तीन वर्षांचा खडतर प्रवास

मित्रांनो, कसे आहात?

आज माझ्या अकादमीचे ३ वर्ष पूर्ण होत आहेत.  ह्या वेळी खूप काही लिहावेसे वाटते पण वेळ कुठे आहे? त्यामुळे थोडेसेच लिहेन…

जेव्हा मी ही अकादमी सुरु केली तेव्हा असे वाटत होते कि मी एकटाच आहे आणि पुढील प्रवास कसा होईल ह्या विचाराने पहिले पाउल पुढे केले. मनात एकच विचार होता कि जगात एकटाच आलो होतो आणि एकटेच पुढे जायचे आहे. कारण माझा अनुभव फारच वेगळा होता. जगात आपल्याला साथ देणारे खूप जण भेटतात पण मधेच सोडूनही देतात. हे समजण्यासाठी flashback मध्ये जाणे जरुरी आहे. भारतीय वायुसेना सोडल्यानंतर मिळालेली सर्व रक्कम टाकून स्वत:ची सोफ्टवेअर फर्म सुरु केली. त्यात मला कटू अनुभव आला. एम.सी.ए.साठी माझ्या फर्ममध्ये ६ महिन्यांचा प्रोजेक्ट करणाऱ्या काही मुलांनी माझे सोफ्टवेअर मधेच सोडून दिले. केव्हा? जेव्हा मी त्यांच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर सही केली तेव्हा!!! त्याचं कर्तव्य होत कि माझे सोफ्टवेअर पूर्ण करावेत परंतु ह्या जगात मतलबी लोक असतात ह्याचा कटू अनुभव मला सुद्धा यावा? ते विसरून जाऊन मी परत एकदा आणखी एक पाउल टाकले आणि पुढील ५ वर्षात फार उंच भरारी मारली पण मग काही परदेशी क्लायंटनी लाखो रुपयाने बुडवले. त्यात भर ओतली ती जवळच्यांनी. जे जवळचे होते (ज्यांना मी तसे समजत होतो) अशांनी सुद्धा साथ सोडली. पुढील एक ते दीड वर्ष मी ती फर्म चालवली आणि मग बंद केली. मला त्यानंतर फार फार त्रास झाला. कुणाची मदत मिळेना. सर्व लोकांनी पाठ फिरवली. तेव्हा परत प्रत्यय आला कि  ह्या जगात आपण एकटेच आलोत आणि एकटेच पुढे जायचे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे शब्द आठवले – “एकला चलो रे !!!” आणि मग मागे न पाहता मी आणखी एक पाउल टाकले.

पुढील प्रवासही काहीसा सुखद होता पण खडतर सुद्धा होता.

आजरोजी भारताची एक नंबरची सोफ्टवेअर फर्म आहे तिला पहिला क्लायंट मिळायला ४ वर्षे लागले होते. हाच विचार मनात घेऊन पुढे निघालो.

मला जसे जमेल तशी मेहनत घेतली आणि ब्लोग व फोन मार्फत मी एमपीएससी व युपीएससीच्या उमेदवारांना हवे ते मार्गदर्शन करायला सुरुवात केली. दररोज १८ ते २२ तास ह्या कामासाठी दिलेत आणि ज्यांना ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावले. मी दिवस बघितला नाही कि रात्र बघितली नाही. फक्त हाच विचार केला कि एमपीएससी व युपीएससीचे उमेदवार शहरातच काय खेडेगावात सुद्धा आहेत, त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पोचावा आणि माझ्याकडून जसे जमेल तशी मदत केली आणि अजूनही करतोय.

अकादमीचे पहिले वर्ष फार अडचणीचे होते. मी विदर्भात स्वत: फिरलो, खेडोपाडी, लहान शहरात व मोठ्या शहरातील कॉलेजेस मध्ये जावून मार्गदर्शन केले, सेमिनार घेतले. त्यासाठी मी एक पैसाही घेतला नाही. मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते कि हे करत असताना मला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणी आल्यात. दुसऱ्याचे भविष्य उजळून काढतांना  माझ्या बीएचएमएस करणाऱ्या मुलीचे भविष्य अंधारात आहे असे वाटायची वेळ सुद्धा आली परंतु  त्यावेळी मी माझे मन विचलित होवू न देता माझे कार्य करीत राहिलो. ह्याबद्दल मी नंतर कधी लिहेन.

माननीय शरद पवारांच्या बारामतीच्या व इंदापूर येथील इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सेमिनार घेण्यासाठी आमंत्रण आले आणि मी तिथे जाऊन आलो. ह्यासाठी प्रोफेसर दिलीप पाटील सरांनी पुढाकार घेतला. इंदापूरच्या कॉलेजचे प्रिन्सिपल निर्मल सर व प्रोफेसर काळदाते सरांचे हार्दिक आभार. मला पहिल्यांदा दोन्ही ठिकाणी मानधन मिळाले.

अकादमीच्या दुसऱ्या वर्षात सफलता मिळाली “पीएसआय २०११”च्या  परीक्षेत सफलता मिळवणाऱ्या विश्वास चव्हाणके यांच्या रुपात. त्यांचे ट्रेनिंग २६ ऑक्टोबर २०१३ला पूर्ण झाले आणि आता ते पुण्यात आहेत. त्यांच्याबद्दल वाचायचे असेल तर “फटा पोस्टर निकला हिरो” हे आर्टिकल वाचावे. कोल्हापूर (कबनूर) च्या रोहित ढवळे ने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ मध्ये सफलता मिळवून त्याच्या व माझ्या कष्टाचे फळ केले. अनेक उमेदवार थोड्याशा गुणांनी मागे राहिले ह्याची खंत मला आहे. ते नक्कीच पुढील परीक्षेत सफलता मिळवतील हीच सदिच्छा.

ब्लोगवरील अनेक वाचक व OAP (टेस्ट सिरीज)चे काही उमेदवारसुद्धा राज्यसेवा, एस.टी.आय., पी.एस.आय. परीक्षेत सफल झालेत. कुणी तहसीलदार झालेत तर कुणी एसटीआय. त्यांचे मनोगत “About Us” मधील “Testimonials” ह्या पेजवर उपलब्ध आहेत.

मित्रांनो, जाता जाता असे सांगावेसे वाटते कि तुमच्यात जर अतूट विश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही परीक्षेत सफलता मिळवू शकता. परंतु एक लक्षात ठेवा कि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या. कमीत कमी एक वर्षा-अगोदर अभ्यासाला लागा. जाहिरात येण्याची वाट बघू नका आणि आल्यावरच तयारीला लागू असा विचार करून ही घोडचूक करू नका. अकादमी सुरु करतानांची माझी दूरदृष्टी होती कि जास्तीत जास्त पुस्तकातूनच अभ्यास करायला हवा आणि आज रोजी एमपीएससीचा कोणताही पेपर बघा, त्यातील प्रश्नाचे स्वरूप बघा. असे दिसून येईल कि सखोल अभ्यास करणारच हा पेपर सोडवू शकेल. मित्रांनो, स्वत:चे नोट्स बनवा आणि तेही सखोल अभ्यास करूनच!!!

एमपीएससी किंवा यूपीएससीसाठी खूप काही मी लिहून ठेवल आहे ह्या ब्लोगवर. ते वाचूनही तुमच समाधान झाल नाही तर तुम्ही मला सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत केव्हाही फोन करू शकता. तुम्हाला मदत करून मला आनंदच होईल.  मी जेव्हा तुमचा फोन घेतला नाही तर समजावे कि मी एकतर ड्राईव्ह करत असेल, मिटिंग मध्ये असेल नाहीतर झोपेत असेल.

तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा!!!

तुमचा मित्र,

अनिल दाभाडे

About Anil Dabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services and tagged , , , , . Bookmark the permalink.

48 Responses to तीन वर्षांचा खडतर प्रवास

  1. Pallavi म्हणतो आहे:

    very proud of you sir, sir how would i manage my studies while doing job… please guide

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @Pallavi, you should plan your preparation over next one year. Refer the exam syllabus, collect around 40-50 books, refer 3-4 magazines every month, refer 2-3 daily newspapers. Prepare your own Notes for every subject (every topic). Revise and then attempt lots of mock tests. For complete details, you should refer various articles available on this blog.

  2. Rajaram Sawant म्हणतो आहे:

    सर वयाच्या ३५ व्या वर्षानंतर mpsc परीक्षा देता येईल का open category

  3. bhise swapnil popat (surli) म्हणतो आहे:

    Sar tumi amahala je kahi sagital ? aata tar mala as vat tay ki me P.S.I. HOHIN

  4. Nikhil म्हणतो आहे:

    sir,tumhi aani tumcha blog khup sundar aahe he mi nahi maz man mala sangate..yatun pratyek students labh gheil.he nakki….thanx for help in rural background students…Dhanyawad

  5. Nikhil म्हणतो आहे:

    sir…tumcha ha blog kharch khup sundar aahe..yatun mazyasarkhi hotkaru mule inspire hotil..he tumche molache upkar aahet.Dhanyawad sir.

  6. Ex- Air Warrior Sanjay Mogare, 11 BRD, Ozar म्हणतो आहे:

    Saaheb Hardik Abhinandan!
    I feel proud to have a friend like you. In fact, I was seeking ur contact from our common friends @ HAL. Would you pl share it? Mine is *****. I need your help.
    Thanks & Warm Wishes.

  7. shivanand prakash nagre म्हणतो आहे:

    ek jwalant itihas——–

  8. RV म्हणतो आहे:

    Congratulations sir,

    You would definitely see such much mor such successful years!!!
    Appreciate your work and dedication!!!.

    Thanks,
    RV

  9. ganesh म्हणतो आहे:

    congratulation sir and best luck for your success

  10. नरेन भारती म्हणतो आहे:

    congratulation…..

    On 10/16/13, AnilMD’s Blog – Personal Guidance for UPSC & MPSC Exams,

  11. Yash म्हणतो आहे:

    Sir congrats and thank you 🙂
    My best wishes for future journey!

  12. Dhananjay म्हणतो आहे:

    hats off to your achievement & wish all the very best for your successful journey..

  13. vikrant kadam म्हणतो आहे:

    Congrats and Thanx sir aapan je kam karat aahat tyamule mazyasarkhya gramin bhagatalya candidate la khup margdarshan milte aahe

  14. samp patil म्हणतो आहे:

    sir pravas ha akhand asto ?to mojava ka nahi ha jacha tacha prashan? pan ya pravasat apan kai dile he mahatvache. sir 1 varsha pashun tumhi mala khup kahi dile. te shabdat vakat karta yeat nahi sir so thanks for you and best luck our journy

  15. Rushikesh म्हणतो आहे:

    sir, what is the height required for dy collector.

  16. Saagar म्हणतो आहे:

    Hatts of you sir….and thanks to ur valuable assistance.:-)

  17. shital kedare म्हणतो आहे:

    Apratim…….!

  18. seema म्हणतो आहे:

    your great
    Hello Sir,
    congratulation, and thanks for being there to guide so many students and candidate .

    • AnilMD म्हणतो आहे:

      @सीमा, एक साधा माणूस आहे मी. प्रयत्न हाच आहे कि प्रत्येकाला जास्तीत जास्त मदत करावी जेणेकरून ते सुद्धा पुढे अशीच मदत बाकीच्यांना करतील.

  19. dhanashri d. mali म्हणतो आहे:

    hello sir ,
    I am dhanashri mali from (Islampur) Sangli .
    mi B.A. M.Ed ahe. mala MPSC kaeaychi ahe tysathi mala tumi margdarshan kara.
    kahi karnane mi n.p. islampur ithe dete opretor mhanun kam karit ahe. tari mala margdarshan kara . Plz. sir.

    • dhanashri d. mali म्हणतो आहे:

      Sir ,
      kharch tumchyasarkhe lok khupoch kami phayla miltat. mala karmveer annachi athavan jhali . tumhi dekhil tynachyasarkhech vidyarthyasathi kam karata. majhe tumhala koti koti pranam. sir Plz tumcha mo.no. sanga.

      • AnilMD म्हणतो आहे:

        @धनश्री, नाही हो, मी एकदम सामान्य माणूस आहे. जे मला जमते ते मी एन्जोय करतो बस बाकी काही नाही. माझे दोन्ही नंबर्स blog-banner वर आहेत.

    • AnilMD म्हणतो आहे:

      @धनश्री, एमपीएससी च्या अनेक परीक्षा आहेत. त्यांचा अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहे. तो बघून पुस्तके वाचून नोट्स तयार करा.

      • dhanashri d. mali म्हणतो आहे:

        thanks sir .
        an tarihi mala majhya kamatun kasa vel kadhava tech samjt nahi pan majhya education fildcha syllabus MPSC madhye ahe ka ani ase exam konte te sanga. Plz sir

        • AnilMD म्हणतो आहे:

          @धनश्री, वेळ काढावा लागतो आणि ते शक्य नसेल तर एमपीएससी चे स्वप्न सोडून द्यावे उगीच पैसे वाया घालवू नये.:) एमपीएससीच्या सर्व परीक्षेंचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे तो बघावा.

  20. Atul Hire म्हणतो आहे:

    Sir,tumcya ya mehnatila maza salam……khup chann Sir ….

  21. Rohan म्हणतो आहे:

    Great Work Sir, Please keep it up.

  22. Hemant म्हणतो आहे:

    Hello Sir,
    congratulation, and thanks for being there to guide so many students and candidate to full fill theirs dream come true .

  23. rameshwar kharad म्हणतो आहे:

    dhanyawad, sir ! Khup prerna milali tumchyakadun..

  24. syed ramiz म्हणतो आहे:

    congratulations sir the journey to success always starts with the first step……

  25. Amol म्हणतो आहे:

    We proud of u Sir…………………….n doing very good job keep it up

Leave a reply to AnilMD उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.