Hi Friends
शेवटी तो दिवस जवळ आलाच ह!
ह्या सुंदर दिवसासाठी मला माहित आहे तुम्ही फार मेहनत घेतली असेल आणि तुम्ही खूप स्ट्रेस घेतला असेल होय ना?
खूप झाला अभ्यास आता. उद्या परीक्षा आहे म्हणून नक्कीच टेन्शन आल असेल ना? हा स्ट्रेस सोबत घेवून उद्या परीक्षेला जाऊ नका, तो आजच संपवून टाका आणि एक निश्चिंत झोप घ्या.
एक गोष्ट लक्षात ठेवा कि अंग दुखत असेल किंवा डोके दुखत असेल तर कसलीही मेडिसिन घेवू नका कारण त्याचा असर उद्या तुमच्या पेपर वर नक्कीच होईल हे लक्षात ठेवा.
तुमचे प्रवेश पत्र व काळ्या शाईचे Ball पेन काढून ठेवा…आज रात्रीच !!!
रात्रीच्या जेवणात अंडे खा (तुम्हाला चालत असतील तरच खा).
रात्री १२ पर्यंत अभ्यास करा आणि कमीत कमी ६ तास शांत झोप घ्या. उद्या सकाळ पर्यंत अभ्यास करत बसू नका. रात्र जागून काढू नका!! नाहीतर उद्या थकून जाल.
“कसली शांत झोप सर?” असे म्हणू नका.
अरे मित्रा, आज पर्यंत अभ्यास केला ना मग आता टेन्शन घेवू नकोस. रात्रीत कमीत कमी ६ तास झोप घे. शांत झोप येण्यासाठी काय करायचे ते सांगतो ना मी. झोपायला जाण्यापूर्वी आज रात्री २-३ छान गोड गाणी मोबाईलवर (कानाला हेड फोन) लावून ऐका…नक्कीच हेड फोन लावा. जर नसतील तर काही अडचण नाही, त्यांच्याशिवाय ऐका पण नक्कीच ऐका.
To relieve your stress….simply listen to the soft melodious songs of your choice, especially love songs….आणि मग झोपायला जा. आजकालचे धांगड धिंगा टाईप गाणे प्लीज ऐकू नका.
तुमची चोइस वेगळी असू शकते. काही गाणे ही आहेत:
एक दुजे के लिये – “हम तूम दोनो जब मिल जायेंगे”
नुरी – “आजा रे ओ मेरे दिलबर आजा”
साजन बिना सुहागन – “मधुबन खुशबू देता…”
कभी कभी – “कभी कभी मेरे दिल मे …” (फिमेल)
जानी दुश्मन – “सारे रिश्ते नाते सब छोड के आ गयी”
जुली – “दिल क्या करे जब किसीको किसीसे प्यार हो जाये”
उद्या सकाळी लवकर उठावे.
- फ्रेश होवून सकाळी 8:30 पर्यंत नाश्ता करावा. ९ च्या नंतर केला तर पेपरच्या वेळी झोप येण्याची शक्यता राहील. जितक्या लवकर करता येईल …करावा.
- सोबत एखादे फ्रुट (No Banana plz) किंवा एकच पोळी व थोडी भाजी घ्यावी किंवा लाईट नाश्ता घ्यावा.
- तयारी करून परीक्षा केंद्रावर १ तास आधीच पोचावे.
- 10 वाजता फ्रेश व्हावे – म्हणजे पेपर दरम्यान त्रास होणार नाही. 🙂
- GS Paper I झाल्याबरोबर एखादे फ्रुट (No Banana plz) किंवा एकच पोळी व थोडी भाजी खावे. खायला उशीर करू नये. 1:30PM च्या आतच खावून घ्यावे म्हणजे ते पचून जाईल आणि GS Paper 2 च्या वेळी झोप येणार नाही.
तर गुड लक मित्रांनो !!!
thank you sir.
Thank u so much sir …….