हेलो मित्रांनो
२०२१ पासून एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षेंसाठी उमेद्वारांचे प्रयत्न/संधीची संख्या (attempts) मर्यादित राहणार आहे.
- खुला वर्ग (अराखीव) – कमाल संधी ६ (सहा)
- उर्वरित मागास प्रवर्ग- कमाल संधी ९ (नऊ)
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती – कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही
उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील:
- उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, हि संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.
- एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची टी संधी समजली जाईल.
- उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती गणली जाईल.
परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन २०२१ मध्ये प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे.
एमपीएससी निर्णय: Click HERE
Sir ,
I had a query regarding the number of attempts , what if for open category students – 6 attempts have been completed as on 2020 , then will the student be eligible for 2021 attempt ? or is it that the rule is applicable from from 2021 onwards and the previous attempts wont be counted ?