The Day That Was – 06 July 2022

  1. MyGov Gujarat- The 18th MyGov State instance launched today:

MyGov Gujarat, the 18th MyGov state instance, has been launched today. The citizen centric platform has been launched with 4 key objectives –

  1. Discussion Forum on Saving rainwater and sharing water saving tips.        
  2. Discussion Forum on Ease of Living through e Governance.                   
  3. Poll on Swachhtha Abhiyaan.                                
  4. Blogs on Digital Seva Setu.

The MyGov Gujarat platform shall empower 6.67 crore Gujaratis to contribute even more, towards nation building.

MyGov, the world’s largest citizen engagement platform, was launched by Prime Minister Shri Narendra Modi  on 26th July 2014 with the idea of bringing the Government closer to the common man. MyGov has evolved into a platform that allows citizens to contribute ideas and suggestions and make participative governance a reality.

MyGov गुजरात- 18 व्या उपक्रमाचा आज आरंभ:

MyGov गुजरात- 18 व्या उपक्रमाचा आज प्रारंभ झाला.

4 प्रमुख उद्दिष्टांसह हा नागरिक केंद्रित मंच सुरू करण्यात आला आहे –

1.  पावसाचे पाणी वाचवणे आणि पाणी बचतीचे उपाय सामायिक करणे यावर चर्चा मंच.

2.  ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून जीवनमान सुलभतेवर चर्चा मंच.

3.  स्वच्छता अभियानावर मतदान.

4.  डिजिटल सेवा सेतू वर ब्लॉग.

MyGov गुजरात मंच 6.67 कोटी गुजरातींना राष्ट्र उभारणीत आणखी योगदान देण्यासाठी सक्षम करेल.

सरकारला सर्वसामान्यांच्या जवळ आणण्याच्या कल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 जुलै 2014 रोजी जगातील सर्वात मोठा, नागरिकांचा सहभाग मंच असलेले MyGov सुरु करण्यात आले. नागरीकांना आपल्या सूचना आणि कल्पना मांडण्याचे तसेच प्रशासनाच्या कार्यात सहभागी होण्याचे वास्तव प्रदान करण्याच्या रुपात MyGov मंच विकसित झाला आहे. 

2. “HariyaliMahotsav” to be organized by Ministry of Environment, Forest & Climate Change:

Ministry of Environment, Forest & Climate Change will be organizing “Hariyali Mahotsav” on 8th July, 2022 at Talkatora Stadium, New Delhi in the spirit of “Azadi Ka Amrit Mahotsav”. 

Hariyali Mahotsav, the “Tree Festival” is being organized to create awareness about the importance of trees in sustaining not only the life of the present generations but also to secure the future of forthcoming generations. Trees play extremely important role in mitigating adverse effects of climate change. This Mahotsav is perceived as an effective tool to instill enthusiasm among masses for forest conservation and planting trees. It holds immense importance in complementing the policy and program initiatives of the government towards environmental conservation. Hariyali Mahotsav is celebrated across the country in recognition of the crucial role of Forest/Greenery in maintaining the ecological balance and providing many ecosystem services to the planet.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात येणारा “हरियाली महोत्सव”:

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय 8 जुलै 2022 रोजी तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे “आझादी का अमृत महोत्सव” च्या भावनेने “हरियाली महोत्सव” आयोजित करणार आहे. सध्याच्या पिढ्यांचे जीवन टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्षांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हरियाली महोत्सव, “वृक्ष महोत्सव” आयोजित केला जात आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वनसंवर्धन आणि वृक्षारोपणासाठी जनसामान्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा महोत्सव एक प्रभावी साधन म्हणून ओळखला जातो. पर्यावरण संवर्धनासाठी सरकारच्या धोरण आणि कार्यक्रम उपक्रमांना पूरक म्हणून याला खूप महत्त्व आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यात आणि ग्रहाला अनेक परिसंस्था सेवा प्रदान करण्यात वन/हिरवळीच्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेऊन हरियाली महोत्सव देशभरात साजरा केला जातो.

3. Fuel Consumption Standards ( FCS):

Notification issued to include compliance with Fuel Consumption Standards ( FCS), for light, medium and heavy duty motor vehicles of various categories,  manufactured in, or imported by, India.

The Ministry of Road Transport and Highways has issued a notification   dated 1st July 2022 ,  amending Rule 115 G of the Central Motor Vehicle Rules  (CMVR) 1989 , to include compliance with Fuel Consumption Standards ( FCS), for light, medium and heavy duty motor vehicles of various categories,  manufactured in, or imported by, India. The continued compliance to FCS shall be verified as per the procedure of Conformity of Production, outlined in Automotive Industry Standard 149. 

Prior to this notification, compliance with Annual fuel consumption standard was limited to motor vehicles of M1 category (motor vehicle used for carriage of passengers, comprising not more than 8 seats, in addition to the  driver’s seat) with Gross Vehicle weight (GVW) up to 3.5 tonnes. The aim of this notification is to expand the ambit of vehicles for compliance with FCS, and hence introduce more fuel efficient vehicles.

The date of applicability of this notification is 01st April 2023.

इंधन वापर मानक (FCS):

भारतात निर्मित किंवा आयात केलेल्या विविध श्रेणींच्या हलक्या, मध्यम आणि अवजड मोटार वाहनांसाठी इंधन वापर मानकांचे (FCS)अनुपालन समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना जारी.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 115 G मध्ये सुधारणा करून, 1 जुलै 2022 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये  भारतात निर्मित किंवा आयात केलेली विविध श्रेणींमधील हलक्या, मध्यम आणि अवजड वाहनांसाठी  इंधन वापर मानकांच्या अनुपालनाचा समावेश करण्यात आला आहे.  मोटार वाहन उद्योग मानक  149 मध्ये नमूद  केलेल्या उत्पादन अनुकूल  प्रक्रियेनुसार इंधन वापर मानकांची  नियमित अनुपालन पडताळणी केली जाईल.

या अधिसूचनेपूर्वी, वार्षिक इंधन वापर मानकांचे पालन हे 3.5 टन पर्यंत एकूण वाहन वजन वाढीसह M1 श्रेणीच्या (प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे मोटार वाहन, ज्यामध्ये चालकाच्या आसन व्यतिरिक्त 8 पेक्षा अधिक सीट नसतील ) मोटार वाहनांपुरते मर्यादित होते.  या अधिसूचनेचा उद्देश एफसीएसच्या अनुपालनासाठी वाहनांची कक्षा विस्तारणे  आणि अधिक इंधन कार्यक्षम वाहने सादर करणे हे आहे.

ही अधिसूचना लागू होण्याची तारीख 01 एप्रिल 2023 आहे.