SuccessSnippet#19: The secret of clearing Rajyaseva Prelims 2019:
पुस्तकांतून कितीही अभ्यास केला तरी परीक्षेत प्रश्न वेगळेच येतात? जर तुमची दरवर्षी हीच अडचण असेल तर मग तुम्ही कुठं चुकता आहात ह्याचं एकच उत्तर आणि तोच उपाय:-
● नौकरी करत असाल तर 1 महिन्याची रजा घ्या (ह्याशिवाय दुसरा उपाय नाही कारण परीक्षा अगदी तोंडावर आली आहे).
● नौकरी करत नसाल तर एखादी शांत जागा निवडा (तुमची अभ्यासाची रूम सर्वोत्तम).
● सोशल मीडिया पासून दूर रहा, मोबाईलचा कमीत कमी वापर करा.
● 1 जानेवारी 2018 पासूनची वर्तमानपत्रे घ्या, जसे लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, इत्यादी.
● दरदिवशी त्या वर्तमानपत्रांत अर्थव्यवस्था, राज्यघटना, भारतीय व राज्य शासन, स्थानिक शासन, कायदे, विधेयक, व्यक्ती, स्थळं, खेळ, विज्ञान व तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय घडामोडी, स्वास्थ, कला व संस्कृती, भूगोलशी संबंधित बातम्या जसे भूकम्प, हवामान, नैसर्गिक आपत्ती, मानवी हक्क, मानव संसाधन विकास, जैव विविधता, जागतिक तापमानवाढ, हवामानातील बदल, वातावरण, इत्यादी व तसेच इतिहासाशी संबंधित बातम्या आलेल्या असतात, त्या सर्व नोट करा.
● प्रत्येक बातमीचा सखोल अभ्यास करा.
● प्रत्येक मुद्द्यावर त्याच्याशी संबंधित आणखी माहिती शोधा, इतर स्त्रोतांतून.
● इंडिया इयर बुक नक्कीच रेफर करा.
● प्रत्येक मुद्द्यावर काय प्रश्न येऊ शकतो/शकतात, ते लिहा.
अशा पद्धतीने अभ्यास करा म्हणजे दरवर्षी येणारी अडचण 2019च्या पेपरमध्ये तुमच्यासमोर उभी राहणार नाही.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.