The Day That Was – 12 Jul 2021

1. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार:

– राष्ट्रीय संग्रहालय हे जगातल्या मोठ्या आणि प्रतिष्ठीत संग्रहालयांपैकी एक असून 800 दशलक्ष पृष्ठे , सुमारे 5.7 दशलक्ष फाईल्स  आणि 1.2  लाख नकाशांसह इतरही अनेक मौल्यवान संग्रह इथे आहेत.

– नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या वर्तमान नसलेल्या नोंदींचे भांडार आहे आणि प्रशासक आणि विद्वानांच्या वापरासाठी त्यांना सांभाळून ठेवत आहे.

National Archives of India:

– National archives is one of the largest and prestigious centres of archives in the world and holds records of  800 million pages, as well as 5.7 million files,  and 1.2 lakh  maps among others.

– The National Archives of India is the repository of the non-current records of the Government of India and is holding them in trust for the use of administrators and scholars.

2. सीपीडब्ल्यूडीने केला 167 वा वर्धापन दिन साजरा:

– केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज 12 जुलै 2021 रोजी देशाच्या गौरवशाली सेवेतील 167 वा वर्धापन दिन साजरा केला.

CPWD celebrates its 167th Annual Day:

– Central Public Works Department celebrated 167th year of its glorious service to the nation on July 12, 2021.

3. खोल समुद्रातील मोहीम आणि महासागरातील संसाधनांच्या माध्यमातून 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक “नील अर्थव्यवस्थेचे” भारताचे उद्दिष्ट :

– येत्या काही वर्षांत भारताने खोल समुद्रातील मोहीम आणि महासागरातील  संसाधनांच्या माध्यमातून 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक  “नील अर्थव्यवस्थेचे ” उद्दिष्ट  ठेवले आहे.

– भू  विज्ञान मंत्रालयाने आखलेल्या “डीप ओशन मिशन”चे काम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या सहकार्याने केले जाईल आणि वेगवेगळ्या मंत्रालयांतर्गत कार्यरत विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचे  प्रयत्न एकत्रित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असेल.

– “डीप ओशन मिशन” चे सर्वसामान्यांनाही दूरगामी फायदे होतील. उदाहरणार्थ, शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात आणि समुद्राच्या पट्ट्यातून खनिजे उत्खनन करण्यासाठी आणि  पाण्याचे पृथक्करण करण्यात ते मदत करू शकते.

India Aims to Target over 100 Billion “Blue Economy” Through Deep Ocean Mission and Ocean Resources:

– In the years to come, India aims to target over 100 billion “Blue Economy” through its Deep Ocean Mission (DOM) and ocean resources.

– “Deep Ocean Mission” planned by the Ministry of Earth Sciences will be carried out in collaboration with Indian Space Research Organisation(ISRO) and it will be a major step in the direction of integrating and bringing together the efforts of the different streams of science operating under different Ministries in the government. – The “Deep Ocean Mission” will also have far-reaching benefits for the common man. For example, it could help in providing clean drinking water and explore the avenues of desalination of water as well as extracting minerals from the ocean belt.