रिविजन ची वेळ आली आहे

मित्रांनो, काय कसा काय चालू आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास?

बहुतेक  सर्वांनीच संपूर्ण अभ्यासक्रम कवर केला असेलच, होय की नाही? गुड!
चला आता रिविजन ची वेळ आली आहे …आता ह्याबद्दलच बोलूया.

१ मे ते ७ मे २०१० ह्या एका आठवड्यात तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाची रिविजन करावी लागणार आहे. तुम्ही नोट्स बनवले असतीलच तर, ह्या काही महिन्यात अभ्यास करतांना, बनवले की नाही? नाही? बाप रे? का बरं? ऑफिसला जाता म्हणून? वेळच मिळाला नाही? अरे बाबांनो काय चालू आहे हे? म्हणजे इतके दिवस झालेत, मी किती स्टडी प्लान बनवून दिलेत तुम्हाला, त्याचं काय केलं?

हे बघा, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही फार कठीण परीक्षा आहे. आता असं म्हणू नका की मी तुम्हाला घाबरवत आहे, नाही असं बिलकुल नाही. कोणत्याही परीक्षेत पास व्हायचं असेल तर मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. एक उदाहरण पाहू या का? मी खालीलप्रमाणे सांगतो तसं करा:
१. सर्वप्रथम आंघोळ करा
२. स्वच्छ कपडे घाला
३. शांत अशी जागा निवडा  आणि तिथे एक स्वच्छ कपडा टाका किंवा चटई टाकून गुडघ्यावर बसा आणि हात जोडून डोळे बंद करा
४. ज्या देवाला, महापुरुषाला तुम्ही मानता त्यांचं स्मरण करा.
५. आता असं म्हणा की हे बाप्पा/देवा/महापुरुषा/गुरुदेव ‘मला MPSC परीक्षेचं हॉल तिकीट आलेलं आहे, प्लीज मला मदत करा. मी ही परीक्षा पास झालोच/झालीच पाहिजे. माझ्याजवळ अभ्यासाला वेळ नाहीये म्हणून तुम्ही तेवढा अभ्यास करून द्या माझा आणि परीक्षेत मला सर्व आठवू द्या आणि माझा पेपर एकदम झक्कास गेला पाहिजे आणि मी उत्तम मार्काने मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट झालो/झाली पाहिजे”.
६. आता डोळे उघडा आणि चटई उचलून ठेवा, कपडे चेंज करा.
७. वाटल्यास ऑफिस ला जा किंवा  जे तुमचं नेहमीचं आहे ते करा पण मात्र अभ्यास करू नका. मी कोण आहे तुम्हाला काही म्हणणारा?

आता बघा काय होणार, तुमचा रिझल्ट झक्कास येणार… पूर्वपरीक्षेचा रिझल्ट  जेव्हा येईल तेव्हा लिस्ट मध्ये तुमचं नाव बघा
कमीने पिक्चर चं टायटल म्युझिक माहित आहे का?
“Tan Tya Ddhyan …” ..बिलकुल असाच रिझल्ट आहे बघा तुमचा. होय की नाही?

वरील माझ्या Top  ७ टिप्स ची कमाल आहे ही बाबांनो…. नाही नाही माझी कमाल नाही, खरं तर ही तुमची कमाल आहे म्हणावं.

पुरे आता..जे उमेदवार अगदी सिरिअस नसतील अभ्यासाबद्दल त्यांचे तर डोळे उघडले च असतील ह्याची मला खात्री आहे.

बघा, मेहनत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याला तोड नाही. “प्रयत्न केल्याने होत आहे रे आणि ते केलेच पाहिजे” ही म्हण अगदी खरी आहे. आज जर तुम्ही डोळ्यांत तेल टाकून अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि नाही तर काहीच मिळणार नाही, हे लक्ष्यात ठेवा. (आता खरोखरच डोळ्यांत तेल टाकू नका नाही तर डॉक्टर कडे जाल आणि त्याच बिल मला पाठवाल.)

रिविजन कशी करावी? ….ओके, अशी करावी:
१ मे ते ७ मे ह्या एका आठवड्यात जे शक्य होईल ते वाचून काढा. जर नोट्स बनवले असतील तर ते वाचून काढा. जर नसतील काढले तर प्रत्येक  टॉपिक चे मुख्य मुद्दे वाचून काढा. आता तुमच्या कडे नोट्स लिहून काढायचा वेळ नाही तर त्यात वेळ गमावू नका. जास्तीत जास्त वाचन करा. ऑफिस मध्ये जात असाल तर कृपया ९ दिवसाची रजा/सुट्टी घ्या प्लीज.

जे  काही करायचं आहे तो अभ्यास १  मे ते ७ मे दरम्यान करा. रोज १२ ते १६ तास अभ्यास करा, वेळेवर जेवण करा, खूप पाणी प्या. तब्येती  कडे लक्ष द्या. फळं खा: टरबूज, चिकू, संत्री. मोसंबी, केळी, जे काही आणून खावू शकाल ते आणा आणि खा. अभ्यासाला भरपूर वेळ द्या. आणि हो, ह्या ७ दिवसात जितके जास्त प्रश्न संच सोडवता येतील तितके प्रश्न संच सोडवा. पण एक लक्षात ठेवा की १ प्रश्न संच २ तासातच सोडवा म्हणजे तुम्हाला परीक्षेत ह्या सरावाची मदत होईल.

८ मे ला अभ्यास बिलकुल करू नका…एखादा सिनेमा बघा किंवा फमिली सोबत कुठे तरी पिकनिक ला जा …खूप एन्जॉय करा ८ तारखेला.  तुमच्या ताण पडलेल्या मनाला व शरीराला ह्याची खूप गरज असेल. डोकं शांत होईल म्हणजे ९ मे ला तुम्ही आरामात परीक्षा देवू शकाल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकाल. जमेल तर परीक्षा केंद्र कुठे आहे ते बघून या, जर तुम्ही त्याच शहरात असाल तर. बाहेरून येणाऱ्या उमेदवारांनी ८ मे ला रात्रीच त्या शहरात पोचावं आणि ते केंद्र पाहून घ्यावं.

९ मे ला सकाळीच उठून फ्रेश व्हा, काही तरी खावून घ्या पण इडली डोसा, भात हे पदार्थ खावू नका, ह्याने तुम्हाला झोप येईल.
१ तास अगोदर  परीक्षा केंद्रावर जा. आणि पेपर हातात येताच …..ऑल द बेस्ट…हा हा हा हा!!!

4 Responses to रिविजन ची वेळ आली आहे

  1. Naveed Shaikh म्हणतो आहे:

    Pls post the study plan for Pre exams to be held in feb 2012 if we start our studies now.

  2. akilesh म्हणतो आहे:

    when the mpsc pre exam 2012

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.