चालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये!

खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचावेत:

  • नवीन कायदे, बिल्स (उदा. महिलांसाठी आरक्षण)
  • इ-गावार्नंस (e -governance), प्रशासनिक फेरफार, सरकारच्या वेग वेगळ्या योजना
  • डीम्ड-युनिवर्सितींशी (Deemed -University) संबंधित व इतर शिक्षणाशी संबंधित बातम्या
  • आंतरराष्ट्रीय घडामोडी, वेग वेगळ्या देशांशी केलेले करार, भारताचे आजूबाजूच्या देशांशी असलेले वाद, सार्क[SAARC ], ओपेक[OPEC ], एशियन[ASEAN], चोग्म [CHOGM], सारख्या ओर्गानाय्झेशानांशी संबंधित बातम्या, आंतरराष्ट्रीय निवडणुका बद्दल बातम्या.
  • भारतीय सेनेच्या दुसऱ्या राष्ट्रांसोबत झालेल्या एक्झार्स्यीज[excercises], सैनिकी सामान खरेदी करार, सैनिकी ऑपरेशन्स, इत्यादी
  • भारतीय आर्थिक बातम्या- जसे, सरकारच्या पोलिसिज, मोठ्या कंपन्या व त्यांचे बॉस, भारतीय बजेट, चालू पंच वार्षिक योजनांचे आराखडे व त्यात घडून येणार बदल. रुपयाचे दुसऱ्या देशांच्या नाणे शी होत असलेले बदल, दुसऱ्या देशांशी आर्थिक संबंध व नवे करार.
  • नवे रोग व त्यावर होणारे उपाय [vaccines], स्वाईन फ्लू, एड्स, इत्यादींवर नवीन उपचाराशी निगडीत बातम्या, सोलर एनर्जी, वातावरणाशी संबंधित होणारे बदल व त्यासाठी करण्यात येणार बदल. उपग्रह व नवनवीन मिशन्स, बायोतेक्नोलोजीशी संबधित बातम्या, हायब्रीड बीज उपक्रम, इत्यादी.
  • अवार्ड्स कुणाला मिळालेत व कशासाठी: नोबेल पीस प्रायीज, भारतरत्न, खेळांशी संबंधित अवार्ड्स, न्याशाणाल अवार्ड्स, स्पोर्ट्स अवार्ड्स.
  • संडेच्या न्यूजपेपर मध्ये नवीन बुक्स व त्यांचे लेखकाबद्दल माहिती येत असते तर ते लिहून ठेवणे.
  • tennis खेळाशी संबंधित बातम्या, क्रिकेट वर फार कमी प्रश्न असतात तर बाकी दुसऱ्या खेळा विषयीच्या बातम्या.
  • भौगोलीक बदल, त्याची कारणे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम. ह्यावर करण्यात आलेले व करण्यात येणार उपाय, इत्यादी.

खाली दिलेले मुद्दे महत्वाचे नसल्यामुळे MPSC मध्ये त्यावर प्रश्न येत नाहीत:

  • राजनीतिक पार्ट्या व त्यांचे दलबदलू धोरण. राजनैतिक नेत्यांची भाषणे व एकमेकांवरच्या टीका
  • टेररिस्ट ग्रुप्स, माओवादी ग्रुप्स, उल्फा व त्यांचे हल्ले, इतर आतंकवादी संघटन.
  • अक्सीडेनट्स, नवीन ट्राफिक रुल्स, इत्यादी
  • चोरी व इतर गुन्हे, ह्याप्रकारच्या घटना
  • क्रिकेट, बॉलीवूड बातम्या, फिल्मी गपशप, इत्यादी

आता सर्वात महत्वाचा प्रश्न. एखाद्या उमेदवाराच्या मनात नक्कीच खालील प्रश्न येवू शकतो.

जर का मी न्यूजपेपर्स वाचलेच नाहीत तर काय होणार, कुणी मला फाशीवर चढवेल का? का बर मी इतकी मेहनत घ्यावी आणि दररोज १-२ न्यूजपेपर्स वाचून , मग त्यावर नोट्स काढावेत, का पण? माझ काय डोक-बिक फिरलंय का एक वर्षभर ह्या बातम्या लिहून ठेवू?

परीक्षेच्या आधी काही दिवस, चालू घडामोडीवर एक झक्कास लेटेस्ट पुस्तकं घेईन आणि खूप अभ्यास करीन वेळेवर, तेव्हाच लक्षात राहील न!  हे काय आतापासून टेन्शन घेत बसायचं! छ्या..

नाही, कुणीच फाशीवर चढवणार नाही. I repeat again and again, नाही, कुणीच फाशीवर चढवणार नाही. घ्या तुम्ही वेळेवर एखाद हे जाड पुस्तकं आणि बसा घेवून समोर. जसजशी परीक्षा तोंडावर येईल तसतसा घाम सुटेल, टेन्शन वाढेल, काय वाचू आणि काय नाही असं होईल. आणि  नेहमीसारखं घडेल: ते पुस्तकं सगळ वाचून होणार नाही.

पण एक गोष्ट मात्र नक्कीच होईल की मुख्य परीक्षा २०१०, पूर्व परीक्षा २०११ व मुख्य परीक्षा २०११ मध्ये जेव्हा जनरल स्टडीज चा पेपर हाती येईल तेव्हा नक्कीच तुमचं डोक एकदम शांत असेल, काहीच समजणार नाही, काय करू आणि काय नाही असं वाटेल मग थोड्यावेळाने डोक फिरेल आणि मग तुम्हाला पश्चाताप होईल की खरं AnilMD’s ब्लॉग वर लिहिलेलं मी फॉलो केलं नाही म्हणून ही वेळ आली आणि आता काय लिहू मी ह्या परीक्षेत?

म्हणून जीव तोडून सांगतो, आता तरी उठा, जागे व्हा झोपेतून आणि परीक्षेच्या तयारीला लागा. कशाची वाट बघता काय माहित. तो मोबाईल सोडा बस झालेत तुमचे SMS करणं आणि गाणे ऐकणं. पुरे आता.

नेहमी परीक्षा झाल्यावर पश्चाताप करता आणि ठरवता की “नाही यार आता तरी खूप अभ्यास करीन आणि पुढच्या परीक्षेत नक्कीच क्लियर होईन, आई शपथ यार”.  पण तुमची  ती जुनी सवय अजूनही गेली नाही ना! करो, ऐश करो, तुमचं काय जाणार, जाणार ते आई-बापाचे पैसे जाणार ना!

जेव्हा तुमचे अति महत्वाचे वर्ष वाया जातील तेव्हा बराच उशीर झालेला असेल…पण तेव्हा…खूप उशीर झालेला असेल!!!

Exam Tips: What to Read and What Not to Read from Newspapers

228 Responses to चालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये!

  1. Dnyaneshwar म्हणतो आहे:

    Sir mi 2011 la psi mhnun karyarat ahe. Mla rajyaseva sathi chapterwise McQ ani multiple subject wise McQ with explanation ani practice mcq kuthe milu shakel sangta eil ka plz

  2. Akash Wakode म्हणतो आहे:

    Sir mazhe b com just zhale ahe ani mla mpsc Chi tayari Karaychi ahe but I don’t understand.ki starting kashi karavi ani konte books prepare karavet so please give me best suggestion for the books and starting.

  3. Bharat Pawar म्हणतो आहे:

    Sir mi open category madhun ba fy kele ahe maze vay 32 varsh ahe obc tar mi pudhe kay karu shakato

  4. Anil म्हणतो आहे:

    Sir I am presently 36 yrs. I hear a news of age limit enhanced upto 38 yrs for open category…. Is it correct if not..what is present age limits…

  5. Avinash pawar म्हणतो आहे:

    खुप चांगल लिहिलेल आहे सर,
    तुमच्यामुळे मला यूपीएससी बद्दल बरीच माहिती झाली आहे तर मी Tybsc science la aahe पण मला आता upsc करायची आहे तर त्यासाठी सुरुवात कशी करावी त्यासाठी मार्गदर्शन करावे अशी विनंती.

  6. Shankar rama gawade म्हणतो आहे:

    Sir me आजच mpsc च admission घेतल आहे. April 02 la exam आहे.Mazaya kade 4 महीने आहेत ह्या चार महिन्यात मला अभ्यास करता येईल काय किंवा कसा करावा.व कुठली books वाचावीत.

  7. Sharad Patil म्हणतो आहे:

    Namaskar sir,
    Me sharad, sir me sadhya job karat asun (10 hr.) mala study sathi time nahi milat tar kahi tips sanga mhanje tyanusar me study karanyacha prayatna karen ani khas mhanje mala SAT ani SUN suti aste tyamule mala preparation sathi changala time milato

    • AnilMD म्हणतो आहे:

      @शरद, त्यासाठी कमीतकमी एक वर्षापुढील परीक्षेसाठी तयारी करावी म्हणजे सर्व विषयांचा अभ्यास उपलब्ध असलेल्या वेळेत थोडाथोडा करून पूर्ण करता येईल. सुटीच्या दिवशी जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा.

  8. Ajinkya ghongade म्हणतो आहे:

    सर मी आता 12 वी ला आहे व मी माझ्या 9 पासच्या टीसी वर बी.काॅम ला आडमीशन घेतले आहे. तरी मला आत्ता पासुनच एमपीएसी तयारी करायची आहे. व माझे आत्ता वय 24 वष आहे तर मला येणा-या काळात परीक्षा देता येईल का
    व एमपीएसी परीक्षा देण्याची वयाची आट काय

  9. Rushikesh Sure म्हणतो आहे:

    आदरनिय स…
    Mpsc chi study suru Kashi Karu
    Mala mahit nahi please saga sir

Leave a reply to Anil उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.