हेलो मित्रांनो,
आता तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 साठी अर्ज भरण्याची तयारी करत असाल अथवा आता पर्यंत भरला सुद्धा असेल.
तुम्हाला माहित आहेच कि मागील काही वर्षात एमपीएससी सर्व्हर चे काही प्रॉब्लेम्स घडून येतात जसे:
- बऱ्याच जणांचा data उडून जातो.
- कुणाच्या फी बद्दल माहितीच दिसत नाही.
- कुणाचे सेंटर दिसत नाही.
- कुणी फी भरलीच नाही असे दिसते.
- ज्याने सेंटर निवडले होते ते नसून दुसरेच सेंटर दिसते.
- कुणाचे लोगीनच होत नाही.
असे अनेकांच्या बाबतीत घडत असते, त्यामुळे अर्ज भरतांना काही काळजी घ्यावयाची असते. जेणेकरून मग ऐनवेळी तुमच्यासोबत वरीलपैकी काही घडले तर मग तुम्ही लगेच तुमच्याजवळ असलेले प्रुफ परीक्षाकेंद्रावर दाखवून परीक्षा तरी देवू शकाल.
अर्ज भरतांना खालील काळजी घ्या:
- अर्ज भरल्यानंतर तुम्हाला Transaction ID मिळतो ती window जेव्हा येते तेव्हा तुम्ही खालील प्रमाणे तिचा स्क्रीन शॉट घेवून ठेवा व तो Microsoft Word मध्ये पेस्ट करून ठेवा. नंतर त्याची प्रिंट काढून ठेवा. उदाहरणार्थ खालील स्क्रीन शॉट बघा:
- त्यानंतर online (net banking) द्वारे फी भरून Receiptचा स्क्रीन शॉट सुद्धा घ्या व तो Microsoft Word मध्ये पेस्ट करून ठेवा. नंतर त्याची प्रिंट काढून ठेवा. उदाहरणार्थ खालील स्क्रीन शॉट बघा:
- ह्यात बघा लाल अक्षरात काही मेसेज दिसतोय.
- त्यानंतर सेंटर सिलेक्ट करा. आपण व्यवस्थितपणे सेंटर सिलेक्ट केले कि नाही ते चेक करण्यासाठी तुमच्या प्रोफाईल मधील “Select Centre” हे ऑप्शन क्लिक करा. तुम्ही सेंटर निवडलेले असेल तर तुम्हाला खालीलप्रकारचा मेसेज मिळेल. तो सुद्धा Microsoft Word मध्ये पेस्ट करून ठेवा. नंतर त्याची प्रिंट काढून ठेवा. जसे:
- शेवटी सर्व कन्फर्म झाल्यावर Final Receipt सुद्धा Microsoft Word मध्ये पेस्ट करून ठेवा. नंतर त्याची प्रिंट काढून ठेवा. हे करण्यासाठी तुमच्या प्रोफाईल मधील “Receipt” हे ऑप्शन क्लिक करा. मग तुम्हाला तुमची Receipt दिसेल, जसे:
- ह्यात बघा लाल अक्षरातील फी बद्दलचा मेसेज दिसत नाहीये. म्हणजे ही तुमची Final Receipt आहे.
वरील सर्वांची प्रिंट काढून सांभाळून ठेवा. जर कधी गरज पडली तर तुम्हाला ऐन वेळेवर काही अडचण येणार नाही व तुम्ही तुमची परीक्षा निश्चिंतपणे देवू शकाल.
सर्व मित्रांना अर्ज भरण्यासाठी Good Luck आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमचा मित्र,
अनिल दाभाडे
डायरेक्टर
एडीज आय.ए.एस. अकादमी
i am not fill exam centre for mpsc 2016. what shall i do. my form has accept or not, please inform me
@Santosh, as per norms, you will get your district place as your exam centre or a place nearby if seats are not available at any of the exam centre(s) at your district place.