- Quit India Movement:
The Prime Minister, Shri Narendra Modi has remembered all those who took part in the Quit India Movement under Bapu’s leadership and strengthened our freedom struggle.
“August 9 has become a burning symbol of our national revolution” said Loknayak JP.
Inspired by Bapu, the Quit India Movement witnessed remarkable participation from people across all sections of society including greats like JP and Dr. Lohia.
भारत छोडो आंदोलन:
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याला बळकट करणाऱ्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.
“9 ऑगस्ट 1942 हा दिवस ज्या दिवशी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली तो दिवस आपल्या राष्ट्रीय क्रांतीचे धगधगते प्रतीक बनले आहे” असे लोकनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी म्हटले आहे.
बापूंच्या प्रेरणेने भारत छोडो आंदोलनात जेपी आणि डॉ. लोहिया यांसारख्या महान व्यक्तींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा उल्लेखनीय सहभाग होता.
- Government e Marketplace (GeM) portal:
The Union Minister for Home & Cooperation, Shri Amit Shah e-launched the onboarding of cooperatives on the Government e Marketplace (GeM) portal in New Delhi today.
This day is important for cooperatives, asGeM has been made available to all cooperative societies in the country.
GeM portal will bring transparency into the cooperative sector, farmers and milk producers’trust in committees and their members will also increase when there is transparency.
The expansion that GeM has achieved is unimaginable, there are about 62,000 government buyers available on GeM and around 49 lakh sellers.
More than 10,000 products and more than 288 services are listed, so far business worth Rs. 2.78 thousand crore has taken place and this is a huge achievement for GeM.
सरकारी ई-मार्केट प्लेस (GeM):
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे सहकारी संस्थाना सरकारी ई-मार्केट प्लेस (GeM) वर आणण्याची व्हर्च्युअल सुरुवात केली.
सहकार क्षेत्रासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज देशभरातील सर्व सहकारी समित्यांसाठी जेमचे दरवाजे खुले झाले आहेत.
सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी जेम पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरेल आणि पारदर्शकतेमध्ये वाढ झाल्यावर शेतकरी तसेच दूध उत्पादकांचा सहकारी समित्या आणि त्यांचे सदस्य यांच्यावरील विश्वास वृद्धिंगत होईल.
GeM ने मिळवलेला विस्तार अकल्पनीय आहे, GeM वर सुमारे 62,000 सरकारी खरेदीदार आणि सुमारे 49 लाख विक्रेते उपलब्ध आहेत.
10,000 हून अधिक उत्पादने आणि 288 हून अधिक सेवा सूचीबद्ध आहेत, आतापर्यंत रु. 2.78 हजार कोटी झाले आहेत आणि ही GeM साठी मोठी उपलब्धी आहे.
- 22nd Bharat Rang Mahotsav:
The 5-day theatre festival organized by the National School of Drama under Azadi Ka Amrit Mahotsav pays tribute to our freedom fighters.
Maharashtra Governor Shri Bhagat Singh Koshyari inaugurated the 22nd ‘Bharat Rang Mahotsav’ at Rabindra Natya Mandir in Mumbai today. The five-day drama festival (being held from August 9 to August 13, 2022) is being jointly organised by the Union Ministry of Culture and P.L. Deshpande Maharashtra Kala Akademi.
Bharat Rang Mahotsav (BRM) (भारत रंग महोत्सव) or the National Theatre Festival, started in 1999, is the annual theatre festival organized by National School of Drama (NSD), New Delhi. Bharat Rang Manch was started to stimulate the growth and development of theatre across the country. Originally a national festival showcasing the work of the most creative theatre workers in India, it has evolved to international scope, hosting theatre companies from around the world, and is now the largest theatre festival of Asia. The National School of Drama is India’s premier theatre training institute funded by Govt. Of India.
22 वा भारत रंग महोत्सव:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) ने स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी पाच दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे केले आयोजन.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात 22 व्या ‘भारत रंग महोत्सव’चे उद्घाटन केले. स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने मुंबईत 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, 2022 दरम्यान हा पाच दिवसांचा नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे.
भारत रंग महोत्सव किंवा नॅशनल थिएटर फेस्टिव्हल हा 1999 मध्ये सुरू झाला. हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्ली ने आयोजित केलेला वार्षिक थिएटर फेस्टिव्हल आहे.
भारतीय रंगभूमीचे प्रॅक्टिशनर्स कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय कलाकारांना आकर्षित करण्यासाठी हा महोत्सव सुरू झाला.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही भारतातील प्रीमियर थिएटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. भारत रंगमंचची सुरुवात भारतात रंगभूमीच्या वाढीस आणि विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आली.
मूलतः सर्जनशील नाट्य कलाकारांच्या कार्याचे प्रदर्शन करणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवाची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय झाली आहे
आता हा आशियातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव आहे.