रांनो, प्रत्येक परीक्षा झाल्यावर तुम्हापैकी प्रत्येकाने २ ते ४ दिवसांचा ब्रेक घ्यायलाच पाहिजे हे माझे स्वत:चे मत आहे. तुमची एनर्जी भरून निघाली पाहिजेच. झालेल्या परीक्षेत तुम्ही सफल व्हायलाच पाहिजे हि तुमची आणि माझीसुद्धा इच्छा असते.
तुम्हाला चांगले गुण मिळाले किंवा मिळतील (झालेल्या परीक्षेत) तर चांगलेच आहे ना परंतु तुम्ही त्याचा रिझल्ट येईल पर्यंत वाट पाहू नका असे माझे मत आहे. पुढील वर्षाच्या तयारीला लागा कारण हातात असलेली वेळ निघून जावू नये. आता पर्सेंटाइल पद्धत लागू झाली आहे आणि तुमचे इंटरव्यूसाठीचे सिलेक्शन तुमच्या गुणावर आधारित तर आहेच पण त्याही पेक्षा “सर्वात जास्त गुण ” मिळवणाऱ्या उमेदवारावर आहे. असेही होईल कि एकच गुण संख्या असणारे अनेक उमेदवार असतील. मग तेव्हा खरी ती प्रतियोगिता ठरेल.
लक्षात घेण्यासारख अजून एक आहे कि समजा तुमचे इंटरव्यूसाठी सिलेक्शन झाले परंतु तुम्हाला फायनल रिझल्ट मध्ये स्थान मिळाले नाही किंवा फायनल रिझल्ट मध्ये हवे ते पद मिळाले नाही तर!
तुम्हाला जे पद हवे आहे ते मिळवण्यासाठी निश्चितच पुढील परीक्षा द्यावी लागेल !
ह्या वेळी तुम्हाला फायनल रिझल्ट मध्ये स्थान मिळाले नाही तर निश्चितच पुढील परीक्षा द्यावी लागेल !
असे होवू शकते कि :
- झालेल्या परीक्षेचा निकाल काही कारणास्तव पुढील वर्षाची परीक्षा होईपर्यंत लागलाच नाही तर!
- किंवा फायनल रिझल्ट मध्ये स्थान मिळाले नाही हे तुम्हाला उशिरा समजले तर!
- पुढील वर्षाची (२०१४) परीक्षा झाल्यानंतर ह्या वर्षीचा (२०१३) चा रिझल्ट आला तर!
मग अशा परिस्थितीत वेळ घालवणे योग्य नाही. त्यासाठी काय करावे?
- कोणत्याही परीक्षेच्या रिझल्टची वाट न बघता पुढील परीक्षेची तयारी करणे योग्य असते.
- कोणत्याही परीक्षेची जाहिरात येण्याची वाट न बघता त्या परीक्षेची पुरेपूर तयारी करणे योग्य असते.
- कमीत कमी १ ते २ वर्ष अगोदर तयारीला लागायला पाहिजे तरच पुरेपूर अभ्यास होवू शकतो.
मित्रांनो, जरा विचार करा वरील गोष्टींचा आणि मगच ठरवा काय करायचे ते!
Respected sir,
I am Anand Ausekar., completed my MBA finance which is
equivalent to M.COM and With a statistics subject for both in graduation
and post graduation.
I have a 100 marks subject of statistics for both graduation and
Post graduation. also i have applied for this post earlier in 2011 for same
post and my application was accepted , i got hall ticket for exam at that
time.
Please find here attached Mark sheet of MBA.
I want to apply for the post of statistical officer,
commissionerate of Finance and Statistics GSS-B exam. but unfortunately on
my profile it is showing qualification criteria is not as per given in
advertisement.
So please guide me on the same because i have eligible
educational criteria and experience as per the advertisement and i am fully
qualified for this exam.
*Thanks and Regards,*
Anand Ausekar
Latur. Maharashtra, India.
Mobile: +91 94*********
email ID :anand.ausekar@gmail.com
2013/11/12 AnilMD’s Blog – Personal Guidance for UPSC & MPSC Exams,
@Anand, in this case, you need to contact MPSC office.