The Day That Was – 19 Aug 2021

  1. भारतीय हवाई दलासाठी डीआरडीओने विकसित केले आधुनिक शाफ तंत्रज्ञान:
  • डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आधुनिक शाफ तंत्रज्ञान (Chaff Technology) विकसित केले आहे.
  • सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी सीएमडीएस ही प्रणाली वापरण्यात येते. शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते.

DRDO develops Advanced Chaff Technology for Indian Air Force:

  • Defence Research & Development Organisation (DRDO) has developed an Advanced Chaff Technology to safeguard fighter aircraft of the Indian Air Force (IAF) against hostile radar threats.
  • In today’s electronic warfare, survivability of fighter aircraft is of prime concern because of advancement in modern radar threats. To ensure survivability of aircraft, Counter Measure Dispensing System (CMDS) is used which provides passive jamming against Infra-Red and radar threats.
  • Chaff is a critical defence technology used to protect fighter aircraft from hostile radar threats. The importance of this technology lies in the fact that very less quantity of chaff material deployed in the air acts as decoy to deflect enemy’s missiles for ensuring safety of the fighter aircraft.