The Day That Was – 11 Jul 2022

  1. National Emblem cast on the roof of the new Parliament Building:
    The Prime Minister, Shri Narendra Modi unveiled the National Emblem cast on the roof of the New Parliament Building today morning.

The National Emblem is made of bronze with a total weight of 9500 Kg and is 6.5 m in height. It has been cast at the top of the Central Foyer of New Parliament Building. A supporting structure of steel weighing around 6500 Kg has been constructed to support the Emblem.

The concept sketch and process of casting of the National Emblem on the roof of New Parliament Building has gone through eight different stages of preparation from clay modeling/computer graphic to bronze casting and polishing.

नव्या संसद भवन इमारतीच्या छतावरील राष्ट्रीय मानचिन्ह:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी नवी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या छतावर बांधलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण झाले.

हे राष्ट्रीय मानचिन्ह ब्रॉन्झपासून बनवले असून त्याचे एकूण वजन 9500 किलोग्राम आहे. तर उंची 6.5 मीटर इतकी आहे. या मानचिन्हाला आधार देणारी, 6500 किलोग्रामची पोलादाची रचना देखील त्याच्याभोवती बसवण्यात आली आहे. नव्या संसद भवनाच्या बरोबर मध्यावर हे मानचिन्ह बसवण्यात आले आहे.

या मानचिन्हाची संकल्पना रेखाटन आणि आणि त्यानंतर तसा आकार देऊन ते तयार करणे हे काम तसेच, मानचिन्हाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी आठ विविध स्तरांवर काम करण्यात आले होते. यात, क्ले मॉडेलिंग/कम्प्युटर ग्राफीकच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

  1. Space Debris Management:
    The Minister inaugurated the “ISRO System for Safe & Sustainable Operation” (IS4OM) at ISRO Control Centre, Bengaluru today; Facility to provide a comprehensive and timely information of the space environment to users

IS4OM to safeguard Indian space assets, mitigate collision threats from space objects, to provide information for strategic purposes and research activities in Space Debris and Space Situational Awareness: Dr Jitendra Singh.

Around 60 Start-Ups have registered with ISRO since “unlocking” of the Indian Space sector recently by Prime Minister Narendra Modi, and quite a few of them are dealing with projects related to Space debris management. The other Start-Up proposals vary from nano-satellite, launch vehicle, ground systems, research etc.

IS4OM facility will aid India in achieving its SSA (Space Situational Awareness) goals by providing a comprehensive and timely information of the Space environment to users. This multi-domain awareness platform will bring a prompt, accurate and efficient information on on-orbit collision, fragmentation, atmospheric re-entry risk, space based strategic information, hazardous asteroids and space weather forecast.

ISRO has been taking necessary measures to safeguard all its Space assets from intentional and accidental close approaches by space objects including operational spacecraft and space debris objects.

IS4OM facility can support all routine operations safeguarding Indian space assets, mitigating collision threats from space objects through specific collision avoidance manoeuvres, information required for strategic purposes and research activities in Space Debris and Space Situational Awareness.

अंतराळातील कचरा व्यवस्थापन:
सिंह यांनी आज बंगळुरू येथील इस्रो नियंत्रण केंद्रात “सुरक्षित आणि शाश्वत कामकाजासाठी इसरो प्रणाली ” (IS4OM) चे उद्‌घाटन केले, वापरकर्त्यांना अवकाशातील वातावरणाची व्यापक आणि योग्य वेळेत माहिती देणारी ही सुविधा आहे.
IS4OM भारतीय अंतराळ मालमत्तेचे रक्षण करेल, अवकाशातील वस्तूंपासून धडक होण्याचे संभाव्य धोके कमी करेल, अवकाशातील कचरा आणि अवकाशातील परिस्थितीबाबत जागरुकता क्षेत्रात धोरणात्मक उद्देश आणि संशोधनासाठी माहिती पुरवेल : डॉ जितेंद्र सिंह.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीय अंतराळ क्षेत्र खुले केल्यापासून सुमारे 60 स्टार्ट-अप्सनी इस्रोकडे नोंदणी केली आहे आणि यापैकी काही अंतराळातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पांवर काम करत आहेत. तर इतर स्टार्ट-अप प्रस्ताव नॅनो-सॅटेलाइट, प्रक्षेपण वाहन, ग्राउंड सिस्टम, संशोधनाशी निगडित आहेत.

IS4OM सुविधा वापरकर्त्यांना अंतराळातील वातावरणाची व्यापक आणि योग्य वेळेत माहिती देऊन भारताला अवकाशातील परिस्थितीबाबत जागरुकता (स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस) संबंधी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करेल. हे बहु-क्षेत्रीय जागरूकता व्यासपीठ अवकाशातील टक्कर,विखुरणे , वातावरणातील पुन:प्रवेश धोका , अवकाश आधारित धोरणात्मक माहिती, धोकादायक लघुग्रह आणि अवकाशातील हवामानाचा अंदाज संबंधी त्वरित, अचूक माहिती पुरवेल.

घातपात आणि अवकाशातील वस्तू आणि अवकाशातील कचरा जवळ येऊन घडणाऱ्या अपघातांपासून भारताची अवकाशातील मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी इस्रो आवश्यक ती सर्व काळजी घेत असते.

IS4OM सुविधांचा भारतीय अवकाश मालमत्तेची सुरक्षा, अवकाशातील वस्तू आदळून होणाऱ्या अपघाताचे धोके कमी करणे, अवकाश कचरा आणि अवकाश स्थितीय जागरूकता यातून राजकीय उद्देश आणि संशोधन यांसारख्या दैनंदिन कामात उपयोग होऊ शकतो.

  1. India’s Public Service Broadcaster Launches New Logo:
    Prasar Bharati India’s public broadcaster, unveiled its new logo on 11th July 2022 & with that added a new chapter in its glorious history.
    In the new logo symbol for Prasar Bharati, an autonomous statutory body under the Ministry of Information & Broadcasting, the elements in the central circle and map of India signify the service of trust, security, and perfection for the common man. The organization started as All India Radio (AIR) in the past and Doordarshan (DD) was born to cater television services later and finally came Prasar Bharati (PB) by enactment of an act by the parliament, which is visualized in the logo identity as emerging and evolving from the centre.

While the elements in the central circle and map of India signify the service of trust, security and perfection to the Nation, its colour, ‘Dark Moderate Blue’ represents both the sky and the sea and is associated with open spaces, freedom, intuition, imagination, inspiration, and sensitivity. Blue also represents meanings of depth, trust, loyalty, sincerity, wisdom, confidence, stability, faith, and intelligence. The colour blue also pays tribute to the Indian ethos and traditions associated with religious figures, mythological characters found in the Indian miniature paintings.

Headquartered in New Delhi, Prasar Bharati is a statutory autonomous body set up by an Act of Parliament. It comprises of the Doordarshan Television Network and All India Radio (AIR), which were earlier media units of the Ministry of Information & Broadcasting.

भारताच्या सार्वजनिक सेवा ब्रॉडकास्टरने नवीन लोगो लाँच केला:
प्रसार भारती इंडियाच्या सार्वजनिक प्रसारकाने, 11 जुलै 2022 रोजी आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले आणि त्याच्या गौरवशाली इतिहासात एक नवीन अध्याय जोडला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या प्रसार भारती या स्वायत्त वैधानिक संस्थेच्या नवीन लोगोच्या चिन्हात, मध्यवर्ती वर्तुळातील घटक आणि भारताचा नकाशा सामान्य माणसासाठी विश्वास, सुरक्षा आणि परिपूर्णतेची सेवा दर्शवतात. भूतकाळात ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) म्हणून संस्थेची सुरुवात झाली आणि दूरदर्शन (डीडी) चा जन्म नंतर दूरदर्शन सेवा पुरवण्यासाठी झाला आणि शेवटी संसदेने एक कायदा लागू करून प्रसार भारती (पीबी) आली, जी लोगोच्या केंद्रातून उदयास येत आणि विकसित होत आहे असे दृश्यमान आहे.

मध्यवर्ती वर्तुळातील घटक आणि भारताचा नकाशा राष्ट्राला विश्वास, सुरक्षितता आणि परिपूर्णतेची सेवा दर्शवित असताना, त्याचा रंग, ‘गडद मध्यम निळा’ आकाश आणि समुद्र या दोन्हीचे प्रतिनिधित्व करतो आणि मोकळ्या जागा, स्वातंत्र्य, अंतर्ज्ञान, कल्पनाशक्ती, प्रेरणा आणि संवेदनशीलता. निळा रंग खोली, विश्वास, निष्ठा, प्रामाणिकपणा, शहाणपण, आत्मविश्वास, स्थिरता, विश्वास आणि बुद्धिमत्तेचा अर्थ देखील दर्शवतो. निळा रंग भारतीय नीती आणि धार्मिक व्यक्तींशी संबंधित असलेल्या परंपरा, भारतीय लघुचित्रांमध्ये आढळणारी पौराणिक पात्रे यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो.

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली, प्रसार भारती ही संसदेच्या कायद्याने स्थापन केलेली वैधानिक स्वायत्त संस्था आहे. यामध्ये दूरदर्शन टेलिव्हिजन नेटवर्क आणि ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) यांचा समावेश आहे, जे पूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माध्यम युनिट होते.

  1. Virus Infection And Progress of Brain Cancer:
    Scientists have found that cancer-causing virus Epstein Barr Virus (EBV) can infect the neuronal cells and drive various changes in biomolecules such as fatty acids, carbohydrates, and protein components, leading to diseases of the central nervous system as well as brain cancer.

EBV virus has been found to be widely present in the human population. It usually does not cause any harm, but the virus gets reactivated inside the body in some unusual conditions like immunological stress or immunocompetence. This may further lead to various complications like a type of blood cancer called Burkitt’s lymphoma, stomach cancer, multiple sclerosis, and so on. Earlier studies provided links of EBV involvement in various neurodegenerative diseases. However, how this virus can affect the cells of brain and manipulate them is still unexplored.

A research team from IIT Indore utilized the Raman microspectroscopy technique, supported by the Department of Science and Technology (DST) under FIST scheme to explore the possible impacts of a cancer-causing virus on brain cells. The technique based on Raman Effect is a simple, cost-effective tool to find sensitive chemical changes in biological samples.

The study, published in the journal ACS Chemical Neuroscience, showed that there could be timely and gradual changes in various biomolecules in the neuronal cells under viral influence. Additionally, these changes were distinct when compared to the changes observed in other supportive brain cells (that is, astrocyte and microglia).

विषाणू संसर्ग आणि मेंदूच्या कर्करोगाची वाढ:
शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, कर्करोगाला कारणीभूत ठरणारा ईबीव्ही अर्थात एप्स्टीन बार हा विषाणू न्यूरोनल म्हणजे मज्जासंस्थेच्या पेशींमध्ये संसर्ग निर्माण करू शकतो तसेच तो फॅटी असिड्स, कर्बोदके तसेच प्रथिन घटक यांसारख्या जैवरेणूंमध्ये केंद्रीय मज्जा संस्था आणि मेंदूचा कर्करोग यांना कारणीभूत ठरणारे विविध प्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी कारक ठरतो.

ईबीव्ही हा विषाणू मानव जातीत मोठ्या प्रमाणावर आढळतो. सहसा हा विषाणू कोणतीही इजा करत नाही. मात्र, शरीरात रोगप्रतिकारविषयक तणाव अथवा रोगप्रतिकार क्षमतेला आव्हान देणारी असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर हा विषाणू लगेच कार्यरत होतो. यामुळे, बर्किट्स लिम्फोमा नामक रक्ताचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, मल्टीपल स्क्लेरोसिस या आणि इतर अनेक प्रकारच्या कर्करोगांसारख्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. शरीराच्या मज्जासंस्थेची हानी करणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांच्या रुग्णांमध्ये ईबीव्ही विषाणूचा संबंध असल्याचे यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे. मात्र, हा विषाणू मेंदूच्या पेशींवर कशा प्रकारे परिणाम करतो आणि त्या पेशींमध्ये कर्करोगाचा संसर्ग कशा प्रकारे निर्माण करतो हे अद्याप शोधून काढता आलेले नाही.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने एफआयएसटी योजनेच्या माध्यमातून पुरविलेल्या पाठबळावर इंदूर येथील आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांच्या पथकाने कर्करोग निर्माण करणाऱ्या विषाणूचा मेंदूच्या पेशींवर होऊ शकणारा परिणाम शोधून काढण्यासाठी रामन मायक्रोस्पेक्ट्रोस्कोपी तंत्राचा वापर केला. रामन परिणामावर आधारित तंत्र जैविक नमुन्यांमध्ये घडून येणारे संवेदनशील रासायनिक बदल शोधून काढण्याचे साधे आणि किफायतशीर तंत्र आहे.

एसीएस केमिकल न्युरोसायन्स या पत्रिकेत प्रसिध्द झालेल्या अभ्यास अहवालातून असे दिसून आले आहे की, या ईबीव्ही विषाणूच्या प्रभावाखाली मज्जासंस्थेच्या पेशींमधील विविध जैवरेणूंमध्ये कालबद्ध पद्धतीने हळूहळू बदल घडून येऊ शकतात. त्याचबरोबर, या अस्ट्रोसाईट आणि मायक्रोग्लिया यांसारख्या इतर पूरक मेंदू पेशींमध्ये दिसून येणाऱ्या बदलांपेक्षा हे बदल अधिक ठळक असतात.