राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

How To Train Your Mind For Mental Stress During Exam: To Read Click HERE

पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.

 • सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
 • परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
 • ४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे.
 • प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
 • जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
 • पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे.
 • पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग  अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?

सर्व काही कष्टानेच मिळते, फुकट काय मिळते आजकाल? तुम्ही म्हणाल कि “हे काय, अनिल दाभाडे कडून आम्हाला फुकट मार्गदर्शन मिळते ना!!” पण अरे बाबांनो, ह्यात कष्ट आलेत की, तुमचे नाही पण माझे तरी आहेत ना?

प्रत्येक गोष्टीला एकतर पैसे खर्च करावे लागतात नाही तर कष्ट तरी लागतात.

आता मी हे जे लिहित आहे ते रात्री २ वाजता लिहित आहे तर तुम्हीच विचार करा कि मला किती कष्ट पडत असतील? तर मित्रांनो, जरा कष्ट करा अभ्यास करा आणि पूर्वपरीक्षेची पायरी चढून जा. मी तुमच्यासाठी दुसरी पायरी तयार करत आहे आणि हो हे लक्ष्यात ठेवा की ती पायरी पहिल्या पायरी पेक्षा खूप कठीण आहे…मी तुम्हाला घाबरवत नाही रे मित्रांनो, फक्त हे सांगत आहे की आताच्या कष्टांपेक्षा पुढे जास्त कष्ट आहेत. म्हणून आतापासूनच तयारीत रहा, खा प्या आणि स्वतःला मुख्य परीक्षेची पायरी चढून जायला सज्ज करा. घाबरू नका, अनिल दाभाडे तुमच्या पाठीशी आहे.

How to solve question papers? Read This

1,951 Responses to राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

 1. vijay kailas borhade says:

  सर मला mpsc परीक्षा दयायची आहे तर या परीक्षेसाठि अभ्यासाला सुरवात कशाप्रकारे करावी ,मी एक मेडिकल2nd year student आहे पण मला mpsc upsc मध्ये आवड आहे व देण्यासाठी इच्छा ईहे कृपया माहीति दयावी ।

 2. Ramesh Pawar says:

  Sir SSC nantar ycm open univacity made B.A kel tar mpsc deta yeil ka without HSC varun kahi adchani yet asel tar pls sanga sir mahiti

 3. Nikesh says:

  Sir me rajtasevechi tayari kartoy ra parikesathi reference book saga and sti main exam sathi reference book konte vaprache

 4. suvarna anand naidu says:

  sir mala exam baddal mahiti ashi havi aahe ki hya exam sathi education kiti asave lagte tasech age limits aahe ka? english shivay itar mhanje marathitun exam deta yete ka?

 5. Pradeep patil says:

  Vicrikar nirikshik ya padala purva pariksha aste ky.

 6. shubhanda says:

  Sir sti chya interview nkki cancel jhalya ahet ka?? Ani mpsc first attempt mdhe clear honya sathi kamit kmi kiti tas abhyas krava lagto? ?

 7. Mayur patil says:

  Sir me aata graduation appear ahe tr nemki konti book refers karava te kalatc nahi sir.Sir suugest for me.

 8. vinita says:

  Sir,mi b b a graduate aahe
  Mpsc dyayachi ichha aahe…
  Muddesud aani nemaka abhyas kasa karawa yababtit krupaya margadarshan karawe…
  mi gruhini asun,lahan baal sambhalun urlela sampurn wel abhyasat kasa yogya karani lawata yeyil te krupaya sangawe

 9. aneesh says:

  Sir pre p1 madhe biology ani environment sathi kuthle books refer karyche

 10. pravin says:

  thank you sir… it will help all the students… who are trying for mpsc an upsc exams .

 11. amol shewale says:

  thnks fr info. sir mpsc pre la upsc sarkhe c sat qualifing ahe ki purn marks pakdtat ? pls reply

 12. Ganesh Pandhari Sadgir says:

  सर मी ARMY आहे 15 year चालू आहे .

  MPSC
  Exam chi tayari karayla margdarshan have aahe BA YCM madhun last year la aahe

 13. RUPALI INAMDAR says:

  Useful information. I want to kno how n from where I have to start study,I HV completed B.A ,B.end ,my subject was Sanskrit for B.A,suggest me pls,n let me know how I hv to happy for mpsc

 14. Roshan says:

  sir mla STI pre ani mains exam babtit mahiti sanga,,pre exam mdhe paper scoring asto ki fakt qualifying

 15. Mahesh Gunjal says:

  Sir…..,
  I’ve completed my BE Computer Engg. And I was recently apply for rajya seva preliminary examination but in that case I’m confused over what kind of study to do for examination please assist me which books I’ll referred to get best score in exam….??

 16. Shraddha Zankar says:

  very exlent sugession,so…thank u very much sir….

 17. Baban pawara says:

  Sir mla rajyseva pre/mains sathi study materials ( books )konti use kravi yachi mahiti haviy…please..

 18. JAYASHREE BELAPURKAR says:

  I want papers model for mpsc prelims & mains

 19. Sir mala rajyasevecha syllabus sanga mala study karatana khup confuse hot a plz

 20. Sopan B Wagh says:

  Hi..sir, Mi B A, D T Ed pass aahe , aata mi s r f jalana yethe job karto .. mala Rajya Sevechi tayari karayachi aahe.. tari aapan mala aabhyas kasa karava aani konti books waparave te sanga…

 21. vaishli kadam says:

  Very good supported all examiners

 22. swati donde says:

  Thanku sir , clear to my understanding. & my self confidence in persanylit

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s