MCQs – ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांसाठी कशी तयारी करावी

मित्रांनो, आज STI ची परीक्षा दिल्यानंतर बऱ्याच जणांची विकेट उडाली असेल, होय ना?

अरे बाबा, जर तयारीच तशी केली असेल तर असा होणारच ना!

काही जणांसाठी टफ पेपर होता तर काहींसाठी सोपा होता. ह्याचं एकच कारण कि व्यवस्थित तयारी केलेली नव्हती, बरोबर?

मित्रा, MCQ म्हणजेच ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांसाठी फार वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागते. आता पुढे जे सांगतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या नाहीतर राज्यसेवा पूर्व परीक्षेतही विकेट उडेल.

मुख्य म्हणजे अभ्यासाची पद्धत:
एक टॉपिक घेवून तो संपूर्णपणे सखोल वाचून घ्यावा. त्यात काय आहे ते समजून घ्यावे. नंतर त्यावर काय प्रश्न येवू शकतो ह्यावर विचार करावा. स्वतःच काही प्रश्न तयार करावेत, म्हणजे तुमच्या “analytical” माइंड चा वापर इथे होईल. बघा, शाळेत असतांना गाईड वापरली असेलच ना! तेव्हा रेडीमेड उत्तर त्या गाईड मधून पाठ करून परीक्षा दिली असेल पण मित्रा तेव्हापासूनच तुझ्या “analytical” माइंड चा वापर झालाच नसेल. तेव्हा जर तू स्वतःच्या डोक्याचा वापर करून स्वतःच्या शब्दात उत्तर “तयार” केल असतं तर किती बरं झालं असतं? म्हणून आता ती चूक करू नये. अभ्यास करतांना नेहमी जे वाचलं त्यावर प्रश्न तयार करून बघायचं.

“सराव प्रश्नसंच” चा खरा उपयोग:
मार्केट मधून जेव्हा सरावासाठी प्रश्नसंच घेता तेव्हा त्याचा “सदुपयोग” करता का? बहुतेक जणांना हे कसं करावं कदाचित माहित नसेल. मित्रा, जेव्हा एक प्रश्न सोडवतोस तेव्हा फक्त ते उत्तर बरोबर आहे कि नाही हे त्या “Answer Key” मध्ये बघतोस, आणि तुझं उत्तर बरोबर आहे कि चुकलं हे बघितल्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळ्तोस. बरोबर? किंवा सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर बघत असशील आणि मग दुसऱ्या प्रश्नसंचाकडे वळत असशील, बरोबर?

पण हा सदुपयोग नाही बरं का!

प्रश्नसंचचा सदुपयोग असा करावा:
एक प्रश्न सोडवल्यानंतर बाकीचे उत्तर का चूक आहेत ह्याचं analysis करावं. एक प्रश्न सोडवल्यानंतर तो प्रश्न दुसऱ्या पद्धतीने (re-frame) लिहून बाकीचे उत्तर कसे त्याला “सूट” होतील हे बघावे.

असं केल्यानंतर तो टॉपिक संपूर्णपणे समजेल आणि त्यावर कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय आणि कसं द्यायचं हे तुला कळेल मित्रा.

आणि परीक्षेदरम्यान घ्यावयाची काळजी:
वेळेचा अगदी सदुपयोग करावा. प्रत्येक प्रश्नासाठी योग्य ती वेळ वापरावी.
ह्यासाठी एक उदाहरण मी PSI /STI ह्या परीक्षेंचा पेपर कसा सोडवायचा हे व्यवस्थित वेळेचं प्लानिंग करून दिलं आहे, ते इथे पाहूया:

PSI:  https://anilmd.wordpress.com/psi-exam-2010-2011/prelims/how-to-solve-psi-question-paper/

STI: https://anilmd.wordpress.com/sti/prelims/how-to-solve-question-paper/

प्रत्येक परीक्षेला वेगळी वेळ दिलेली असते तर त्याप्रमाणे वेळेचं विभाजन करावे. जर दिलेल्या वेळेपेक्षा फार लवकर प्रश्नपत्रिका सोडवली तर ते योग्य नाही, कदाचित उत्तरे चुकू शकतील म्हणून वर दिलेल्या प्रमाणे वेळेचं नियोजन करून घ्यावे.

जेव्हा प्रश्न आणि त्याची ४ उत्तरे समोर असतात तर त्यापैकी २ तर नक्कीच चूक असतात तर ते काढूनच टाकावेत आणि मग उरलेल्या दोन पैकी कोणतं “Most Relevant” म्हणजे अगदी योग्य उत्तर आहे ते निवडावे. पण असा करतांना डोळे उघडेच ठेवावेत! म्हणजे हे कि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुझा स्कोर फार कमी होईल जर योग्य उत्तर निवडलं नाही तर!

शेवटचा प्रश्न सोडविपर्यंत डोकं अगदी शांत ठेवावे तेव्हाच तुला सफलता मिळेल मित्रा !!!

Test Series at your own Home: आमची आगळी वेगळी “टेस्ट सेरीज” ३० मे २०१२ पासून सुरु होत आहे. आता प्रश्न पत्रिका तुम्ही घर बसल्याच सोडवून तुमची परीक्षेची तयारी कितपत झालेली आहे ते बघू शकता. त्याबद्दल सर्व माहिती इथे उपलब्ध आहे:

Test Series for Rajyaseva Prelims 2012

2 Responses to MCQs – ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांसाठी कशी तयारी करावी

  1. Nishigandha Bote म्हणतो आहे:

    thanx sir.

  2. pavan garud म्हणतो आहे:

    Khup chan samjvta sir i like it

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.