मित्रांनो व मैत्रिणींनो,
एमपीएससी व यूपीएससी परीक्षा देण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अभ्यास करतो. वयोमानानुसार, उपलब्ध वेळेनुसार, उपलब्ध स्टडी मटेरियलनुसार ज्याला जसा जमेल तसा अभ्यास करावा, काळजी फक्त एवढीच घ्यावी की होणारा अभ्यास पुढील काळात उपयोगी पडेल असा असावा. तुम्ही अनेक जणांकडून ऐकलं असेल की तो/ती 10-15 तास दररोज अभ्यास करतो/करते. त्याकडे लक्ष देऊ नका कारण त्यांचा त्यावेळेत किती अभ्यास झाला हे त्याचं त्यांनाच माहीत. तुम्ही तुमच्या वेळेत चांगला व उपयोगी पडेल असा अभ्यास करा. एक लक्षात ठेवा की “तुमच्या भविष्याचे निर्माते तुम्ही स्वतःच आहात“.
१. अभ्यासाचे स्थान: अभ्यास कुठेही करता येतो, करण्याची इच्छा असावी लागते. “मला वेळ मिळत नाही” असं अनेक जण म्हणतात. त्यांच्यासाठी मी सक्सेस मंत्र#2 आणि सक्सेस मंत्र#8 लिहून ठेवलेत, ते वाचावेत. गृहिणी घरकामातून वेळ काढून अभ्यास करतात, नोकरी करणारे प्रवासात अभ्यास करतात, मधल्या सुटीत अभ्यास करतात. पुर्णवेळ अभ्यास करणारे असोत किंवा अन्य असोत, प्रत्येकाने सखोल अभ्यास करावा.
२. अभ्यासाची पूर्वतयारी: जसा वेळ मिळेल तेव्हा अभ्यासाचं साहित्य काढून ठेवावं, जसे त्या विषयाशी संबंधित स्टडी प्लॅन, अभ्यासक्रम, टॉपिकनुसार वेगवेगळ्या लेखकाची/प्रकाशनाची पुस्तके व मासिके; नोट्स लिहून ठेवण्यासाठी फुलस्केप पेपर्स, पेन व इतर साहित्य. मोबाईलमध्ये दर 30 मिनिटांनी वाजेल असा टायमर सेट करून ठेवावा (🤔 कशासाठी? पुढे कळेलच).
३. अभ्यास केंव्हा करावा: जेंव्हा तुमचं शरीर व मेंदू थकलेला नसेल तेंव्हा अभ्यास करावा. कोणत्याही कारणास्तव तुम्ही थकलेले असाल तर त्यावेळी अभ्यास करू नका. थोडावेळ विश्रांती घ्या.
४. शारीरिक व मानसिक तयारी: शारीरिक व मानसिक त्राण असेल तर तो आधी घालवा. त्यासाठी खालीलप्रमाणे करावे:
- आरामदायक खुर्चीत बसा किंवा बेडवर पडून साधारण दहा ते पंधरा मिनिटे (शक्य नसेल तर मग दोन ते तीन मिनिटे) डोळे बंद करून आराम करा. दहा-पंधरा दीर्घ श्वास घ्या. डोक्यातील कोणत्याच विचारावर लक्ष केंद्रित करू नका. विचार येतील व जातील, त्यांना पकडून ठेवू नका.
- शरीराचा जो पार्ट दुखतोय त्यावर लक्ष केंद्रित करून त्याला थोडा ताण द्या. उदा. पाठ दुखत असेल तर पाठीला थोडं स्ट्रेच करा व हळूहळू सोडून द्या. दुखणाऱ्या प्रत्येक पार्टसाठी असं करा. पायापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक पार्ट शिथिल होईल. संपूर्ण शरीर नवीन उर्जेने भरून येईल त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल.
- डोळे बंद असतानाच असे म्हणा:- “माझे संपूर्ण शरीर आता अभ्यासासाठी सज्ज झाले असून जो अभ्यास मी आता करेल तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहील”. तुमच्या मनाला अभ्यासासाठी पूर्णपणे तयार करण्यासाठी असे म्हणावे. ह्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल. लगेचच अभ्यासाला बसावे.
५. अभ्यास सलग कितीवेळ करावा : तुम्हाला २-४ तास अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा अभ्यासाला सुरुवात केल्यापासून फक्त ३० मिनिटेच (सलग) अभ्यास करून ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. मग परत ३० मिनिटेच अभ्यास करावा. परत ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. अभ्यास सुरु करतांना वर #२ मध्ये दिल्याप्रमाणे टायमर सेट करून ठेवला आहे तो सुरु करावा म्हणजे तुम्हाला ३० मिनिटे पूर्ण झालीत हे कळेल. प्रत्येक ब्रेक नंतर हा टायमर सुरु करावा, पुढील ब्रेक घेण्यासाठी.
६. नोट्स: केलेल्या अभ्यासाच्या नोट्स ताबडतोब लिहून काढाव्यात अन्यथा नंतर मुख्य मुद्दे काय होते हे लक्षात राहणार नाही व नोट्स लिहायला अडचण येईल.
नोट्स का व कशा काढाव्यात ह्यासाठी सक्सेस मंत्र #१ व इतर आर्टिकल्स लिहून ठेवलेत ते वाचावेत.
अभ्यास संपल्यावर एक नजर लिहिलेल्या नोट्सवर टाकावी आणि मग डोळे बंद करून असे म्हणावे: “मी केलेला अभ्यास पूर्णपणे माझ्या लक्षात आहे. जेव्हा जेव्हा मला त्याची गरज भासेल तेव्हा तेव्हा केलेला अभ्यास मला आठवेल असा मला पूर्ण विश्वास आहे”.
लक्षात असू द्या, तुमचा स्वतःवरील असलेला विश्वासच तुम्हाला कोणत्याही परीक्षेत सफलता मिळवून देईन त्यामुळे स्वत:वर प्रगाढ विश्वास असू द्या.
हार्दिक शुभेछेसह,
तुमचा मित्र व मार्गदर्शक,
अनिल दाभाडे
डायरेक्टर
एडीज आय.ए.एस. अकॅडमी नाशिक
१३ सप्टेंबर २०१८
Hello sir,
Mi ata 33 yearschi ahe ani SC category ahe. Mi ajun ekdahi mpsc dili nahi.pn mala dyayachi iccha ahe ani mi sandhya job karte tar job sambhalun mi kasa study karu ki mala job sodava lagel. please guide kara.
@कल्पना, स्वतःवर विश्वास ठेवून आजच अभ्यासाला लागा. सर्वात आधी एक निर्णय घ्या कि एमपीएससीची कोणती परीक्षा दयायची आहे (राज्यसेवा, एस.टी.आय., सहाय्यक कक्ष अधिकारी, इत्यादी) आणि मग त्या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून अभ्यासाला लागा. नौकरी सोडायची गरज नाही. ह्या ब्लॉगवर सर्व मार्गदर्शन उपलब्ध आहे. वेळ मिळाल्यावर फोन करा किंवा एडी’ज आय.ए.एस. अकादमी ठक्कर बझार नाशिकला माझ्या ऑफिसला या. माझे फोन नंबर्स ब्लॉगवर आहेतच.
very nice and most important information sir…
खुप छान माहिती मिळाली आहे सर त्याबद्दल धन्यवाद. अजुन पुढे पण माहिती देत राहणार ही अपेक्षा. धन्यवाद.