Syllabus is changed from 2020 exam onwards.
एकूण प्रश्न पत्रिका – २
एकूण गुण 400 (200 + 200) – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पेपर १- इंग्रजी, मराठी व सामान्य ज्ञान (कालावधी – १ तास):
अ. मराठी : 100 गुण / प्रश्न 50/ दर्जा – मराठी – बारावी / माध्यम – मराठी
ब. इंग्रजी : 60 गुण / प्रश्न 30/ दर्जा – इंग्रजी– पदवी / माध्यम – इंग्रजी
क. सामान्य ज्ञान- 40 गुण / प्रश्न 20/ दर्जा – पदवी / माध्यम – मराठी – इंग्रजी
पेपर २ – कालावधी – १ तास:
सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान- 200 गुण / प्रश्न 100/ दर्जा – पदवी / माध्यम – मराठी – इंग्रजी
अभ्यासक्रम:
पेपर १:-इंग्रजी, मराठी व सामान्य ज्ञान:
- इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Meaning and Usage of Phrases and idioms, comprehension of passage.
- मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
- सामान्य ज्ञान:
- घडामोडी: जागतिक तसेच भारतातील
- माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
- संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
पेपर २ – सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान:
- बुद्धिमत्ता चाचणी
- महाराष्ट्राचा इतिहास: सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी.
- महाराष्ट्राचा भूगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
- भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
- मानवी हक्क व जबाबदाऱ्या: संकल्पना – आंतर राष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कांपासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगाराचे शोषण, सुरक्षित गुन्हेगारी, इत्यादी). लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठाव एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व. नागरी संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती व जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
- मुंबई पोलीस कायदा 1951
- भारतीय दंड संहिता 1860
- फौजदारी प्रक्रिया संहिता 1973
- भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act) 1872
संपूर्ण माहितीसाठी बघा: SUBORDINATE MAIN EXAM-2020
Sorry, I think this msg automatically converted in English. So my question was I am looking for mpsc coaching classes near kasarwadi and I’m doing job in MNC. So can u please suggest me a good coaching class about mpsc preparation. Thanks
@Karan, you can join our PGP that can be completed along with your job and you do not need to attend classes. All details are available under “Courses” menu on this blog.
Sir tumhi chaan mahiti deta ….me mpsc and psi cha study karat ahe .. mla mpsc madhe aal subject che quetion kiti marks la yetat yachi mahiti pahije.
prtek Topic kiti marks la wicharu shaktat
@अक्षय, ही लिंक बघ: https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva/mpsc-rajyaseva-prelims/rajyaseva-prelims-2015-breakdown-of-questions/
Sir me army madhe job karat aahe maja 2 mahinyapasun study chalu aahe me jammut service karat aslyamule self study karat aahe. Maja javal eknath patil prakash gayakward current knowlege v 40 qution paper unic acadmey chaya aahet srv study me mana pasun karat aahe tari me sarav pepar sodavto teva maja scors 31 to 36 madhech asato pricha ase ka ?
@राहुल, तुम्हाला पी.एस.आय. परीक्षेसाठी कमीतकमी तीस ते चाळीस पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल.
sir mi mech engg krtoy,mala mpsc karayci ahe maz dream psi ahe tr mala all information want ahe about psi sathi..so plZ I wait ur reply..
@Kiran, plz explore MPSC PSI menu on this blog.
Dear Sir
mi ata fyba madhe ahe mazhe swapn PSI honyache ahe…
Pn tyasathi suruvat kothun karavi hech samjat nahi…
Amchyakade kuthlehi classes vagaire kahihi nahi,konti pustake vachavi hehi mahit nahi ,kay anhyas karawa hehi samjat nahi,
plese mala margdarshan kara…
Plese
@गणेश, काळजी करू नये. ह्या ब्लोगवर सर्व माहिती उपलब्ध आहे, ती वाचून सुरुवात करा. ही लिंक बघा, तुम्हाला फ्री इ-प्रोस्पेक्ट्स मिळेल:https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
Mi aata BE la aahe Mala PSI hoych aahe, pan kalat nahi kuthun aani Kashi suruvat karu,mala guidance chi khup Garaj aahe, pls sir help me..
@ओजास्विनी, ही लिंक वाचावी: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir mala mpsc dyaychi aahe..pan mi companyt kam kart astana majh ek bot cut jhalay….left hand…mi tari mpsc deu shakto ka
@Nilesh, yes, you can.
sir. mi ata Fy bsc la ahe tr mpsc cha study karnyasati konte books important ahet
@प्रशांत, त्यासाठी ई-प्रोस्पेक्ट्स बघावे:https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
Sir,
Me ata B.A.2year la ahe mala psi chi exam dhayla jmel ka.
@श्रीनिवास, नाही, देवू नये आणि उगीच सरकारी पैशांचा अपव्यय करू नये.
sir why shriniwas not eligible for the PSI Exam….?
@Kunal, MPSC allows you to appear for the Prelim exam when a candidate is in the final year of degree so in case he/she is selected in Prelims, by the form filling date for Main exam, result of final year’s degree is out and the candidate is officially eligible for Main exam. In case of Shriniwas, he is in 2nd year of his degree so if he is selected he cannot submit his marks details to MPSC while filling the form for PSI Main exam so the expenses by MPSC on conducting the exam for this one person gets wasted.