खूप वर्षांपासून बघत आलोय कि लहानमोठ्या गावा-शहरात योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसल्यामुळे किंवा उपलब्ध असूनही ते माहित नसल्यामुळे, दरवर्षी अनेक तरुण/तरुणी एमपीएससी परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, नाशिकसारख्या शहरांत येतात. ज्याला जमेल तशी व्यवस्था करून राहतात. शक्य झालं तर क्लासेस लावतात. ज्यांच्याकडे पुस्तके घेण्यापुरते पैसे आहेत पण मार्गदर्शनासाठी क्लासेस लावणे शक्य झालं नाही म्हणून लायब्ररी जॉईन करून अभ्यास करतात. परंतु अनेक होतकरू, उद्दंड आत्मविश्वास असूनही खर्च परवडत नाही म्हणून आहोत त्याच गावात/शहरात राहून, छोटे-मोठे क्लासेस लावून आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गी लागतात.
मोठ्या शहरांत जावूनही किंवा आहोत त्या ठिकाणी क्लास लावूनही काही ठिकाणी त्यांचे हात पोळतात कारण प्रचंड फी भरूनही योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, जे शिकवल्या जातं ते न समजल्यामुळे किंवा इतरही कारणामुळे तो क्लास अर्धवट सोडून स्वत: अभ्यास करायला लागतात. माझ्या अकादमीबाबत असे घडत नाही असे मी म्हणत नाही परंतु माझा प्रयत्न हाच असतो कि जास्तीतजास्त मार्गदर्शन प्रत्येकाला मिळावं. ज्यांना पैशांची कमतरता आहे ते कुठून ना कुठून अभ्यासाचं साहित्य जमवून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात.
मी मागील काही वर्षांपासून ज्यांना क्लास अटेंड करणे जमत नाही त्यांच्यासाठी पिजीपी (पर्सनल गायडंस प्रोग्राम) सुरु केला. त्यामध्ये स्टडी मटेरियल, स्टडी प्लान्स, टेस्ट, न्यूजलेटर, इत्यादी असल्यामुळे त्याची फी इतरांसारखी असणारच परंतु मोठमोठ्या क्लासेसमध्ये जे मिळत नाही ते त्या पिजीपिमध्ये उपलब्ध करून दिलं. ज्यांना शक्य आहे ते जॉईन करतात. ज्यांना इतकी फी भरणे शक्य नाही त्यांचा बिमोड होतो. आपल्यात सर्वकाही आहे, देशसेवेची भावना आहे, जास्तीत-जास्त काबाडकष्ट करून देशाच्या प्रगतीत आपणही हातभार लावू शकतो परंतु प्रचंड फी भरणे शक्य नसल्यामुळे आपण क्लास लावू शकत नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. ह्याच बाबतीत विचार करून मी प्रत्येक जणाला शक्य होईल अशी फी असलेला एक छोटा पिजीपी (नॅनो पीजीपी) सुरु करण्याचा निश्चय केला असून तो १ नोव्हेंबर पासून सुरु होतोय. त्यामध्ये तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळेल. फक्त तुम्ही तुमचे स्टडी मटेरियल स्वत: विकत घ्यावे. त्यासाठी कोणती पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचावीत त्याबद्दल सर्व मार्गदर्शन मिळेल.
तुम्ही कुठेही असा, आजच्या डिजिटल युगात इमेल व WhatsAppचा उपयोग करून तुमच्यापर्यंत मार्गदर्शन पोचेल असा हा कोर्स घरबसल्या पूर्ण करता येईल आणि तोही अगदी कमी खर्चात. महागड्या शहरात जावून राहण्याचा, खाण्याचा, प्रवासाचा खर्च वाचतो. तो खर्च तुम्ही पुस्तकात, मासिकांत, वर्तमानपत्रात इन्व्हेस्ट करू शकता. हा फायदा ह्या नॅनो पीजीपीचा आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ साठी सर्वसामान्यांना परवडेल असा हा पर्सनल गायडंस प्रोग्राम: इथे क्लिक करा
Sir Nice. Plz send your contact no , i want to talk with you regarding UPSC
Study . Can you give me your contact no?
@Mayuri, my both numbers are available on the blog banner.
Sir, I m studying in BA LLB 5 years, so I just want to know that can I eligible for UPSC or Banking examinations in 3rd year of my law course as I will get the first degree of (BA in law) in my 3rd year.
Thank you……
@Md Aadil Sheikh, yes, you can once you get the degree after 3 yrs. You should start for the exam preparation right now and when you are in 3rd year, you can apply for the competitive exams. Remember, you should apply for the exam when you are about to finish the 3rd year and not at the start of the 3rd year.
Thanks a lot sir, you r the one who clear my concept b’coz I m so confuse about this
Congratulations sir and thanks for given information