Sports

I will update this information after 5th Jun 2017. There have been some changes in sports category rules and regulations.

एम.पी.एस.सी. परीक्षेत मान्यताप्राप्त खेळांची लिस्ट खालीलप्रमाणे आहे. ह्या खेळांच्या लिस्ट मध्ये महाराष्ट्र शासन केव्हाही बदल करू शकते त्यामुळे एम.पी.एस.सी.च्या वेबसाईट वर सुद्धा ही लिस्ट उपलब्ध असते तर ती सुद्धा वेळोवेळी पाहत राहावी:

Sports-List

क्रीडाविषयक अर्हता:

खेळाडूंसाठी आरक्षित पदावर नियुक्ती देण्यासाठी खेळाडूने क्रीडाविषयक क्षेत्रात खालीलप्रमाणे कामगिरी केलेली असावी:

गट “अ” साठी अर्हता:

 1. सदर पदांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील वैयक्तिक अथवा सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व करताना प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान प्राप्त केलेलं असावे अथवा सुवर्ण, रौप्य किंवा कास्य पदक प्राप्त केलेले असावे.
 2. सदर स्पर्धा या सबंधित खेळाच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय फेडरेशनने  आयोजित केलेल्या असाव्यात अथवा  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्वत: आयोजित केलेल्या असाव्यात.
 3. उपरोक्त स्पर्धा व्यतिरिक्त असलेल्या स्पर्धा या मान्यताप्राप्त खेळांच्या असून आंतर राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संघटनेने आयोजित केलेल्या असाव्यात. यामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवड ही राष्ट्रीय संघातून झालेली असावी. वैयक्तीक्ररित्या किंवा आमंत्रित स्वरूपाच्या स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचा यासाठी विचार करता येणार नाही.
 4. भारतीय खेळ प्राधिकरण यांनी आयोजित केलेल्या ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धातील राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त किंवा सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक प्राप्त खेळाडू, तथापि प्रत्येक गटात नियुक्तीसाठी स्पर्धा असेल तर वरिष्ठ प्राविण्यास प्राधान्य देण्यात येईल.

गट “ब” साठी अर्हता:

 1. सदर पदांसाठी त्या त्या खेळांच्या वैयक्तिक अथवा सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधित्व करतांना राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान प्राप्त केलेलं असावे अथवा सुवर्ण, रौप्य किंवा कास्य पदक प्राप्त केलेले असावे.
 2. सदर स्पर्धा या सबंधित खेळाच्या भारतीय ऑलिम्पिक समितीशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय फेडरेशनने  आयोजित केलेल्या असाव्यात अथवा भारतीय ऑलिम्पिक समितीने स्वत: आयोजित केलेल्या असाव्यात.
 3. उपरोक्त स्पर्धा व्यतिरिक्त असलेल्या स्पर्धा या मान्यताप्राप्त खेळांच्या असून राष्ट्रीय स्तरावरील भारतीय ऑलिम्पिक समितीच्या  मान्यताप्राप्त संघटनेने आयोजित केलेल्या असाव्यात. यामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवड ही राज्य संघातून झालेली असावी.
 4. भारतीय खेळ प्राधिकरण यांनी आयोजित केलेल्या ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धातील राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त किंवा सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक प्राप्त खेळाडू, तथापि प्रत्येक गटात नियुक्तीसाठी स्पर्धा असेल तर वरिष्ठ प्राविण्यास प्राधान्य देण्यात येईल.

गट “क व ड” साठी अर्हता:

 1. सदर पदांसाठी त्या त्या खेळाच्या वैयक्तिक अथवा सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये किमान राज्य अजिंक्यपद स्पर्धात प्रथम, द्वितीय किंवा तृतीय स्थान प्राप्त करणारा किंवा सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक प्राप्त करणारा खेळाडू.
 2. राज्य अजिंक्यपद स्पर्धा या सदर खेळाच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनशी संलग्न असलेल्या अधिकृत राज्य संघटनेने आयोजित केलेल्या असाव्यात अथवा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनने स्वत: आयोजित केलेल्या असाव्यात. किमान प्राविण्यापेक्षा उच्च स्तरावरील क्रीडा प्राविण्य मिळविणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असावे. वैयाक्तीरीत्या किंवा आमंत्रित स्वरूपाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचा यासाठी विचार करता येणार नाही.
 3. भारतीय खेळ प्राधिकरणाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय किंवा तृतीय स्थान प्राप्त करणारा किंवा सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक प्राप्त करणारा खेळाडू.
 4. भारतीय खेळ प्राधिकरण यांनी आयोजित केलेल्या ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धातील राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त किंवा सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक प्राप्त खेळाडू, तथापि प्रत्येक गटात नियुक्तीसाठी स्पर्धा असेल तर वरिष्ठ प्राविण्यास प्राधान्य देण्यात येईल.
 5. भारतीय शालेय खेळ महासंघ यांनी आयोजित केलेल्या रष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धातील प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त किंवा सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक प्राप्त खेळाडू,

सर्वसाधारण अटी  व मार्गदर्शक तत्वे:

 1. खेळाडूंच्या आरक्षित पदांच्या लाभाकरिता खेळाडू हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा व त्याला मराठीचे ज्ञान असावे.
 2. राज्य शासनाच्या सेवेत यापूर्वीच असलेल्या उमेदवारांना त्यांनी क्रीडा खेत्रात अधिक वरिष्ठ स्थान अथवा पदक प्राप्त केल्यास व ते शैक्षणिक, अर्हता, वयोमर्यादा इत्यादी बाबींसह प्राप्त असल्यास वरिष्ठ जागेसाठी ते अर्ज करण्यास पात्र राहतील.
 3. खेळाडूंची कामगिरीविषयक प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडून  विहित नमुन्यात घेऊन संचालक, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रमाणित केलेली असावीत. प्रमाणपत्राचे नमुने खाली दिलेले आहेत.
 4. कोणत्याही खेळाच्या स्पर्धेच्या अधिकृततेबाबत अथवा दर्जाबाबत साशंकता निर्माण झाल्यास संचालक क्रीडा व युवक सेवा यांच्या अहवालाच्या आधारे शालेय व क्रीडा विभाग व सामान्य प्रशासन विभाग यांच्या संमतीने देण्यात आलेला निर्णय हा अंतिम असेल.
 5. खेळाडूंचे आरक्षण हे समांतर आरक्षण राहील व ते कार्यान्वित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी जरी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
 6. समांतर आरक्षण असल्यामुळे या संवर्गात अदलाबदल अनुज्ञेय होणार नाही व आरक्षणाचा अनुशेष पुढे नेता येणार नाही.
 7. एखादा खेळाडू उमेदवार “अ” गटातील नेमणुकीसाठी प्राप्त असून त्याने “ब” पदासाठी अर्ज केल्यास त्याचा विचार करण्यात येईल.

नोट: खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी अर्जातील विहित ठिकाणी आरक्षित पदांसाठी निरपवादपणे (invariably) दावा करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांचा आरक्षित पदांसाठी विचार केला जाणार नाही.

पूर्वपरीक्षेचा अर्ज भरताच आपण कोणत्या जागेसाठी/पदासाठी योग्य आहोत हे खालीलपैकी कोणत्याही सक्षम प्राधीकाऱ्याकडून  खातरजमा (Confirm) करून घ्यावे. त्यासाठी खेळाडूंनी खालील रीजनल किंवा जिल्हा/तालुका स्तरीय ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करावी:

 • The Directorate of Sports and Youth Services is headquartered at Central Building , Pune and have 8 regional offices across the following locations Mumbai, Nasik, Pune, Kolhapur, Aurangabad, Latur, Nagpur and Amravati.
 • There are 35 District Sports Offices and 31 Taluka Sports offices across the state of Maharastra.

कधी प्रमाणित (Certify/Scrutiny) करून घ्यावीत?

मुलाखतीस बोलावल्यानंतर पण मुलाखतीच्या आधी: खेळाडूंनी त्यांची प्रमाणपत्रे “संचालक, क्रीडा व युवक संचालनालय, पुणे” ह्यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी.

 

SPECIMEN FORMS FOR SPORTS (SPORTS CERTIFICATES)

Appenix-9

Download Appendix-9 as PDF. Click HERE

Appenix-10

Download Appendix-10 as PDF. Click HERE

Appenix-11

Download Appendix-11 as PDF. Click HERE

Appenix-12

Download Appendix-12 as PDF. Click HERE

 

Advertisements