2017 – Rajyaseva Prelims : Waiting for it?

मित्रांनो,

येत्या काही महिन्यांत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ची जाहिरात येईल आणि त्यावेळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांची झोप उडून जाईल. का? जाणून घ्यायची इच्छा आहे? तर पुढील लेख वाचत रहा…

मागील 32 (बत्तीस) वर्षांपासून मी बघतोय कि युपीएससी असो वा एमपीएससी असो, आपल्या हातात असलेल्या वेळेचे नुकसान करणे ह्या परीक्षेंच्या इच्छुकांच्या जीवनाचा एक भागच बनला आहे. होय, हे खरं आहे मित्रांनो!

ज्या दिवशी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात येते ना तो दिवस आणि पुढील काही दिवस गोंधळात टाकणारे, काही जणांसाठी जबरदस्त तर काहींसाठी थोडे धडकी भरवणारे दिवस असतात. काही जणांनी ह्या परीक्षेच्या तयारीला फार आधीपासून सुरुवात केलेली असते आणि बाकीच्यांनी सुरुवात केलेलीच नसते. ते फक्त जाहिरात येते कि नाही ह्या संभ्रमात असतात व ती येण्याचीच वाट बघत असतात. आता काय करावे हे सुचतच नाही…..मग?

अशा दोन्हीं प्रकारच्या इच्छुकांनी (उमेदवारांनी) आज (02 ऑक्टोबर 2016 रोजी) आपले लक्ष कशावर केंद्रित करायला पाहिजे माहित आहे काय?…..तुमचं लक्ष आता “कसे करावे” ह्यावर केंद्रित करायला हवे कारण परीक्षेची जाहिरात येण्यास फक्त दोन ते अडीच महिने बाकी आहेत व परीक्षा एप्रिल मध्ये असेल असे गृहीत धरल्यास परीक्षेच्या तयारीसाठी साधारण सहा महिने हातात आहेत. त्यामुळे कसे करावे ह्याकडे लक्ष देवून खालीलप्रमाणे तयारीला लागावे.

 • स्वीकार करा: गोंधळून जावून चालणार नाही. आपल्या हातातील वेळ निघून जात आहे हे जितक्या लवकर लक्षात घ्याल तितक्या लवकर ह्याचा स्वीकार कराल. तुमच्यापैकी अनेक जणांनी मागील काही वेळा ही परीक्षा दिली असेल त्यांच्यासाठी तर ही सहा महिन्यांची वेळ फार महत्वाची आहे. आपण किती attempt दिलेत ह्याकडे दुर्लक्ष करू नका. जास्तीत जास्त वेळ फक्त आणि फक्त अभ्यासाला द्यायची ह्याचा स्वीकार करा आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणायचा निर्धार करा.
 • आपल्या अभ्यासाचे मुल्यांकन करा: आता आपल्या हातातील वेळ निघून जात आहे ह्याच्या जेव्हा तुम्ही स्वीकार केलाच आहे तर मग आता गेलेली वेळ वापस येणार नाही ह्याचा विचार करून एक पाऊल मागे घेवून, विचार करून पुढील तयारीला कसे लागायचे, आजपर्यंत किती अभ्यास झालेला आहे व उपलब्ध वेळेत आपला अभ्यास कसा पूर्ण होईल ह्याचा विचार करा. घाबरून जावू नका. तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सारखे वेळकाढू लाखो आहेत व ते सुद्धा आता तयारीला लागतील लागतील हे लक्षात घ्या.
 • प्लानिंग करा: ज्या चुका केल्यात त्या परत न करण्याचा निर्धार करा. आजपासून फक्त सहा  महिने हातात आहेत हे लक्षात घेवून अभ्यासाचं नियोजन करा. प्रत्येक विषय कसा पूर्ण करता येईल ते बघा. प्रत्येक विषयाचा प्रत्येक मुद्दा कवर होईल ह्याची काळजी घ्या. प्लानिंग केली नाही तर हे शक्य नाही बरं का!
 • कसे करावे:
  • सर्वात आधी राज्यसेवा पूर्व  परीक्षा 2016 च्या दोन्ही प्रश्नपत्रिका घ्या. त्या एमपीएससीच्या वेब साईट वर उपलब्ध आहेत.
  • अभ्यासक्रमात असलेले सर्व विषयातील सर्व topics च्या लिस्ट तयार करा.
  • त्यानुसार प्रश्नपत्रिके मधील विचारण्यात आलेले प्रश्न सर्व topics नुसार त्यांच्या पुढे लिहून घ्या. असे केल्याने तुम्हाला अंदाज येईल कि कशा प्रकारचे प्रश्न त्या त्या  topic वर विचारल्या जाऊ शकतात.
  • अशा प्रकारचा analysis केल्यावर तुम्हाला कळेल कि ६ वी ते १२ वी च्या पुस्तकांचा तसेच advance पुस्तकांचा गहन अभ्यास करावा लागेल.
  • कोणती पुस्तके घ्यावीत हे सुद्धा अति महत्वाचे आहे आणि त्यांचा अभ्यास करून स्वत:चेच नोट्स काढावेत हे विसरून चालणार नाही.
  • पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असतांना मुख्य परीक्षेला विसरू नका. मुद्दे जे महत्वाचे वाटतात ते लिहून काढा. पूर्व आणि मुख्य परीक्षेत साम्य असलेले topics व्यवस्थित तयार करा.
  • सर्वात आधी सामान्य अध्ययन पेपर 1 चा अभ्यास  व मग 2 चा करा.
  • अभ्यास करतांना वेळोवेळी रिविजन करत चला. नाहीतर विसरून जाल जो अभ्यास झाला तोच!त्यासाठी लिखित स्वरुपात स्टडी प्लान तयार करा. त्याशिवाय तुम्ही स्वत:ची अभ्यासाची प्रगती पुढे चालू ठेवू शकणार नाही.
  • मुख्य मुद्दे, मग ते पुस्तकात असो किंवा मासिकात व वर्तमानपत्रात असो, अंडरलाईन करा व मग नोट्स च्या स्वरुपात लिहून काढा.
  • एका विषयासाठी कमीतकमी 4 ते 5 पुस्तके वाचा.  जास्त सुद्धा वाचण्याची गरज पडू शकते. उदाहरणार्थ, इतिहास साठी तर 6 ते 8 पुस्तके वाचावे लागतील. कारण एका पुस्तकात जे आहे ते परिपूर्ण असेल हे सांगता येत नाही.
  • एक विषय अभ्यासाला घेतला तर तो संपेपर्यंत दुसरा विषय हातात घेवू नका. त्यावर नोट्स सुद्धा तयार करा.  स्टडी प्लान नुसारच तयारी करा.
  • आपल्या हातात किती दिवस आहेत ते बघा.  प्रत्येक विषयाला किती दिवस देता येतील ते ठरवा. त्यासाठी त्या विषयासाठी किती पुस्तके वाचावे लागतील हे अगोदर बघा आणि मग लागणारे दिवस किती हे बघा.
  • 2017 साठी तयारी करत आहात तर सर्व विषयांची तयारी पूर्व परीक्षेच्या 1 महिन्याआधी पूर्ण व्हायला पाहिजे.
  • एका विषयाचा अभ्यास संपला कि त्याची रिविजन करून घ्या व त्यावर सराव परीक्षा द्या, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून बघा. लक्षात ठेवा कि ह्याशिवाय दुसरा मार्ग नाही तुमची तयारी कितपत झाली हे तपासून बघायला!!!
  • राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कमीतकमी 35 ते 40 पुस्तकांचा अभ्यास करावाच लागेल तर हे लक्षात ठेवूनच स्टडी प्लान बनवा व त्या प्रमाणे तयारी करा.
  • ह्या व्यतिरिक्त पुढीलपैकी जी मासिके जमेल ते वाचून काढत चला व त्यामधील अति-महत्वाच्या topics वर नोट्स तयार करा: लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, सायन्स रिपोर्टर, सिविल सर्विसेस क्रोनिकल, इंडिया टुडे, फ्रंटलाईन, मेनस्ट्रीम, न्यूजवीक, इत्यादी.
  • दररोज  वर्तमानपत्रे वाचायला विसरू नका: द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाईम्स, एकोनोमिक टाईम्स  ह्यांपैकी जे जमेल ते वाचा व त्यामधील अति-महत्वाच्या topics वर नोट्स तयार करा. 1 जानेवारी 2016 पासूनची सर्व वर्तमानपत्रे मिळवा.
  • वरील मासिके व वर्तमानपत्रे ह्यातून कात्रणे कापून ठेवू नका. त्यांचे वाचन करून स्वत:चे नोट्स लिहून ठेवा.

आपला मित्र व मार्गदर्शक,
अनिल दाभाडे
डायरेक्टर
एडी’ज आय.ए.एस. अकादमी
ठक्कर बझार, नाशिक
02 Oct 2016

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Rajyaseva Main Exam. Bookmark the permalink.

19 Responses to 2017 – Rajyaseva Prelims : Waiting for it?

 1. sayara म्हणतो आहे:

  sir,my score in prelim 2017 is135 as per answer key given by the commission…I belong to open female category..can u tell me what r my chances to qualify prelim?

 2. Bhushan म्हणतो आहे:

  Sir what is expected cutoff for rajyaseva pre 2017 for ST category male. Sir pls mail var rply dyal.

 3. Om म्हणतो आहे:

  Sir,
  Is the cut-off for preliminary exams of State Services, say, 135+/- counted out of only GS Paper I i. e. 200 marks or out of both prelim papers i. e. 400 marks?

  Please answer our query. Many of us are confused about this.

 4. Sandeep म्हणतो आहे:

  Sir, My name is Sandeep, Serving in Army. Likely to be retired within one year. I applied for STI 2017. now preparing for prelims, don’t have any inch of idea about this exam. How will I prepare.

 5. Sandeep म्हणतो आहे:

  Sir tumhi rajyseva prelims ch test series conduct karta ka??plzz let me know…since I stay in gadchiroli…Im not able to get material for preparation. ..last year I missed prelims by 5 marks..I do jot want give away any chance to qualify this time…

 6. swati म्हणतो आहे:

  hello sir,
  i have completed my master’s in zoology in 2016.can you please guide me for which post(or type of examination) i can apply for mpsc 2017?

 7. शेख जहुरोद्दीन म्हणतो आहे:

  नमस्कार सर,
  मी आपला आभारी आहे, की आपल्या बॉलगवर खुप माहिती असतो. परंतु मला काहीच सुचत नाही.
  कि एम.पी.एस.सी असो की, युपीएससी परीक्षा मी कशाप्रकारे या परिक्षा देऊ मला नेहमी असे प्रश्‍न असतात.
  गेल्या अनेक वर्षापासून मी या स्पर्धा परीक्षेबद्दल भिती बाळगतो. की या परिक्षा मी पण देऊ शकतो का ?
  सध्या माझे वय 33 वर्ष पूर्ण आहे. माझे शिक्षण बी.कॉम झाले आहे. अभ्यास बरा आहे. परंतु या परिक्षेचा स्वरुप माहित नसल्यामुळे मी या परिक्षा देऊ शकत नाही. सर प्लॅज मला योग्य मार्गदर्शन करावे. मी आपला आभारी आहे.
  -शेख जहुरोद्दीन

  • AnilMD म्हणतो आहे:

   @शेख जहुरोद्दिन, ह्या परिक्षेबाबत भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. दरवर्षी शेकडो मुले/मुली सफल होतातच न? ती लोकं परग्रहावरून तर आली नाहीत ना? तुम्ही जसं पृथ्वीवर राहता, जेवण जेवता, वर्तमानपत्रे/मासिके वाचता, दररोज फेसबुक/WhatsApp वापरता तसेच ती लोकसुद्धा हे सर्व (काही लिमिट ठेवूनच) करूनच सफलता मिळवतात. फरक फक्त एवढाच असतो कि ज्यांना सफलता मिळवायची असते ती लोक आपली अमुल्य वेळ अभ्यासात घालवतात, त्या वेळेचा सदुपयोग करतात. तुम्ही सुद्धा सफलता मिळवू शकता, जर ठरवून अभ्यास केला तरच.

 8. Nikhil Palve म्हणतो आहे:

  Pre cha study karat astana Mains sathi roj kiti time dyayla hava?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.