हेलो मित्रांनो,
सप्टेंबर दोन दिवसांवर आलाय आणि सोबतच घेऊन येतोय “डिसेंबर महिन्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या जाहिरातीची प्रतीक्षा’. बरोबर? तुमच्यापैकी अनेकजण पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी नव्याने सुरुवात करतील, परत एकदा नव्या जोमाने व नव्या उमेदीने. काही जण पहिल्यांदाच ह्या परीक्षेच्या तयारीला लागतील. त्यांनी ह्या ब्लॉगवरील इतर लेख वाचावेत आणि तयारीला लागावे. मी थोडक्यात ज्यांना मागील परीक्षेत यश मिळालं नाही त्यांच्याशी संवाद साधतो.
ऑफकोर्स, सर्व अभ्यास पुन्हा सुरु करण्यासाठी धैर्य लागतं! लक्षात ठेवा “तुम्ही फार फार शक्तिशाली आहात!”. मागील परीक्षेतील अपयशाबद्दल स्वत:ला किंवा दुसऱ्याना दोषी ठरवू नका. ह्या जगात अशक्य असं काही नाही! निगेटिव्ह विचारांना थारा देवू नका. नव्या उमेदीने, नव्या जोमाने अभ्यासाचं नियोजन करा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाचा आढावा घ्या, जी पुस्तके बदलून घ्यायचीत ती नवीन घ्या. जसे:
- अर्थव्यवस्था
- विज्ञान व तंत्रज्ञान
- चालू घडामोडीसाठी (जानेवारी 2018 पासून सुरुवात करा. ह्या बाबतीत मी काही सक्सेस मंत्र लिहिलेत ते ब्लॉगवर आहेतच.)
- संविधान, कोर्टांचे निकाल, नवीन कायदे ह्यांसाठी पुस्तके
राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाचा प्रत्येक मुद्दा अभ्यासा आणि त्यावर स्वत:चे नोट्स लिहायला विसरू नका. मधे-मधे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सराव प्रश्नपत्रिका सोडवायला विसरू नका. तुमचा संपूर्ण अभ्यास फेब्रुवारी २०१९च्या शेवटी पूर्ण व्हायला हवा. मग मार्चमध्ये फक्त रिविजन आणि प्रश्नपत्रिका सोडवा.
एक लक्षात असू द्या, ‘मानवी धाडस’ फार महत्वाचं आहे. कालचंच उदाहरण घ्या. ‘नीना वरकील’ ला ओळखता? कदाचित हो किंवा कदाचित नाही? एशियन गेम्समध्ये तिने “लांब उडी” प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे आणि तिने हे कसं केलं असेल? ती केरळमधील एका मजुराची मुलगी असून तिने प्रचंड आत्मविश्वासाने व धाडसाने हे मिळवलं. तिचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच.
आणखी एक… मानवी धाडसाचा पुरावा तूसुद्धा आहेस. तुझं राज्यसेवा परीक्षेसाठी पुन्हा-पुन्हा तयारी करण्याचं धाडस सर्वकाही सांगून जातं. तू तुझ्या स्वप्नांना ठार केलं नाहीस कारण तुझं धाडस अजून जिवंत आहे हे सत्य दिसून येतं. बरोबर? मागील परीक्षेच्या वेळी जसा स्वत:वर विश्वास दाखवला होता तसं आता सुद्धा करायला हरकत नाही 😊
कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येकाचा स्वत:वर विश्वास असणे आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा एकदा कोणत्याही परीक्षेत अपयशी होवून खाली पडता तेव्हा पुढील परीक्षेचं आव्हान समोर येतं; आणि मग पुन्हा प्रयत्न करण्यासाठी धैर्य तुम्ही दाखवताच ना?. परत एकदा अपयशी ठरल्यानंतर पुन्हा-पुन्हा प्रयत्न करण्यासाठी धैर्य दाखवताच ना?.
नेहमी लक्षात ठेवा – तूच तुझ्या भाग्याचा/भाग्याची निर्माता/निर्माती आहेस. आपल्या धाडसाला कधीच संपू देवू नकोस. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत सफलता मिळवण्यासाठी नव्या उत्सुकतेने परत एकदा तयारी सुरु कर. तू हे करू शकतोस/शकतेस.
हार्दिक शुभेछेसह,
तुमचा मित्र व मार्गदर्शक,
अनिल दाभाडे
डायरेक्टर
एडीज आय.ए.एस. अकॅडमी नाशिक
२९ ऑगस्ट २०१८
sir what is the highest age to apply for mpsc
@Pradeep, max age limit for MPSC Rajyaseva : 38 yrs for Open and 43 yrs for Reserved categories.