1. डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ओएनडीसी):
– वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) ने डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ओएनडीसी) वर एक प्रकल्प सुरू केला आहे.
– ओएनडीसीचे उद्दीष्ट ओपन सोर्स्ड मेथडॉलॉजीवर विकसित ओपन नेटवर्क्सचा प्रचार करणे, कोणत्याही विशिष्ट प्लॅटफॉर्मपेक्षा स्वतंत्र, ओपन स्पेसिफिकेशन्स आणि ओपन नेटवर्क प्रोटोकॉलचा वापर करून प्रोत्साहन देणे आहे.
– ओएनडीसीकडून संपूर्ण मूल्य साखळीचे डिजिटायझेशन करणे, ऑपरेशन्सचे मानकीकरण करणे, पुरवठादारांच्या समावेशास चालना देणे, लॉजिस्टिकमध्ये कार्यक्षमता प्राप्त करणे आणि ग्राहकांसाठी मूल्य वाढविणे अपेक्षित आहे.
Open Network for Digital Commerce (ONDC):
– Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT), Ministry of Commerce and Industry has initiated a project on Open Network for Digital Commerce (ONDC).
– ONDC aims at promoting open networks developed on open sourced methodology, using open specifications and open network protocols independent of any specific platform.
– ONDC is expected to digitize the entire value chain, standardize operations, promote inclusion of suppliers, derive efficiencies in logistics and enhance value for consumers.
2. कोणत्याही आणि सर्व देशांना उपलब्ध होण्यासाठी कोविन मंच ओपन सोर्स :
– भारताने आपले कोविड ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग म्हणजेच संसर्गाचा माग काढणारे आणि संसर्ग शोधणारे तंत्रज्ञान ओपन सोर्स केले आहे.
– 200 दशलक्ष वापरकर्ते असणारे आरोग्यसेतु हे अॅप डेव्हलपर्ससाठी सहजगत्या उपलब्ध आहे.
– संपूर्ण जग एक असल्याच्या भारतीय तत्वज्ञानाला अनुसरुन कोविन मंच ओपन सोर्स ठेवला आहे आणि लवकरच ते कोणत्याही तसेच सर्व देशांमध्ये उपलब्ध होईल.
CoWin platform is being made open source:
– India made its Covid tracking and tracing App open source as soon as it was technically feasible.
– with nearly 200 million users, the ‘Aarogya Setu’ app is a readily available package for developers.
– Covid vaccination platform CoWin is being prepared to be made open source. Soon, it will be available to any and all countries.
3. सौम्य संज्ञानात्मक अशक्तपणा आणि अल्झायमर रोगची सुरुवात:
– सौम्य संज्ञानात्मक अशक्तपणा आणि अल्झायमरचा प्रारंभिक स्वरुपाची एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये स्मृती खराब होते, परंतु एखादी व्यक्ती कार्यशीलतेने स्वतंत्र राहते. उपचारांच्या अनेक पर्यायांपैकी ध्यानधारणा ही अशा रूग्णांना दिलासा देण्यासाठी विना-आक्रमक व किफायतशीर पध्दत आहे.
Mild Cognitive Impairment & early Alzheimer’s disease:
– Mild Cognitive Impairment & early form of Alzheimer’s is a condition in which memory deteriorates, but a person remains functionally independent. Among several treatment options, meditation is one non-invasive and cost-effective approach to bring relief to such patients.
4. उत्तर भारतातील अतिरीक्त सिंचन पावसाळ्याला वायव्यकडे सरकवत आहे, शेतीला धोका :
– हवामान संशोधकांना असे आढळले आहे की उत्तर भारतात जास्त सिंचन केल्याने सप्टेंबर महिन्यात होणारा पाऊस उपखंडातील उत्तर-पश्चिम भागाकडे सरकतो, तर मध्य भारतामध्ये हवामानाच्या विस्तृततेत वाढ होते.
– दक्षिण आशियातील सिंचन पद्धतींच्या निवडीबाबत मान्सून पर्जन्यवृष्टी संवेदनशील असल्याचे या अभ्यासाची या प्रदेशात कृषी पद्धतींचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते.
– दक्षिण आशिया हा जगातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्रांपैकी एक आहे, मुख्यत्वे भूजल वापरतो आणि उन्हाळ्यातील प्रमुख पिक हे पाण्याने भरलेल्या शेतात लागवड केलेले धान आहे.
Excess irrigation over northern India shifting monsoons towards northwest risking agriculture:
– Climate researchers have discovered that excess irrigation over northern India shifts the September monsoon rainfall towards the north-western part of the subcontinent increases widespread weather extremes over Central India.
– The study which establishes that monsoon precipitation is sensitive to the choice of irrigation practices in South Asia can help plan agricultural practices in this region. – South Asia is one of the most heavily irrigated regions of the world, largely using groundwater, and its major summer crop is paddy which is cultivated in water flooded fields.