Parallel Reservation Details
UPDATE – 26 Dec 2018: जाहिरात क्रमांक 50/2018 व यापुढील सर्व परीक्षांकरिता मागासवर्गीय उमेदवारांचाही गुणवत्तेच्या आधारे अराखीव समांतर आरक्षित पदांसाठी निकालाच्या वेळी विचार करण्यात येईल. Reference: Ann-Cate change in profile
समांतर आरक्षण (As on 07 Dec 2017)
|
पोलीस उप-निरीक्षक/विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ चे उदाहरण घेवून
|
पद – पोलीस उप-निरीक्षक- एकूण जागा – 650
|
ओपन वर्गवारीसाठी एकूण जागा – 366 |
मागासवर्गीय वर्गवारीसाठी एकूण जागा – 284 |
समांतर-आरक्षण |
एकूण 366 जागेपैकी |
समांतर-आरक्षण |
एकूण 284 जागेपैकी |
|
सर्वसाधारण- |
238 |
|
सर्वसाधारण- |
184 |
|
महिलासाठी आरक्षित |
110 |
|
महिलासाठी आरक्षित |
86 |
|
खेळाडूंसाठी आरक्षित |
18 |
|
खेळाडूंसाठी आरक्षित |
14 |
नियमाप्रमाणे: |
|
|
नियमाप्रमाणे: |
|
|
|
1. ओपन वर्गवारीतील सर्वसाधारण 238 जागांसाठी ओपन तसेच मागासवर्गीय उमेदवार पात्र असतात. [नोट: ज्या मागासवर्गीय उमेदवारांचे वय 19 ते 31 या मधील आहे व ज्यांनी ओपनची फी भरली फक्त हेच उमेदवार पात्र असतात. अर्ज सादर करतांना त्यांनी ‘ओपन’ व ‘मागासवर्गीय’ ह्या दोन्ही जागांसाठी अर्ज विचारात घेतला जावा असे निवडले असेल तरच.] |
1. |
1. मागासवर्गीय वर्गवारीतील सर्वसाधारण 184 जागांसाठी फक्त मागासवर्गीय उमेदवार पात्र असतात. [नोट: ज्या मागासवर्गीय उमेदवारांचे वय 19 ते 34 या मधील आहे व ज्यांनी मागासवर्गीय वर्गवारीसाठी असलेली फी भरली आहे. अर्ज सादर करतांना त्यांनी फक्त ‘मागासवर्गीय’ जागांसाठी अर्ज विचारात घेतला जावा असे निवडले असेल.] |
|
2. ज्या मागासवर्गीय उमेदवारांचे वय 32 ते 34 या मधील आहे व ज्यांनी ओपनची वर्गवारीसाठी असलेली फी भरली आहे. अर्ज सादर करतांना त्यांनी ‘ओपन’ व ‘मागासवर्गीय’ ह्या दोन्ही जागांसाठी अर्ज विचारात घेतला जावा असे निवडले असेल तरीसुद्धा ते ओपन वर्गवारीतील सर्वसाधारण 238 जागांसाठी पात्र नाहीत कारण त्यांनी वयाची सूट घेतलेली आहे. |
|
2. वि.जा.(अ), भ.ज. (ब), भ.ज. (क), भ.ज. (ड) या प्रवर्गातील आरक्षित पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित वर्गवारीतील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. |
|
3. ओपन वर्गवारीतील महिलांसाठी आरक्षित 110 जागांमधील काही जागांसाठी ‘ओपन वर्गवारीतील महिला’ उपलब्ध नसतील तर ओपन वर्गवारीतील पुरुषांमधूनच गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात येईल. |
|
3. मागासवर्गीय वर्गवारीतील महिलांसाठी आरक्षित 86 जागांमधील काही जागांसाठी ‘मागासवर्गीय वर्गवारीतील महिला’ उपलब्ध नसतील तर त्या-त्या मागासवर्गीय वर्गवारीतील पुरुषांमधूनच गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात येईल. |
|
4. ओपन वर्गवारीतील खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या 18 जागांसाठी ओपन वर्गवारीतील खेळाडू उमेदवार उपलब्ध नसतील तर ओपन वर्गवारीतीलच बिगर खेळाडू उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात येईल. |
|
4. मागासवर्गीय वर्गवारीतील खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या 14 जागांसाठी मागासवर्गीय प्रवर्गातील खेळाडू उमेदवार उपलब्ध नसतील तर त्या-त्या मागासवर्गीय प्रवर्गातीलच बिगर खेळाडू उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात येईल. |
नोट: वरील माहिती एमपीएससी वेबसाईटवरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ व शासन निर्णय क्रमांक 201408131053204307 तसेच पोलीस उप-निरीक्षक/विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी संयुक्त पूर्व परीक्षा २०१७च्या जाहिरात क्र. 23/2017 मधून घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये शासन वेळोवेळी बदल करू शकते त्यामुळे ही माहिती पुढेही बदलू शकते. कृपया हीच माहिती (पुढेही) तंतोतंत खरी आहे असे गृहीत धरू नये. ही माहिती अद्ययावत करण्याचा मी प्रयत्न करेल. |
Share this with your friends and relatives who can benefit from my blog:
Like this:
Like Loading...