The Day That Was – 08 Aug 2021

1. छोडो भारत चळवळ दिनानिमित्त उपराष्ट्रपतींकडून शुभेच्छा:

गांधीजींनी देशवासियांना दिलेल्या ‘करा किंवा मरा’ संदेशाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नवी ऊर्जा भरली आणि ब्रिटीशांना 1947 मध्ये भारत सोडून जाण्यास भाग पाडले.

Vice President greets the nation on the eve of Quit India Movement Day:

The movement started with Gandhiji exhorting the countrymen with his powerful slogan, ‘do or die’ which infused a new energy into our independence movement and eventually forced the British to leave India in 1947.

2. पंतप्रधान येत्या 10 ऑगस्ट रोजी उज्ज्वला 2.0 योजनेला प्रारंभ करणार:

– पंतप्रधान नरेंद्र मोदी,10 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, एलपीजी कनेक्शन देऊन उज्ज्वला 2.0 (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- पीएमयूवाय)योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला  प्रारंभ करणार आहेत.

– उज्ज्वला योजना  1.0 (पहिला टप्पा) ते उज्ज्वला 2.0 (दुसरा टप्पा) प्रवास

2016 मध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला 1.0 (पहिल्या टप्प्यात) योजनेदरम्यान, दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानंतर, एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करत आणखी सात श्रेणींमधील (अनुसूचित जाती/जमाती/प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, सर्वाधिक मागासवर्गीय, चहाच्या मळ्यांतील, आदिवासी, बेटांवरील महिला) अशा महिला लाभार्थींचा यात समावेश करण्यात आला. तसेच, 8 कोटी एलपीजी जोडणीचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. हे उद्दिष्ट निर्धारीत तारखेच्या सात महिने अगोदर ऑगस्ट 2019 मध्येच साध्य झाले.

– विनामूल्य एलपीजी जोडणीसोबत, उज्ज्वला 2.0 लाभार्थ्यांना प्रथम रिफिल आणि हॉटप्लेट मोफत दिली जाईल.

– तसेच, नावनोंदणी प्रक्रियेसाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असेल. उज्ज्वला 2.0 मध्ये, स्थलांतरीतांना रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. ‘कौटुंबिक घोषणा’ आणि ‘पत्त्याचा पुरावा’ या दोन्हीसाठी स्व-प्रतिज्ञापत्र पुरेसे आहे. उज्ज्वला 2.0 ही योजना, पंतप्रधानांचे एलपीजी कनेक्शनच्या सार्वत्रिक वापराच्या संधीचे स्वप्न साकार करण्यात मदत करेल.

PM to launch Ujjwala 2.0 on 10th August:

– Prime Minister Shri Narendra Modi will launch Ujjwala 2.0 (Pradhan Mantri Ujjwala Yojana – PMUY) by handing over LPG connections, at Mahoba Uttar Pradesh on 10th August, 2021 at 12:30 PM via video conferencing.

– During Ujjwala 1.0 launched in 2016, a target was set to provide LPG connections to 5 crore women members of BPL households. Subsequently, the scheme was expanded in April 2018 to include women beneficiaries from seven more categories (SC/ST, PMAY, AAY, Most backward classes, tea garden, forest dwellers, Islands). Also, the target was revised to 8 Crore LPG connections. This target was achieved in August 2019, seven months ahead of the target date.

– Along with a deposit free LPG connection, Ujjwala 2.0 will provide first refill and hotplate free of cost to the beneficiaries. –  Also, the enrollment procedure will require minimum paperwork. In Ujjwala 2.0, migrants will not be required to submit ration cards or address proof. A self-declaration for both ‘family declaration’ and as a ‘proof of address’ will suffice. Ujjwala 2.0 will help achieve the Prime Minister’s vision of universal access to LPG.