हेलो मित्रांनो,
आज ह्या ब्लॉगला सात वर्षे पूर्ण झालीत.
व्वा…
तुम्हासर्वांसोबत हा एक विस्मयकारक प्रवास आहे. ह्या ब्लॉगला प्रचंड प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. ब्लॉगवरील पेजेसना भव्य वाचकवर्ग मिळाला ही एक महान भावना मनात येतेय.
मागील सात वर्षात आठ दशलक्षपेक्षा जास्त वेळा ह्या ब्लॉगवरील पेजेस वाचल्या गेलेत (सद्य:स्थितीत त्र्यांशी लाख सत्तेचाळीस हजारापेक्षा जास्त).
ह्या काळात, तुमच्यापैकी अनेकजण एमपीएससी/युपीएससी परीक्षेच्या एखाद्या टप्प्यावर यशस्वी झालेत पण दुसऱ्या टप्प्यावर अयशस्वी झालेत, बरोबर? मग तुमच्यापैकी अनेकांनी नव्याने सुरुवात केली, नव्या जोमाने, नव्या उमेदीने, नव्या ठरावाने, नव्या स्वप्नांनी…
हे सर्व पुन्हा सुरु करण्यासाठी धैर्य लागते !
पण बऱ्याच जणांनी त्यांची एमपीएससी/युपीएससी परीक्षा सफल करण्याची स्वप्ने सोडून दिलीत. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे कि सोडून देणे फार सोपे आहे आणि जास्तीत जास्त लोक सहजासहजी हार मानतात. पण तुम्हाला माहित आहे का “तुम्ही फार फार शक्तिशाली आहात !”.
प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येतातच. ह्या परीक्षेत अपयश आल्यानंतर, एखाद्याला स्वत:बद्दल लाज वाटेल, दोषी वाटेल, निराशा वाटू शकेल. एखादजण ह्या अपयशाबद्दल स्वत:ला किंवा दुसऱ्याना दोषी ठरवू शकतो. कुणी म्हणू शकतो की एमपीएससी/युपीएससी माझ्या आवाक्याबाहेरची आहे.
परंतु…..ह्या जगात अशक्य असे काही नाही !
मित्रा माझ्यावरती भरवसा ठेव….. मानवी धाडसाला मारणे फार कठीण आहे. ह्याचा पुरावा तूच आहेस. तुझं एमपीएससी/युपीएससी परीक्षेसाठी पुन्हा-पुन्हा तयारी करण्याचं अनंत धाडस सर्व काही सांगून जातं. तू तुझ्या स्वप्नांना ठार केल नाहीस कारण तुझं धाडस अजून जिवंत आहे हे सत्य दिसून येतं.
तुझ्यासारख्या कुणाचीही मोठी दूरदृष्टी असू शकते. कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येकाचा स्वत:वर विश्वास असणे आवश्यक आहे.
तुम्ही जेव्हा अपयशी होवून खाली पडता तेव्हा खरे आव्हान समोर येते. पुन्हा प्रयत्न करण्यासाठी धैर्य लागते. परत एकदा अपयशी ठरल्यानंतर पुन्हा-पुन्हा प्रयत्न करण्यासाठी धैर्य लागते.
तेव्हा अजरामर मानवी धाडस पुढे येतं. नेहमी लक्षात ठेव – तूच तुझ्या भाग्याचा निर्माता आहेस. आपल्या धाडसाला कधीच संपू देवू नकोस. एमपीएससी/युपीएससी परीक्षेत सफलता मिळवण्यासाठी नवी उत्सुकतेने परत एकदा तयारी सुरु कर. तू हे करू शकतोस.
हार्दिक शुभेछेसह,
तुमचा मित्र व मार्गदर्शक,
अनिल दाभाडे
डायरेक्टर
एडीज आय.ए.एस. अकॅडमी नाशिक
Hi Friends,
Today marks the completion of 7th year of this blog. It has been 7 years since I started this blog.
Wow…
It has been an amazing journey with you all. Thanks for the greatest support to this blog. It is a great feeling of achievement in terms of page views.
This blog has received over 8.3 million page-views in these 7 years (at this moment: 83 lacs 47 thousands plus).
During this period, many of you got success in MPSC/UPSC exam at some stage but got bogged down at another stage, right? And many of you have started again with new zeal, new energy, new resolution, new dreams…….
It takes courage to start over and over again !
But many of them leave their dreams of clearing the MPSC/UPSC exam. I just want to remind you that it’s very easy to give up and most people do give up easily. But you know you are very very powerful !
There are always ups and downs in everybody’s life. After an unsuccessful attempt at these exams, one may feel shame, guilt, let-down, etc. One may blame oneself or others for the failure. One may say MPSC/UPSC is not my cup of tea.
But…. nothing is impossible in this world !
Believe me friend…it’s hard to kill the human spirit. The proof is YOU. Your undying spirit of preparing, trying and retrying the MPSC/UPSC exam tells everything. It tells the truth that you have not killed your dreams because your spirit is still alive.
Anybody like you can have a larger vision. Under any circumstances, everybody must have faith in themselves.
The real challenge comes when you get knocked down. It takes courage to start over again. It takes courage to start all over again when you have failed yet again.
Here comes the human undying spirit. Always remember- YOU are the Creator of your own destiny. Never let your spirit to die. Start your preparation once again with new eagerness to clear the MPSC/UPSC exam. You can DO it.
With warmest regards ever,
Your friend and guide,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy Nashik