The Day That Was – 09 Sep 2021

1. पंतप्रधानांनी भूषविले 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद:

– पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आभासी माध्यमातून आयोजित 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

– ब्रिक्स@15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य ही भारताने निवडलेली  शिखर परिषदेची संकल्पना होती.

– या शिखर परिषदेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे अन्य सर्व ब्रिक्स नेते सहभागी झाले होते.

– यावर्षी भारताच्या अध्यक्षते दरम्यान अनेक नवीन उपक्रम साध्य झाले, यात:

          – पहिली ब्रिक्स डिजिटल आरोग्य शिखर परिषद

          – बहुपक्षीय सुधारणांवरील पहिले ब्रिक्स मंत्रीस्तरीय संयुक्त निवेदन

          – ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती आराखडा

          – रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या क्षेत्रातील सहकार्यावरील करार

          – आभासी ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र

          – हरित पर्यटनाबाबतची  ब्रिक्स आघाडी इत्यादींचा यात समावेश आहे.

– पंतप्रधानांनी ;’लवचिक , नाविन्यपूर्ण , विश्वासार्ह आणि शाश्वत पुर्नउभारणी’ या ब्रीदवाक्याखाली ब्रिक्स सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले. या संकल्पनेवर विस्ताराने बोलताना पंतप्रधानांनी,  लसीकरणाची गती आणि सुलभता वाढवून ‘पुर्नउभारणी’ वाढवण्याच्या गरजेवर, विकसित देशांच्या पलीकडे औषध निर्माण  आणि लस उत्पादन क्षमता वैविध्यपूर्ण करून ‘लवचिकता’ निर्माण करणे, सार्वजनिक हितासाठी डिजिटल साधनांचा कल्पकतेने वापर करून ‘नवोन्मेषा’ला प्रोत्साहन देणे,विश्वासार्हता’ वाढवण्यासाठी बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे आणि पर्यावरण आणि हवामानाच्या समस्यांवर ब्रिक्सचा एकमुखी आवाज स्पष्ट करून ‘शाश्वत’ विकासाला  प्रोत्साहन देणे यावर भर दिला.

– शिखर परिषदेच्या समारोपाच्यावेळी नेत्यांनी ‘नवी दिल्ली घोषणापत्र ‘ स्वीकारले.

Prime Minister chairs 13th BRICS Summit:

– Prime Minister Shri Narendra Modi chaired the 13th BRICS Summit virtually today.

– The theme of the Summit, chosen by India, was, BRICS@15: Intra-BRICS Cooperation for Continuity, Consolidation and Consensus. 

– The Summit saw the participation of all other BRICS Leaders – President Jair Bolsonaro of Brazil, President Vladimir Putin of Russia, President Xi Jinping of China, and President Cyril Ramaphosa of South Africa.

– during India’s Chairship this year, which allowed the achievement of several new initiatives. These included:

          – first BRICS Digital Health Summit

          – first BRICS Ministerial Joint Statement on multilateral reforms

          – a BRICS Counter-Terrorism Action Plan

          – an Agreement on cooperation in field of remote-sensing satellites

          – a virtual BRICS vaccine Research & Development Centre

          – BRICS Alliance on Green Tourism, etc

– Prime Minister called for enhanced BRICS cooperation under the motto of ‘Build-back Resiliently, Innovatively, Credibly and Sustainably’.  Elaborating on these themes, Prime Minister stressed the need for accelerating ‘build-back’ by enhancing speed and accessibility of vaccination, creating ‘resilience’ by diversifying pharma and vaccine production capacities beyond the developed world, fostering ‘innovation’ by creatively using digital tools for public good, ensuring reform of multilateral institutions to enhance their ‘credibility’, and promoting ‘sustainable’ development by articulating a common BRICS voice on environmental and climate issues.

– At the conclusion of the Summit, the leaders adopted the ‘New Delhi Declaration’.

2. मध्यम श्रेणीची पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र (MRSAM) प्रणाली भारतीय हवाई दलाकडे (IAF) सोपवण्यात आली:

– MRSAM हवाई लढाऊ विमाने, UAVs, मार्गदर्शित आणि दिशाहीन युद्धसामग्री आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसारख्या हवाई धोक्यांपासून हवाई संरक्षण प्रदान करते

– 70 किलोमीटर पर्यंतच्या रेंजमध्ये अनेक लक्ष्य साध्य करण्यास सक्षम

– उच्च गतिशीलता प्राप्त करण्यासाठी स्वदेशी विकसित रॉकेट मोटर आणि नियंत्रण प्रणाली

-अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली

एमआरएसएएम (आयएएफ) एक प्रगत नेटवर्क केंद्रित लढाऊ हवाई संरक्षण प्रणाली आहे जी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) यांनी संयुक्तपणे एमएसएमईसह खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांचा समावेश असलेल्या भारतीय उद्योगाच्या सहकार्याने विकसित केली आहे.

Medium Range Surface to Air Missile (MRSAM) System was handed over to Indian Air Force (IAF):

– MRSAM provides air defence against aerial threats like fighter aircraft, UAVs, guided and unguided munitions & cruise missiles

– Capable of engaging multiple targets at ranges up to 70 kilometres

– Indigenously developed rocket motor & control system for achieving high manoeuvrability

– State-of-the-art missile system

The MRSAM (IAF) is an advanced network centric combat Air Defence System developed jointly by Defence Research and Development Organisation (DRDO) and Israel Aerospace Industries (IAI) in collaboration with the Indian industry comprising of private and public sectors including MSMEs.