Success Mantra #8 – No Pain No Gain

मित्रांनो,

सक्सेस मंत्र देण्याचा उपक्रम कशासाठी आहे? तुम्हा लोकांना सफलता मिळवण्यासाठी माझी मदत व्हावी म्हणून!!! खालील गोष्टी वाचतांना त्या फार सामान्य वाटतील परंतु त्याकडे बऱ्याच  जनांचे दुर्लक्ष होत असते म्हणून एक आठवण करून द्यावी म्हणून लिहितोय.

एक लक्षात घ्या… कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात व कष्ट सुद्धा. पुढील जीवनात आनंद घ्यायचा असेल आणि पुढील जीवन सुखात घालवायचे असेल तर आज रोजी फार कष्ट घ्यावे लागतात.

आपण बघतो कि सोल्जर (सैनिक) किंवा कमांडो आपले काम किती तत्परतेने, जास्त वेळ न लावता अचूक करतात; ते काम कितीही कठोर असले तरीही !!! का बरे ?

त्यांच्या ट्रेनिंग बद्दल ज्याला माहिती आहे तोच हे जाणतो. सैनिकांच्या व कमांडोजच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना अगदी कठोर परिश्रम करावे लागतात. दिवस-रात्र  (झोपण्याची वेळ सोडून) त्यांचे ट्रेनिंग चालूच असते. त्यासाठी शारीरिक ट्रेनिंगसुद्धा तशीच मिळते. त्यांना कितीही त्रास झाला तरीसुद्धा ती टास्क पूर्ण करावीच लागते. गुडघ्यातून, हाताच्या (elbow) कोपरातून कितीही रक्त निघाले तरीसुद्धा त्यांना दिलेली टास्क पूर्ण करावीच लागते. त्याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील जीवनात (नौकरीत) होतो आणि ते न थकता दिलेले काम योग्य रीतीने पूर्ण करू शकतात.

तुम्हाला सुद्धा युपीएससी किंवा एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो, क्लियर करण्यासाठी निरंतर, अथक परिश्रम घ्यावेच लागतात. दररोजचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बाकीचे सर्व काही विसरून फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच करावा लागेल; झोप येईपर्यंत तेच आणि तेच करावे लागेल.

तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला न थकता अभ्यास करावाच लागणार आहे. कारण त्यामुळेच तुम्हाला भावी जीवनात अधिकार, स्टेटस, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक सुरक्षा मिळेल.

जितक्या लवकर तुम्हाला ही गोष्ट समजेल ते तुमच्यासाठी चांगले होईल.

अभ्यास करतांना तुम्हाला कितीही शारीरिक किंवा मानसिक यातना झाल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावेच लागणार आहे.  अभ्यास करतांना हे सर्व विसरून शांतपणाने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्याची मदत तुम्हालाच होईल, अभ्यासातही आणि परीक्षेतही. लक्ष केंद्रित करावयाचा सराव होईल आणि त्याचा फायदा पेपर सोडवण्यासाठी १००% होईल. अशा सरावामुळे तेव्हा तुम्ही भलताच विचार करत बसणार नाहीत (जसे : प्रश्न किती कठीण आहेत? सर्व प्रश्न मी सोडवू शकेल का? माझे उत्तर बरोबर असेल का? मला किती मार्क्स मिळतील, कट ऑफ किती राहणार आहे? निगेटिव्ह मार्किंगमुळे माझे गुण कमी होतील का? वगेरे वगेरे).

अभ्यास करण्यापुर्वी तुमचे धेय्य निश्चित करा: उप जिल्हाधिकारी व्हायचे कि पी एस आय व्हायचे? राज्यसेवा द्यायची कि एस टी आय /पी एस आय परीक्षा द्यायची?

आणि एकदा ते केले कि त्यावरच फोकस करा.

शेवटपर्यंत योजनाबद्ध व कार्यक्षम (एफिशियेंट) राहावे, नियोजनानुसारच अभ्यास करत राहावे. तुमच्यात काय कमतरता आहे, तुम्ही कशात कमी पडता ह्याचे भान ठेवून त्यावर मार्ग शोधा आणि मग अधिक परिश्रम करून त्यावर मात करा.

नेहमी विचार करा कि “मी खूप  बुद्धिमान आहे, हुशार आहे आणि मला ज्ञानाची व वेळेची किंमत माहित आहे. म्हणुनच मी जो अभ्यास हातात आहे तो मी वे वेळेवरच पूर्ण करणार आहे.”  मग त्या क्षणी करत असलेल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आजचा अभ्यास आजच पूर्ण करा.

तुम्ही स्वत: तुमचे समीक्षक/टीकाकार व्हा आणि वेळ आली तर स्वत:वर दया करू नका. जे करायचे ते वेळेवर पूर्ण कराच करा, काहीही झाले तरी. नेहमी हाच विचार करा कि “अभ्यासासाठी मी ह्यापेक्षाही जास्त वेळ देवू शकतो. जितका वेळ निघतो त्यापेक्षाही जास्त वेळ मी काढू शकतो.” … काढा आणि काढूनच दाखवा स्वत:ला. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाठी जास्त वेळ देवू शकाल. हे करण्यासाठी कितीही परिश्रम लागले तरीही…कितीही त्रास झाला तरीही.

एक गोष्ट मात्र विसरू नका…. नो पेन नो गेन (No Pain No Gain)…

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

16 Responses to Success Mantra #8 – No Pain No Gain

 1. Abhijit kulkarni म्हणतो आहे:

  Thank you sir

 2. Shreekant Yashwant Birare म्हणतो आहे:

  Thank You Sir.

 3. Rohit म्हणतो आहे:

  Hi sir,
  mi aata TE mechanical engineering la aahe. mi tahsildar ya postsathi interested aahe mi atapasun MPSC chya preperation sathi kay kru shakto, MPSC sathi PUNARVASAN quoata madhun reservation bhetate ka???

 4. KARE VISHNU म्हणतो आहे:

  SIR MALA UP ZILHA ADHIKARI ANI UP SHIKSNA ADHIKARI YA POST BADDAL MAHITI HAVIY

  • AnilMD म्हणतो आहे:

   @विष्णू, त्यासाठी राज्यसेवा परीक्षेची तयारी करावी. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ७०-७५ पुस्तकांचा सखोल अभ्यास करावा. उप-शिक्षणाधिकारी परीक्षा मी monitor करत नाही.

 5. Ankush Shende म्हणतो आहे:

  thanks sir
  tumche tips vachun mala changle margdrshan milale

 6. piyush dilip fulzele म्हणतो आहे:

  sir mi ba 1 la ahe mala attapasun mpsc chya examchi tayari karayachi ahe tar mala kontya notes ghyavya lagtil

 7. Sachin Gaikwad म्हणतो आहे:

  Thank you so much sir……

 8. kiran giri म्हणतो आहे:

  Thanks sir

 9. sharad म्हणतो आहे:

  thanks sir

 10. ravi म्हणतो आहे:

  very good thought.thanks

 11. danishsheikh121 म्हणतो आहे:

  Thank You sir. Your motivation will help us.

 12. Navin म्हणतो आहे:

  thank you sir.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.