The Day That Was – 18 Sep 2021

1. महाकवी सुब्रमण्यम भारती यांची शंभरावी  पुण्यतिथी:

– ते भारतातील महान साहित्यिकांपैकी एक होते.

– ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते-एक कवी, पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक ज्यांनी गरीब आणि दलित लोकांची मनापासून काळजी घेतली. तामिळनाडू आणि भारतातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यात त्यांच्या उत्स्फूर्त कविता आणि लेखनांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

– भारतीयार यांची दृष्टी समानतेसाठी होती, त्यांनी जाती, धर्म, प्रदेश, भाषा आणि लिंग यांच्या धर्तीवर समाजाला विभाजित करणारे सर्व अडथळे आणि भेदभाव दूर करण्याची गरज यावर जोर दिला.

– एट्टयापुरम दरबारात त्यांना वयाच्या अकराव्या वर्षी ‘भारती’ ही पदवी बहाल करण्यात आली.

– चक्रवर्तीनी मासिकाचे संपादक म्हणून भारतीने घोषणा केली की चक्रवर्तीनीचे ध्येय महिलांचे सक्षमीकरण होते.

– बाल गंगाधर टिळक, बिपीन चंद्र पाल, लाला लजपत राय, श्री व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई आणि श्री अरबिंदो या राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

– महाकवी भारती तमिळ, इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, हिंदी, हिंदुस्तानी आणि तेलगू यासह अनेक भाषांमध्ये अत्यंत पारंगत होते.

Centenary of Mahakavi Subramania Bharati’s Punya Tithi:

– he was one of India’s greatest literary geniuses.

– he was a multi-faceted personality—a poet, journalist, freedom fighter and social reformer who deeply cared for the poor and downtrodden. His evocative poetry and writings played an important role in infusing the spirit of nationalism among the people of Tamil Nadu and India.

– Bharathiyar’s vision was for equality, he stressed the need to eradicate all barriers and discriminations that divide society on the lines of caste, religion, region, language and gender.

– he was conferred the title of ‘Bharati’ at the tender age of eleven in the Ettayapuram Durbar.

-as the editor of Chakravartini magazine, Bharati announced that the goal of Chakravartini was the empowerment of women.

– through his new forms and expressions, simple words, vernacular idiom and lyrical rhythms, Mahakavi Bharati’s poetry heralded a new era in Tamil literature.

– he was closely associated with national leaders like Bal Gangadhar Tilak, Bipin Chandra Pal, Lala Lajpat Rai, Sri V. O. Chidambaram Pillai and Sri Aurobindo.

– Mahakavi Bharati was extremely well versed in multiple languages including Tamil, English, French, Sanskrit, Hindi, Hindustani and Telugu.

2. आयुष आहार:

– यामुळे तरुणांना जंक फूडच्या आजारांपासून वाचवण्यास मदत होईल.

– आयुष मंत्रालय ‘पोषण अभियान’ द्वारे आयुष आधारित आहार आणि जीवनशैलीला प्रोत्साहन देत आहे आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी अभिसरण करत आहे.

– पोषण अभियानाचे अंतिम ध्येय म्हणजे ‘सुपोषित भारत’ साकारणे.

नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन (NCISM):

– आयोगाचा सध्याचा फोकस दोन मुद्द्यांवर आहे एक, सक्षमतेवर आधारित अभ्यासक्रम विकसित करणे; दुसरे, आयुष शैक्षणिक संस्थांचे रेटिंग आणि परवानगी.

Ayush Aahar:

– this will also help saving the youth from the ills of junk food.

– the Minsitry of Ayush is promoting Ayush based diet & lifestyle through ‘Poshan Abhiyan’ and is working in convergence with the Ministry of Women & Child Development.

– the ultimate goal of Poshan Abhiyan is to realise  ‘Suposhit Bharat’.

National Commission for Indian System of Medicine (NCISM):

– the current focus of the Commission is on two issues one, developing competency based curriculum; second, rating and permission of Ayush educational institutions.

3. अन्न सुरक्षेमध्ये कृषी संशोधनाचे महत्वपूर्ण योगदान:

– अन्नसुरक्षेच्या समस्येवर मात करण्यासह शेतकऱ्यांच्या आणि कृषकांच्या उत्पन्नात सुधारणा करण्यासाठी आणि लोकांच्या उदरनिर्वाहासाठी नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्याच्या दृष्टीने, कृषी संशोधनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

– उपलब्धता, पोच आणि किफायतशीर या अन्न सुरक्षेच्या तीन पैलूंमध्ये संशोधनाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

– देशाला आत्मनिर्भर  करण्याच्या प्रयत्नांमध्ये  जीनोमिक्स, डिजिटल शेती, हवामान-स्मार्ट तंत्रज्ञान आणि पद्धती, कार्यक्षम पाणी वापर उपकरणे, उच्च उत्पन्न देणाऱ्या आणि जैव अनुकूल वाणांचा विकास, योग्य पद्धतीने उत्पादन, गुणवत्ता आणि सुरक्षा मानके यासंदर्भात कृषी संशोधनात एकत्रित प्रयत्न सुरूच राहतील.

– पर्यावरणीय शाश्वततेसह पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळवण्यासाठी वैज्ञानिक संशोधनातील वाढत्या गुंतवणुकीसह कृषी संशोधन आणि विकासाचा  पुनर्विचार करण्याची आणि अनुकूल करण्याची  गरज आहे.

– शाश्वत शेतीवर राष्ट्रीय मिशन सुरू करण्यात आले आहे जे शेतीमध्ये एकात्मिक शेती प्रणालीच्या दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते.

Agricultural Research plays important role in food security:

– to make the country self-reliant, concerted efforts in agricultural research on genomics, digital agriculture, climate-smart technologies and methods, efficient water use equipment, development of high yielding and bio-friendly varieties, systematic production, quality and safety standards will continue.

– There is a need to rethink and adapt agricultural research and development, along with increasing investment in scientific research, to achieve adequate and nutritious food along with environmental sustainability.

– National Mission on Sustainable Agriculture has been launched which promotes integrated farming systems approach in agriculture.

4. पांढरा स्टेम बोरर:

– व्हाईट स्टेम बोरर ही भारतातील अरेबिका कॉफीची सर्वात गंभीर कीड आहे.

– हे श्रीलंका, चीन, व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये आढळते.

– अरेबिका कॉफी ही मुख्य यजमान वनस्पती आहे आणि सर्वाधिक पसंत केली जाते.

– पर्यायी यजमान वनस्पतींमध्ये रोबस्टा ट्री कॉफी, सागवान, ओलेडियोका इत्यादींचा समावेश आहे. तथापि, पांढरा स्टेम बोरर सहसा या वनस्पतींमध्ये प्रजनन करत नाही.

White Stem Borer:

– White stem borer is the most serious pest of Arabica coffee in India.

– It is found in Sri Lanka, China, Vietnam and Thailand.

– Arabica coffee is the principal host plant and is most preferred.

– Alternate host plants include Robusta tree coffee, teak, Oleadioica etc. However, White stem borer usually does not breed in these plants.

5. सीमा रस्ते संघटना आपल्या रस्त्यांचे रस्ता सुरक्षा परीक्षण करणार:

– रस्ते सुरक्षित करून अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी सीमा रस्ते संघटना त्यांच्या  विद्यमान रस्त्यांचे रस्ता सुरक्षा परीक्षण करणार

– नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेसंदर्भात  जागरूकता वाढविण्यासाठी 75 दिवस देशव्यापी मोटारसायकल मोहिम

– सीमा रस्ते संघटनेने  (बीआरओ) बांधलेले रस्ते केवळ सशस्त्र दल आणि निमलष्करी दलेच  वापरत नाहीत तर देशभरातील पर्यटक आणि साहसी पर्यटक मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांवरून प्रवास करतात.

BRO to carry out road safety audit of its roads:

– BRO is the only road construction agency in the border areas of the country

– BRO constructs and maintains bridges, airfields, tunnels and roads in strategic locations and friendly foreign countries

– BRO to carry out a road safety audit of its existing roads to reduce the possibilities of accident by making its roads safer

– Focus on improving road safety conditions and laying down standard operating procedures for roads in hill and snowbound regions.

– 75 days of pan-India Motorcycle expedition to stimulate road safety awareness among the people.

– The roads constructed by Border Roads Organisation (BRO) are used not only by the Armed Forces and Paramilitary Forces but traversed extensively by the tourists and adventure seekers from all over the country.

6. आदिवासी नायक – महान राजा शंकर शाह आणि त्याचा मुलगा कुंवर रघुनाथ शाह:

– 1857 ते 1947 पर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी नेत्यांनी दिलेले बलिदान आधीच्या सरकारांनी विसरले, गुप्त ठेवले, म्हणूनच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी या शूर वीरांना आदर देण्याचे काम करत आहेत, जेणेकरून नवीन पिढी त्यांच्याबद्दल जागरूक होइल.

– 18 सप्टेंबर 1857 रोजी वडील आणि मुलाच्या जोडीने भारत देशाला गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी सर्वोच्च त्याग केला. त्यांना इंग्रजांनी तोफेने ठार केले.

Tribal Heroes – great King Shankar Shah and his son Kunwar Raghunath Shah:

– From 1857 to 1947, the sacrifices made by Tribal leaders for the independence of the country were forgotten by the previous governments, kept anonymous, that is why Prime Minister Shri Narendra Modi is working to give respect to these brave heroes, so that the new generation becomes aware about them.

– On 18th Sep 1857, the duo of father and son made the supreme sacrifice to rid Mother India from shackles of slavery. They were killed by British with a cannon.

Source: PIB