मित्रांनो Read This In English
सध्या मार्केट मध्ये पुष्कळशी पुस्तके आहेत MPSC राज्यसेवा/PSI /STI /ASST ह्या सर्व परीक्षेसाठी आणि सर्व पुस्तके, विषयांच्या अभ्यासासाठी आहेत. जनरल नौलेज साठी आहेत. पण एकतरी असं पुस्तक आहे का की ते तुम्हाला अभ्यास कसा करायचा, कोणती पुस्तके घ्यावेत, प्रत्येक विषयाला किती वेळ द्यावा जेणेकरून तुम्ही उपलब्ध असलेल्या वेळेत सर्व अभ्यासक्रम व्यवस्थितपणे पूर्ण करावा हे शिकवते?
अशी पुस्तकं अभ्यास काय काय करायचा हे शिकवतात पण कसा करायचा हे कोण शिकवेल? कोचिंग क्लासेसमध्ये हे शिकवतात पण मग सर्वांजवळ पैसे कुठे आहेत कोचिंग क्लास करायला, आहेत का तुम्हीच सांगा? मग अशांनी काय करायचं? काय करावं? पैसे नसतात ह्यासाठी म्हणून बरेचसे गुणवान मुलं/मुली मागेच राहून जातात. पण त्यांना हे कोणी सांगते का की कमी पैश्यात सुद्धा उत्तमोत्तम अभ्यास कसा करावा आणि कशी ही परीक्षा पास करता येईल?
एकतर MPSC परीक्षा द्यायची खूप इच्छा असते पण त्यासाठी काय करावं आणि फॉर्म कुठून आणायचा किती फी लागेल? कलेक्टर व्हावं, इन्स्पेक्टर व्हावं, पोलीस अधीक्षक व्हावं, पोलीस उपाधीक्षक व्हावं, तहसीलदार व्हावं असं सर्वांनाच वाटते पण त्यासाठी कोणत्या पद्धतीने अभ्यास केला तर आपण सिलेक्ट होवू हे कोण सांगेल?
खूप पैसे खर्च करून पप्पानी पुस्तकं आणून दिलेत पण बंटीला, पप्पूला, पिंकीला, छकुलीला हेच माहित नाही की इतक्या पुस्तकांचं कराव तरी काय! हे वाचू की ते वाचू? शेजारचा बाब्या MPSC देतोय म्हणून माझ्या पोरांनी/पोरींनी सुद्धा द्यावी असं प्रत्येक आई-वडिलांना वाटते पण मग ते ह्याला विचार त्याला विचार असं करून पुस्तकं विकत घेतात, नको असलेले पुस्तक सुद्धा आणतात आणि उगीच पैसे वाया घालवतात.
काहीना असं वाटते की चलो यार आता पुस्तकं तर घेतलेत, आपण परीक्षा नक्कीच पास होवू पण कसं होणार? काय फक्त पुस्तकं विकत घेतले म्हणजे आपोआप परीक्षा सुद्धा पास होणार? परीक्षेत पास व्हायला मेहनत लागते आणि ती सुद्धा योग्य पद्धतीनं अभ्यास केला तरच. पण योग्य पद्धत काय आहे हे कोण सांगणार?
काही जण एक पुस्तक घेवून बसतात तर ते सोडतच नाहीत आणि मग ऐन परीक्षा जवळ आली आणि वेळ कमी असला की मग हे वाचू की ते वाचू असा गोंधळ उडतो आणि थोडं थोडं करून सर्वच पुस्तकं वाचून काढल्याचा आनंद गगनात मावेनासा होतो पण जेव्हा परीक्षेचा रिझल्ट येतो तेव्हा लिस्ट मध्ये नाव न बघून हा विचार करून स्वतःला धीर देतात की यार मैने तो बहोत पढाई की थी मगर लगता है की MPSC वालोने घोटाला या गडबड किया है. पण त्यांना हे कोण सांगेल की बाबा तू जर व्यवस्थितपणे अभ्यासाचं प्लानिंग केलं असतं तर बरं झालं नसतं का? जर प्रत्येक दिवसाच प्लानिंग केलं तर रोज आपण काय आणि किती अभ्यास केला पाहिजे हे समजेल. दर आठवड्याला किती टोपिक्स कवर करायचेत हे नक्की होईल जर एका आठवड्याचा स्टडी प्लान करून अभ्यास केला तर. एका महिन्यात कोणता विषय पूर्ण झालाच पाहिजे हे जर अगोदरच ठरवलं तर अभ्यास करणं किती सोपं होईल हे कोण सांगणार ह्या भोड्या भाबड्यांना? एका वर्षात आपण सर्व विषयांचा अभ्यास केव्हा आणि कसा पूर्ण करू हे योग्य रीतीने स्टडी प्लान बनवला तरच शक्य आहे, होय की नाही तुम्हीच विचार करून सांगा! मग ह्यांना असे स्टडी प्लान बनवता येतील का? कोण बनवून देणार आहे?
MPSC मुख्य परीक्षा कशी असते हे जवळपास ५०% लोकांनाच माहित असते पण त्यापैकी सुद्धा असे असतात की त्यांना फक्त हे माहित असते की ही परीक्षा खूप कठीण आहे आणि त्यात बरेच विषय असतात. त्यापेक्षा आपण ही परीक्षा न दिलेलीच बरी असं म्हणून ते प्रयत्न न करताच हिम्मत सोडतात आणि दुसर काही शोधतात पण त्यांना हे समजत नाही की आपल्यात ही परीक्षा पास व्हायची योग्यता आहे पण ते जंगलात वाघ असतो हे माहित असल्यामुळेच जंगलात न घुसताच बाहेरूनच पळून जातात. अरे यार एकदा आत घुसून बघा तरी की वाघ आहे की नाही? आणि आहे तर तो कसा आहे? यार मर्द हो, एकबार देखो तो सही अंदर जाकर! मुलींनो तुम्ही पण MPSC परीक्षेच्या जंगलात जावून बघा कारण तुम्ही सुद्धा झाशीच्या राणी आहात! प्रयत्न केला तरच तो सफल होवू शकतो जर प्रयत्नच केला नाही तर सफल व्हायचा प्रश्नच कुठे येतो? येतो का? मग आता जंगलात जायचं ठरवलं तर मग आतमध्ये कसं जावं आणि काय काय हथियार सोबत न्यावं हे कोण सांगणार? दुसऱ्या शब्दात हेच की MPSC परीक्षा द्यायचं ठरवलं पण मग कोण कोणती पुस्तकं घ्यावी आणि त्याचा योग्य वापर कसा करावा हे कोण सांगेल?
इंटरव्ह्यू कसा असतो, त्याची तयारी कशी करायची, काय वाचावं आणि काय वाचू नये? इंटरव्ह्यू साठी कसे कपडे घालावेत, टाय घालू की नाही, शूज घालू तर कोणते घालू? इंटरव्ह्यू रुममद्ध्ये एन्ट्री कशी करू आणि कोणास अगोदर नमस्कार करू, बाईला की माणसांना? करू तर काय करू? कोणत्या प्रश्नाला कसं उत्तरं द्यावं? त्यांना राग आला तर काय करू? माझा उत्तरं तर बरोबर आहे आणि त्यांनी तर चूक आहे असं म्हटलं, आता मी काय करू, त्यांच्या उत्तराला ऐग्री करू की स्वताचीच हाकलू? काय करू आता मी तर फसलोच इथे!!! व्यवस्थित पणे इंटरव्ह्यू देवून जास्तीत जास्त गुण घेवून MPSC च्या परीक्षेत मेरीट लिस्ट मध्ये कसं माझं नाव येईल हे मला कोण सांगेल?
असे बरेचसे प्रश्न आहेत आणि हे जर मी लिहित बसलो तर कदाचित सकाळचे ११ वाजतील आणि आता सकाळचे साडे-तीन वाजलेत आणि मी उल्लू की तऱ्ह, हमेशा की तऱ्ह आप लोगो के लिये अपना रात का तेल जला रहा हुं!
मला हे सर्व प्रश्न पडले होते म्हणून मी ठरवलं की आपण फक्त ब्लॉग वर लिहूनच चालणार नाही म्हणून मी “MPSC यशाचं मंत्र” (MPSC Success Mantra Manual) हे पुस्तकं लिहून काढत आहे. जेणे करून वरील सर्व आणि बऱ्याचश्या दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील आणि बरेचसे जण ही परीक्षा उत्तमोत्तम पद्धतीने उत्तीर्ण होतील.
New edition according to new exam pattern and syllabus will be available on Amazon for your Mobile: Click HERE


Amazon var fakta Kindle edition ahe sir hard copy kuthe milel
@ऋषीकेश, प्रिंट एडिशन उपलब्ध नाही व पुढेही नसणार.
Sir
hey book, book kelya nantr kiti kalavadhi nantr milel
@विश्वजित, तुमचे पैसे आणि पत्ता मिळाला. ज्यांनी मॅन्युअल बुक केलं आहे व करतील त्या सर्वांना डिसेम्बरच्या पहिल्या आठवड्यात कुरियर किंवा स्पीड पोस्टने पाठवण्यात येईल.
I have completed my BA & now I m housewife but I would like to crack mpsc. Do I realy need a coaching classes which post is better option for me.
@Moniya, you can consider all the MPSC exams, refer the exams’ syllabi and then consider your strengths and weaknesses to arrive at a decision about which post to target. You can join our PGP which can be completed from the comforts of your own home (more details – Courses menu). Good luck.
Hello sir
I hv completed my PG in M pharm. Sir Cn u tell me which post l should select.
@Samapda, you may consider MPSC Rajyaseva exam for these posts: https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva/important-information/class-i-ii-posts-services-in-maharashtra/
Sir mala 2 year madhe kontihi post ghyachi ahe mi he book kss gheu ani konti book refer kru please sir kahitri suggestion dya
@निखील, सक्सेस मंत्र विकत घेण्यासाठी ही लिंक वाचून पेमेंट करा व तुमचा पत्ता दिलेल्या नंबरवर एस.एम.एस. करा.
Mr Hatagale Amol
Sur please one request. Sur Mla mpsc & upsc chi tyari kraychi ahe Sur .
Konte pustak changle ahet Te sanga Sur. Please take to me
@अमोल, ह्यासाठी सक्सेस मंत्र वाचा.
सर मला हे पुस्तक हव आहे त्या साठी काय करू
@Jaywnt, please follow the procedure mentioned here: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/
sir
ya book madhey fakt exam guidence ahe ka study material pn ahe
mala pn 1 copy book karaychi ahe
plz sirr tell me details about book
@प्रशांत, ही लिंक वाचावी: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-index-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/
sir he pustak marathi aahe na
@कल्पेश, हो.
Sir mla mpsc cha abhyas suru kraycha aahe pn maz math khupch kacch aahe.kai karu.aani abhyasach niyojan ks kru tyabddal margdarshm karave
@नितीन, हे सर्व “एमपीएससी सक्सेस मंत्र” पुस्तकात आहे.
सर आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल अतिशय आभार. माझा एक प्रश्न आहे सर , मला अभ्यासाची योग्य दिशाच माहिती नाहीये पुरातल्या अोंडक्यासारखी अवस्था झाली आहे फक्त वाहत चाललोय. ईच्छाशक्ती भरपुर आहे, क्षमता ही आहे, आत्मविश्वास ही दुनावलाय परंतु नेमकी सुरुवात कशी आणि कुठुन करावी पुढे जाऊन विस्तृत अभ्यास कसा करावा याबद्दल Direction च मिळत नाहीये. आपला अनुभव खुप अ्वाढव्य आहे .मला या टप्प्यावर आपल्या वैचारिक व आत्मविश्वास वाढवणार्या मार्गदर्शनाची खरी गरज आहे माझी विनयतापुर्वक आपल्याला विनंती आहे कृपया मार्गदर्शन करावे.
@श्रीकांत, जो पर्यंत तुम्ही तुमची तयारी प्लानिंग नुसार करणार नाही तो पर्यंत काहीच शक्य नाही. स्वत:वर एक कंट्रोल असावा. आज इतका अभ्यास झालाच पाहिजे असे ठरवूनच तयारी करावी. स्वत:चे नोट्स बनवावेत. सर्व काही (स्टडी प्लान्स) लिखित स्वरुपात असावे तरच त्यानुसार एक एक पाउल पुढे ठेवता येईल व तुमचे स्वप्न पूर्ण करता येईल. तुम्हाला स्वत:ला प्लानिंग वगेरे जमत नसेल तर मग आमचा पिजीपी जॉईन करा, वेळ न घालवता.