The Day That Was – 01 Aug 2021

1. मद्रास विधान परिषदेच्या 100 व्या वर्षानिमित्त उद्या राष्ट्रपतींची उपस्थिती आणि चेन्नई येथे डॉ. कलाइनर एम. करुणानिधी यांच्या तैलचित्राचे त्यांच्या हस्ते अनावरण:

मद्रास विधान परिषदेच्या 100 व्या वर्षानिमित्त उद्या (2 ऑगस्ट 2021) चेन्नई येथे राष्ट्रपती राम नाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि समारंभास संबोधित करणार आहेत. तसेच त्यांचा हस्ते तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ कलाइनर एम. करुणानिधी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

President of India to grace the commemoration of the 100th year of the Madras Legislative Council and unveil portrait of Dr Kalaignar M. Karunanidhi in Chennai tomorrow:

The President of India, Shri Ram Nath Kovind will grace and address the commemoration of the 100th year of the Madras Legislative Council and unveil a portrait of the former Chief Minister of Tamil Nadu, Dr Kalaignar M. Karunanidhi in Chennai tomorrow (August 2, 2021).

2. पंतप्रधान गुजरातमधील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांशी 3 ऑगस्ट रोजी साधणार संवाद:

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेविषयी (PMGKAY)

– पीएमजीकेएवाय ही पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून साकारण्यात आलेली अन्नसुरक्षा कल्याणकारी योजना आहे, ज्याद्वारे कोविड-19 चा प्रभाव कमी करण्यासाठी सहकार्य आणि मदत पुरवली जाते. पीएमजीकेएवाय अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य दिले जाते. 

PM to interact with beneficiaries of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana in Gujarat on 3rd August:

About Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY)

– PMGKAY is a food security welfare scheme that was envisaged by the Prime Minister to provide assistance and help mitigate the economic impact of Covid-19. Under PMGKAY, 5 Kg/person additional food grain is given to all beneficiaries covered under National Food Security Act.

3. पेटंट आणि ट्रेड मार्क नोंदणीत भारतात गेल्या पांच वर्षात चौपट वाढ:

– जागतिक नवोन्मेष निर्देशांकांत भारताचा क्रमांक 81 वरुन 48 व्या स्थानी

पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाविषयी माहिती:

– पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालय (CGPDTM) मुंबईत आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार, विभागाअंतर्गत हे कार्यालय कार्यरत आहे.

– पेटंट कायदा 1970, डिझाईन कायदा 2000 आणि ट्रेड मार्क्स कायदा 1999 या सर्व कायद्यांच्या अंमलबजावणीवर हे कार्यालय देखरेख ठेवते. तसेच, या सर्व विषयांवरील प्रकरणांवर सरकारला आवश्यक तो सल्ला देण्याचेही काम हे कार्यालय करते.

– पेटंट कार्यालयाचे मुख्यालय कोलकाता इथे आहे, ट्रेड मार्क नोंदणी मुंबईत आहे, तर जीआय नोंदणी चेन्नईत केली जाते. पेटंट माहिती व्यवस्था आणि राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था नागपूर इथे आहे.

India sees four fold increase in Patent and Trade Mark registrations during the last 5 years:

– India’s ranking in Global Innovation Index up from 81st to 48th position

About the Office of Controller General of Patents, Designs and Trademarks

– The Office of the Controller General of Patents, Designs & Trade Marks (CGPDTM) is located at Mumbai. It functions under the Department of Promotion of Industry and Internal Trade (DPIIT), Ministry of Commerce & Industry.

– The Controller General supervises the working of the Patents Act, 1970,  the Designs Act, 2000 and the Trade Marks Act, 1999 and also renders advice to the Government on matters relating to these subjects.

– The Head Office of the ‘Patent office’ is in Kolkata, ‘Trade Mark Registry’ is in Mumbai and the ‘GI Registry’ is in Chennai. The Offices of ‘The Patent Information System’ (PIS) and ‘National Institute of Intellectual Property Management’ (NIIPM) are at Nagpur.

4. आयएनएस तबार पोर्ट स्टॉकहोम, स्वीडन येथे:

– आयएनएस तबार जहाज, सध्या चालू असलेल्या परदेशी तैनातीचा भाग म्हणून, 30 जुलै 21 रोजी पोर्ट स्टॉकहोममध्ये दाखल झाले.

– भारतीय नौदलाच्या जहाजाची स्टॉकहोमला सुमारे दोन दशकांतील ही पहिली भेट आहे.

INS Tabar at Port Stockholm, Sweden:

– INS Tabar, as part of the ongoing Overseas Deployment, entered Port Stockholm on 30 Jul 21.

– This is the first visit of an Indian Navy Ship to Stockholm in nearly two decades.

5.  “मुस्लीम महिला हक्क दिन”:

– तिहेरी तलाक प्रथेविरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा आणून  तिहेरी तलाक सामाजिक गैरकृत्य म्हणून फौजदारी गुन्हा ठरवल्याबद्दल मुस्लीम महिलांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

– ते म्हणाले की, सरकारने देशातील मुस्लिम महिलांचे “स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मविश्वास” बळकट केला  आहे आणि तिहेरी तलाकविरोधात कायदा आणून त्यांच्या घटनात्मक, मूलभूत आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण केले आहे.

– तिहेरी तलाकविरोधातील कायदा मुस्लीम महिलांचे घटनात्मक अधिकार सुनिश्चित करण्यासाठी “मोठी सुधारणा” असल्याचे सिद्ध झाले आहे,

Muslim Women Rights Day:

“Muslim Women Rights Day” was observed by different organisations across the country today where Muslim women wholeheartedly thanked the Prime Minister Shri Narendra Modi for bringing the law against Triple Talaq.

– The Muslim women thanked the Prime Minister for bringing the law against the practice of Triple Talaq on 1st August, 2019 which has made the social malpractice of Triple Talaq a criminal offense.

– They said that the Government has strengthened “self-reliance, self-respect and self-confidence” of the Muslim women of the country and protected their constitutional, fundamental and democratic rights by bringing the law against Triple Talaq.

6. केरळमधील कुथिरन बोगद्याची एक बाजू खुली करण्याचे नितीन गडकरी यांचे निर्देश:

– कुथिरन बोगदा  हा राज्यातील पहिला रस्ते मार्गावरील बोगदा असून यामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक दरम्यान संपर्क सुविधेत  मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. 1.6 किलोमीटर लांबीचा हा बोगदा पीची-वाळानी वन्यजीव अभयारण्याद्वारे तयार करण्यात आला आहे.हा रस्ता वन्यजीवांना धोका न पोहोचवता उत्तर – दक्षिण कॉरिडॉरमधील महत्त्वाची बंदरे आणि शहरांशी संपर्क सुविधा सुधारेल.

Shri Nitin Gadkari instructs to open one side of Kuthiran Tunnel in Kerala:

– Kuthiran Tunnel is the first road tunnel in the state and will drastically improve connectivity to Tamil Nadu and Karnataka. The 1.6 km long tunnel is designed through Peechi- Vazahani wildlife sanctuary. The road will improve connectivity to important ports and towns in North – South Corridor without endangering wildlife.

7. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूची कांस्यपदकाला गवसणीदोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला:

– कांस्यपदकासाठीच्या लढतीत सिंधूने चीनच्या हे बिंग जियाओचा 21-13 आणि 21-15 असा पराभव केला

– भारतीय बॅडमिंटनपटू  पी.  व्ही.  सिंधूने आज टोक्यो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या सामन्यात कांस्यपदक जिंकले.पी. व्ही.  सिंधूने कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या हे बिंग जियाओचा 21-13 आणि 21-15 असा पराभव केला आणि दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

– सिंधूने रिओ ऑलिम्पिक- 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

– कुस्तीपटू सुशील कुमार दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा पहिला आणि  एकमेव भारतीय क्रीडापटू आहे.

वैयक्तिक माहिती:

– जन्मतारीख : 05 जुलै 1995

– निवासस्थान : हैदराबाद, तेलंगणा

– प्रशिक्षण स्थान : पीजीबीए आणि जीएमसी बालयोगी क्रीडा संकुल, गचीबोवली

– वैयक्तिक प्रशिक्षक: पार्क ताई सांग

– राष्ट्रीय प्रशिक्षक: पुलेला गोपीचंद

कामगिरी:

– रौप्य पदक, रिओ ऑलिम्पिक 2016

– सुवर्णपदक, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा  2018 (सांघिक )

– रौप्य पदक, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2018

– रौप्य पदक, आशियाई क्रीडास्पर्धा 2018

– विश्व विजेती , 2019

पुरस्कार:

– पद्मभूषण (2020)

– पद्मश्री (2015)

– राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2016)

– अर्जुन पुरस्कार (2013)

Shuttler P V Sindhu bags bronze medal in Tokyo Olympics, becomes the first Indian woman to win two Olympic medals:

– Sindhu defeated He Bing Jiao of China by 21-13 and 21-15 in the bronze medal match

– Indian shuttler P V Sindhuwon the bronze medal in women’s single match in Tokyo Olympics today. PV Sindhu defeated He Bing Jiao of China by 21-13 and 21-15 in the bronze medal match and became the first Indian woman to win two Olympic medals.

– Sindhu won silver at Rio 2016.

– Wrestler Sushil Kumar is the first and only other Indian to win two Olympic medals.

Personal details:

– Date of Birth: July 05, 1995

– Home location: Hyderabad, Telengana

– Training Base: PGBA & GMC Balayogi Sports Complex, Gachibowli

– Personal Coach: Park Tae Sang

– National Coach: PullelaGopichand

Achievements:

– Silver Medal, Rio Olympics 2016

– Gold Medal, CWG 2018 (Team Event)

– Silver Medal, CWG 2018

– Silver Medal, Asian Games 2018

– World Champion, 2019

Awards:

– Padma Bhushan (2020)

– Padma Shri (2015)

– Rajiv Gandhi KhelRatna Award (2016)

– Arjuna Award (2013)