The Day That Was – 04 Jul 2022

The Day That Was – 04 Jul 2022

  1. Digital India Week 2022:

The theme for Digital India Week 2022: Catalyzing New India’s Techade.

PM launches ‘Digital India Bhashini’, ‘Digital India GENESIS’ and ‘Indiastack.global’; also dedicates ‘MyScheme’ and ‘Meri Pehchaan’.

The Prime Minister, Shri Narendra Modi inaugurated the Digital India Week 2022, whose theme is ‘Catalyzing New India’s Techade’ in Gandhinagar today.

During the programme, he also launched multiple digital initiatives aimed at enhancing the accessibility of technology, streamlining service delivery to ensure ease of living and giving a boost to startups.

He also announced the first cohort of 30 Institutions to be supported under the Chips to Startup (C2S) Programme.

Details of the initiatives launched:

‘Digital India Bhashini’ will enable easy access to the internet and digital services in Indian languages, including voice-based access, and help the creation of content in Indian languages. The key intervention in building AI-based language technology solutions for Indian languages will be the creation of multilingual datasets. Digital India Bhashini will enable massive citizen engagement to build these datasets through a crowdsourcing initiative called BhashaDaan.

‘Digital India GENESIS’ (Gen-next Support for Innovative Startups) – a National Deep-tech Startup Platform, to discover, support, grow and make successful startups in Tier-II and Tier-III cities of India.  A total outlay of ₹750 Crore has been envisaged for the scheme.

‘Indiastack.global’ – a global repository of key projects implemented under India Stack like Aadhaar, UPI, Digilocker, Cowin Vaccination Platform, Government e-Marketplace (GeM), DIKSHA Platform and Ayushman Bharat Digital Health Mission. This offering of India to the Global Public Digital Goods repository will help position India as the leader in building Digital Transformation projects at a population scale and prove to be of immense help to other countries which are looking for such technology solutions.

‘MyScheme’ – a service discovery platform facilitating access to Government Schemes. It aims to offer a one-stop search and discovery portal where users can find schemes that they are eligible for. He will also dedicate to the citizens ‘Meri Pehchaan’-  National Single Sign On for One Citizen Login. National Single Sign-On (NSSO) is a user authentication service in which a single set of credentials provide access to multiple online applications or services.

The C2S Programme aims to train specialized manpower in the area of design of semiconductor chips at Bachelors, Masters and Research levels, and act as a catalyst for the growth of Startups involved in semiconductor design in the country. It offers to mentor at the organisational level and makes available State-of-the-art facilities for design to the institutions. This is part of the India Semiconductor Mission to build a strong design ecosystem in semiconductors.

डिजिटल इंडिया सप्ताह 2022:

डिजिटल इंडिया सप्ताह 2022ची संकल्पना : नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा.

‘डिजिटल इंडिया भाषिणी ’, ‘डिजिटल इंडिया जेनेसिस’ आणि ‘इंडिया स्टॅक डॉट ग्लोबल’ चे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन , ‘माय स्किम’ आणि ‘मेरी पहचान’ चे केले राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर इथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन केले. नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा  ही याची संकल्पना आहे. जीवन सुखकर करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सेवा प्रदान करणे अधिक  सुव्यवस्थित करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला.

चिप्स टू स्टार्ट अप्स (C2S) कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 30 संस्थांच्या समूहाची पंतप्रधानांनी घोषणा केली.

नव्या उपक्रमांचा तपशीलः

‘डिजिटल इंडिया भाषिनी ’ व्हॉइस-आधारित वापरासह भारतीय भाषांमध्ये इंटरनेट आणि डिजिटल सेवा सुगम्य करेल आणि भारतीय भाषांमध्ये सामग्री तयार करण्यास मदत करेल. भारतीय भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषा तंत्रज्ञान संशोधनामुळे  बहुभाषिक डेटासेटची निर्मिती होईल. डिजिटल इंडिया भाषिनीमुळे   भाषादान नावाच्या क्राउडसोर्सिंग उपक्रमाद्वारे हे डेटासेट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होऊ शकतील.

डिजिटल इंडिया जेनेसिस – भारताच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवरील शहरांमध्ये स्टार्ट अप उद्योग शोधणे, त्यांना पाठबळ पुरविणे, विकासासाठी मदत करणे आणि हे स्टार्ट अप्स यशस्वी करणे या उद्देशाने डिजिटल इंडिया जेनेसिस (अभिनव स्टार्ट-अप्ससाठी नव्या युगातील पाठबळ) हा राष्ट्रीय सखोल तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट अप मंच  आहे. या योजनेचा एकूण खर्च अंदाजे 750 कोटी इतका आहे.

‘इंडियास्टॅक.ग्लोबल’- इंडियास्टॅक अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आधार, यूपीआय अर्थात एकीकृत भरणा मंच, कोविन लसीकरण मंच, जीईएम अर्थात सरकारी ई-बाजार, दीक्षा मंच आणि आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे जागतिक भांडार. भारताने जागतिक सार्वजनिक डिजिटल वस्तू भांडाराला दिलेली ही भेट भारताला डिजिटल परिवर्तन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेण्यास मदत करतील आणि अशा तंत्रज्ञानविषयक उपाययोजना शोधणाऱ्या इतर देशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.

‘मायस्कीम’- हा सेवा शोधक मंच असून त्यातून सरकारी योजनांसाठी सुलभ पोहोच मिळण्याची सुविधा आहे.हे एककेंद्री तपास आणि शोधक पोर्टल असून त्यावर वापरकर्त्याला तो पात्र असणाऱ्या योजनांचा शोध घेता येईल. एनएसएसओ ही वापरकर्त्याच्या प्रमाणीकरणासाठीची सेवा असून त्यात ओळखपत्रांच्या एका संचाच्या वापराने अनेक ऑनलाईन सुविधा किंवा सेवा वापरता येऊ शकतील.

सीटूएस कार्यक्रम पदवी, मास्टर्स आणि संशोधन पातळीवर सेमीकंडक्टर चीपच्या संरचनेच्या क्षेत्रात विशेष मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने आखला आहे आणि हा कार्यक्रम देशातील सेमीकंडक्टर चीपच्या संरचनेमध्ये सहभागी असणाऱ्या स्टार्ट अप उद्योगांच्या वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतो.यातून संघटनात्मक पातळीवर मार्गदर्शन मिळते आणि संस्थांना संरचनेसाठी अत्यंत आधुनिक सुविधा उपलब्ध होतात. सेमीकंडक्टर्ससाठी  सशक्त संरचना परिसंस्था उभारण्यासाठी भारताने सुरु केलेल्या सेमीकंडक्टर अभियानाचा हा भाग आहे.

2. Legendary Freedom Fighter Alluri Sitarama Raju:

The Prime Minister, Shri Narendra Modi launched the year-long 125th birth anniversary celebration of legendary freedom fighter Alluri Sitarama Raju in Bhimavaram, Andhra Pradesh, today.

PM unveils 30-feet tall bronze statue of Alluri Sitarama Raju

He noted the confluence of major events like Azadi ka Amrit Mahotsav, 125th birth anniversary of Alluri Sitarama Raju and 100 years of Rampa Rebellion.

The Prime Minister informed that the 125th birth anniversary of Alluri Sitarama Raju Garu and the 100th anniversary of Rampa Kranti will be celebrated throughout the year. Restoration of his birth place at Pandrangi, renovation of Chintapalli police station, construction of Alluri Dhyana Mandir at Mogallu, these works are symbols of the spirit of Amrit Mahotsav.

Terming Alluri Sitarama Raju a symbol of India’s culture, tribal identity, valour, ideals and values, the Prime Minister remarked that from the birth of Sitaram Raju Garu to his sacrifice, his life journey is an inspiration to all of us. He dedicated his life for the rights of tribal society, for their happiness and sorrow and for the freedom of the country. “Alluri Sitarama Raju represents the spirit of ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ that has been uniting the country in one thread of unity”, the Prime Minister said.

The Prime Minister said Andhra Pradesh is the land of heroes and patriots. Here there were freedom heroes like Pingali Venkayya, who prepared the flag of the country.

“Alluri Sitarama Raju Memorial Tribal Freedom Fighters Museum” is also being built in Lambasingi, Andhra Pradesh. Similarly 15 November, the birthday of Bhagwan Birsa Munda has been demarcated as Rashtriya Janjatiya Gaurav Diwas.

Background of the event

As part of Azadi Ka Amrit Mahotsav, the Government is committed to giving due recognition to the contribution of freedom fighters and making people across the country aware of them. As part of the endeavour, Prime Minister Shri Narendra Modi launched the year-long 125th birth anniversary celebration of the legendary freedom fighter, Alluri Sitarama Raju, in Bhimavaram. Born on 4th July 1897, Alluri Sitarama Raju is remembered for his fight against the British, in order to safeguard the interests of the tribal communities in the Eastern Ghats region. He had led the Rampa rebellion, which was launched in 1922. He is referred to as “Manyam Veerudu” (Hero of the Jungles) by the local people.

The government has planned a series of initiatives as part of the year-long celebration. The birthplace of Alluri Sitarama Raju at Pandrangi in Vizianagaram district and Chintapalli Police Station (to mark 100 years of Rampa Rebellion – the attack on this police station marked the beginning of Rampa Rebellion) will be restored. Government has also approved the construction of Alluri Dhyana Mandir at Mogallu with a statue of Alluri Sitarama Raju in Dhyana Mudra, depicting the life story of the freedom fighter through mural paintings and AI-enabled interactive system.

महान स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू:

पंतप्रधानांनी अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे महान स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंती सोहळ्याचे उद्‌घाटन केले.

पंतप्रधान म्हणाले की, समृद्ध वारसा लाभलेल्या आंध्र प्रदेशच्या महान भूमीला अभिवादन करण्याचे भाग्य लाभल्याचा त्यांना  विशेष आनंद झाला  आहे. स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव, अल्लुरी सीताराम राजू यांची 125 वी जयंती आणि रम्पा क्रांतीची 100 वर्षे सारखे प्रमुख कार्यक्रम एकाचवेळी साजरे होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अल्लुरी सीताराम राजू गारु  यांची 125 वी जयंती आणि  रम्पा   क्रांतीची 100 वर्षे  देशभरात वर्षभर साजरी केली जाईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. पंडरंगी  येथील त्यांच्या जन्मस्थळाचा  जीर्णोद्धार, चिंतापल्ली पोलीस ठाण्याचे नूतनीकरण, मोगल्लू येथे अल्लुरी ध्यान मंदिराचे बांधकाम, हे कार्य अमृत महोत्सवाच्या भावनेचे प्रतीक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याबाबत सर्वांना परिचित करण्याचा संकल्प आजच्या कार्यक्रमातून प्रतिबिंबित होतो असे पंतप्रधान म्हणाले.

अल्लुरी सीताराम राजू हे भारताची संस्कृती, आदिवासी अस्मिता, शौर्य, आदर्श आणि मूल्यांचे प्रतीक असल्याचे सांगत पंतप्रधानांनी सीताराम राजू गारु  यांचा  जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी आपले जीवन आदिवासी समाजाच्या हक्कासाठी, त्यांच्या सुख-दु:खासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले. “अल्लुरी सीताराम राजू हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या त्या विचारधारेचे  प्रतिनिधित्व करतात जी  देशाला एकतेच्या एका धाग्यात जोडत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की आंध्र प्रदेश ही नायकांची आणि देशभक्तांची भूमी आहे. येथे पिंगळी वेंकय्या यांच्यासारखे स्वातंत्र्य वीर निर्माण झाले ज्यांनी आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तयार केला. ही कानेगंटी हनुमंथू, कंदुकुरी वीरेशलिंगम पंतुलू आणि पोट्टी श्रीरामुलू यांच्यासारख्या महान नायकांची भूमी आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच देशातील आदिवासींचा अभिमान तसेच वारसा यांचे प्रदर्शन करणाऱ्या वस्तुसंग्रहालयांची उभारणी होत आहे असे त्यांनी सांगितले. “अल्लुरी सीताराम राजू यांच्या स्मरणार्थ आदिवासी स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्याचे देखील काम आंध्र प्रदेशात लांबासिंगी येथे सुरु आहे. त्याचप्रमाणे, 15 नोव्हेंबर रोजी असलेली भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आता राष्ट्रीय आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, परदेशी राज्यकर्त्यांनी आपल्या देशातील आदिवासी समुदायांवर फार अत्याचार करण्याचे गुन्हे केले आणि त्यांची संस्कृती उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले.

या कार्यक्रमाची पार्श्वभूमी:

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या सोहोळ्याचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच या योगदानाविषयी देशातील लोकांना माहिती करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भिमावरम येथे महान स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125व्या जयंतीच्या एक वर्ष कालावधीच्या सोहोळ्याची सुरुवात केली. 4 जुलै 1897 रोजी जन्मलेल्या अल्लुरी सीताराम राजू पूर्व घाट प्रदेशातील आदिवासी समुदायांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्यासाठी सदैव स्मरणात राहतील. 1922 मध्ये सुरु झालेल्या राम्पा उठावाचे नेतृत्व त्यांनी केले होते. स्थानिक लोक त्यांना “मान्यम वीरुदु” म्हणजे जंगलांचा नायक असे म्हणतात.

या एक वर्ष चालणाऱ्या सोहोळ्यासाठी सरकारने अनेक उपक्रमांच्या मालिकेचे नियोजन केले आहे. विझीनगरम जिल्ह्यातील पांडरंगी येथील अल्लुरी सीताराम राजू यांचे जन्मस्थळ आणि राम्पा उठावाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल या उठावाची सुरुवात ज्या पोलीस स्थानकावरच्या हल्ल्याने झाली ते चिंतपल्ली पोलीस स्थानक या दोन्ही ठिकाणांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.  सरकारने, मोगाल्लू येथे अल्लुरी ध्यान मंदिराची उभारणी करण्यास मंजुरी दिली असून या मंदिरात अल्लुरी सीताराम राजू यांचा ध्यानमुद्रेतील पुतळा बसविण्यात येणार आहे, तसेच या मंदिरात भित्तीचित्रे आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित संवादात्मक प्रणालीद्वारे या महान स्वातंत्र्यसैनिकाची जीवन कहाणी सादर करण्यात येईल.

3. Ranking of States’ Exercise 2021 on support to Start-up Ecosystems:

Gujarat and Karnataka adjudged Best Performers among states; Meghalaya is the Best Performers among UTs and North-Eastern States

Kerala, Maharashtra, Orissa and Telangana are the Top Performers among States; J&K is the Top Performer among UTs and NE States

The results of the third edition of Ranking of States on Support to Startup Ecosystems were released. For the purposes of the Ranking, States and Union Territories are classified into 5 Categories, viz. Best Performers, Top Performers, Leaders, Aspiring Leaders and Emerging Start-up Ecosystems.

Gujarat and Karnataka emerged as the Best Performers in a category of States which included NCT of Delhi. Meghalaya won the top honour among UTs and North-eastern (NE) States. While Kerala, Maharashtra, Orissa and Telangana got the Top Performers award among states, Jammu & Kashmir emerged as the Top Performer among UTs and NE states.

Assam, Punjab, Tamil Nādu, Uttarakhand and Uttar Pradesh were adjudged the winners in the Leaders category among states; Andaman & Nicobar Islands, Arunachal Pradesh and Goa bagged the Leaders honour among the UTs and NE states. Chhattisgarh, Delhi, Madhya Pradesh and Rajasthan were declared as Aspiring Leaders among the States. Chandigarh, Dadra and Nagar Haveli & Daman and Diu, Himachal Pradesh, Manipur, Nagaland, Puducherry and Tripura were the Aspiring Leaders from the UTs and NE states. Andhra Pradesh and Bihar from States category and Mizoram and Ladakh from the UTs/NE States were clubbed under the Emerging Start-up Ecosystem.

The Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) has been conducting the States’ Start-up Ranking Exercise since 2018 to facilitate the ease of building a start-up and doing business across the country.

स्टार्ट-अप्सच्या संदर्भातील राज्यांच्या क्रमवारी:

महाराष्ट्र राज्याच्या कामगिरीत सुधारणा; ‘उत्तम कामगिरी’करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत मिळविले स्थान.

गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये ठरली.

स्टार्ट-अप परिसंस्थेला पाठबळ पुरविणाऱ्या राज्यांच्या क्रमवारीचा तिसऱ्या वर्षीचा निकाल जाहीर. ही क्रमवारी निश्चित करण्यासाठी देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची पुढील पाच श्रेणींमध्ये वर्गवारी करण्यात आली : सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये, उत्तम कामगिरी करणारी राज्ये, आघाडीवर असणारी राज्ये, आकांक्षित आघाडीची राज्ये आणि उदयोन्मुख स्टार्ट-अप परिसंस्था.

या क्रमवारीमध्ये गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये ठरली असून या श्रेणीत दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी परिसराचा देखील समावेश आहे. केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांच्या विभागात मेघालय राज्याने सर्वोत्तम सन्मान पटकाविला आहे.

4. ALH Squadron INAS 324:

Indian Naval Air Squadron 324 was commissioned into the Indian Navy in the presence of Vice Admiral Biswajit Dasgupta, AVSM, YSM, VSM Flag Officer Commanding-in-Chief, Eastern Naval Command at an impressive Commissioning Ceremony held at INS Dega, Visakhapatnam on 04 Jul 22. The unit is the first Naval Squadron on the Eastern Seaboard operating the indigenously designed and built Advanced Light Helicopter (ALH) MK III (MR) helicopters.

INAS 324 has been named “KESTRELS” which are birds of prey and have good sensory capabilities symbolising the envisaged role of the Aircraft and the Air Squadron. The Insignia of the Squadron depicts a ‘KESTREL’ searching over vast blue and white sea waves, which signifies the integral Maritime Reconnaissance (MR) and Search and Rescue (SAR) role of the Squadron.

ALH MK III helicopters are fitted with state-of-the-art equipment which includes modern surveillance radar and electro-optical sensors. Induction of these flying machines is, in pursuance of the GOI initiative of Atma Nirbhar Bharat, as they have been developed and manufactured by Hindustan Aeronautics Limited (HAL). In addition to their primarily roles of MR and SAR, these helicopters can also be deployed for Humanitarian Assistance and Disaster Relief(HADR) Operations as well as Special Operations with Marine Commandos. The helicopter also has an airborne Medical Intensive Care Unit (MICU) for use in the Air Ambulance role to facilitate the medical evacuation of critically ill patients.

एलएएच आयएनएस 324:

आयएनएस देगा, विशाखापट्टणम येथे 04 जुलै 22 रोजी  आयोजित एका शानदार समारंभात पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, एव्हीएसएम , वायएसएम , व्हीएसएम  व्हाइस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता यांच्या उपस्थितीत ,  आयएनएएस 324  विमान भारतीय नौदलात दाखल झाले. स्वदेशी रचना असलेले आणि एमके  III (एममार) प्रगत हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे (एएलएच) परिचालन करणारे हे पूर्व किनाऱ्यावर तैनात पहिले पथक आहे.

एएलएच एमके III या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत ज्यात  देखरेख  ठेवणारे आधुनिक रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर यांचा समावेश आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने  (एचएएल)  ही वजनाने  हलकी हेलिकॉप्टर्स  विकसित केली असून त्यांची निर्मितीही केली आहे. त्यामुळे भारत सरकारच्या   आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने,या हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. एमआर  आणि एसएआर   हे हेलिकॉप्टर  त्यांच्या मुख्य भूमिकांव्यतिरिक्त, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण  मोहिमा  तसेच मरीन कमांडोसह विशेष मोहिमांसाठी  देखील तैनात केले जाऊ शकतात.

हेलिकॉप्टरमध्ये गंभीर आजारी रूग्णांच्या वैद्यकीय स्थलांतराची सोय करण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सच्या रूपात वापरण्यासाठी एअरबोर्न मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एमआयसीयु ) देखील आहे.पूर्व नौदल  कमांडमध्ये पहिल्या एएलएच  एमके  III तुकडीची  नियुक्ती केल्याने पूर्व किनाऱ्यावर देखरेख ठेवण्याची क्षमता वाढेल.